Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे-नगर महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात; जखमींचा आकडाही आला समोर

कोंढापुरी (ता. शिरुर) नजीक पुणे- नगर महार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात होऊन तब्बल सोळा प्रवासी गंभीर जखमी होऊन तीन वाहनाचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 01, 2025 | 01:01 PM
झाडावर कार आदळून चालक ठार

झाडावर कार आदळून चालक ठार

Follow Us
Close
Follow Us:
  • राज्यात अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ
  • पुणे-नगर महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात
  • जखमींचा आकडाही आला समोर
शिक्रापूर : कोंढापुरी (ता. शिरुर) नजीक पुणे- नगर महार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात होऊन तब्बल सोळा प्रवासी गंभीर जखमी होऊन तीन वाहनाचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी एम एच १४ सि डब्ल्यू ४१५५ या लग्झरी बस वाहनावरील चालक सचिन श्रीकिसन तायडे (वय ३२ रा. मंगळूर नवघरे ता. चिखली जि. बुलढाणा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत आशिष वसंतराव हिवराळे (वय ४१ रा. अचलपूर ता. अमरावती जि. अमरावती) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढापुरी (ता. शिरुर) येथे पुणे-नगर महार्गावर एम एच १२ यु सि ३६८६ हि ईर्टीगा गाडी नगरवरून पुणेच्या दिशेने जात असताना पाठीमागून आलेल्या एम एच १४ सि डब्ल्यू ४१५५ या लग्झरी बसची ईर्टीगाला जोरदार धडक बसली. त्यानंतर लग्झरी पुन्हा समोरील एम एच १९ सि एक्स ४८८४ या लग्झरी बसवर आदळून अपघात झाला. दरम्यान रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक मारुती पासलकर, पोलीस हवालदार विलास आंबेकर, संतोष पवार, संदीप जगदाळे, महिला पोलीस हवालदार विद्या बनकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर नागरिकांनी जखमींना उपचारासाठी शिरुर व शिक्रापूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. यावेळी मोठी वाहतूक कोंडी झाल्याने पोलिसांनी क्रेनच्या मदतीने रस्त्यावरील वाहने बाजूला करत वाहतूक कोंडी सुरळीत केली.

जखमी प्रवाशांची नावे

या अपघातात शेरखान अजीज मुल्ला (वय ५२ रा. – चऱ्होली आळंदी रोड जि. पुणे), सिद्धार्थ अशोक इंगळे (वय २९ रा. शिरला अंधारे ता. पातुर जि. अकोला), सौरभ रामचंद्र देशमुख (वय २७, असिक असद शेख वय ४०), चित्रा रमेश जोशी (वय ६५), राज पंजाबराव सुरवारे (वय २७ तिघे रा. खामगाव जि. बुलढाणा), कैस्सार जुबेर शेख (वय ३२), गुड्डू छेगझास (वय 35 दोघे रा. छत्रपती संभाजीनगर), सचिन श्रीकिसन तायडे (वय ३२ रा. मंगळूर नवघरे ता. चिखली जि. बुलढाणा), बंडू जवाहर जगताप (वय ४९ रा. चिंचवड जि. पुणे), अमित वासुदेव सावंग (वय ४१), अनिल वासुदेव सावंग (वय ४२ दोघे रा. धामणा ता. अकोला जि. अकोला), पृथ्वीराज राहुल इंगळे (वय २० रा. शेगाव ता. शेगाव जि. बुलढाणा), प्राची केदार बर्वे (वय ३८ रा. शिवाजीनगर पुणे), संगीता शंकर माहुरे (वय ३७ रा. हिंजवडी गावठाण ता. मुळशी जि. पुणे), व काव्या सचिन विधाटे (वय १० रा. बाणेर पुणे) हे प्रवासी जखमी झाले आहेत. रांजणगाव पोलिसांनी सर्व प्रवाशांची रुग्णालयात जाऊन चौकशी केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार संतोष पवार हे करत आहेत.

Web Title: A serious accident involving three vehicles has occurred on the pune nagar highway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 01:01 PM

Topics:  

  • Accident News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police

संबंधित बातम्या

खळबळजनक ! पूर्ववैमनस्यातून तरूणावर भरदिवसा हल्ला; धारदार शस्त्राने सपासप वार केले अन्…
1

खळबळजनक ! पूर्ववैमनस्यातून तरूणावर भरदिवसा हल्ला; धारदार शस्त्राने सपासप वार केले अन्…

आंतरजातीय विवाहाच्या रागातून मुलाच्या कुटुंबास मारहाण; धमकीही दिली अन्…
2

आंतरजातीय विवाहाच्या रागातून मुलाच्या कुटुंबास मारहाण; धमकीही दिली अन्…

Accident in Rajasthan : राजस्थानमध्ये भीषण अपघात; खडीने भरलेल्या ट्रकची कारला जोरदार धडक, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
3

Accident in Rajasthan : राजस्थानमध्ये भीषण अपघात; खडीने भरलेल्या ट्रकची कारला जोरदार धडक, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Indoli Accident: तरुण कामगाराचा ट्रॅक्टरच्या धडकेत मृत्यू; इंदोलीत ग्रामस्थांचा संताप, ८ तास ‘चक्काजाम’!
4

Indoli Accident: तरुण कामगाराचा ट्रॅक्टरच्या धडकेत मृत्यू; इंदोलीत ग्रामस्थांचा संताप, ८ तास ‘चक्काजाम’!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.