Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात सराफी दुकानातून लूट; पिस्तुलाचा धाक दाखवला अन्…

सराफी दुकानात घुसून तिघांनी व्यावसायिकाच्या डोळ्यात स्प्रे मारून तसेच त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून सोने लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 10, 2024 | 12:41 PM
पुण्यात सराफी दुकानातून लूट; पिस्तुलाचा धाक दाखवला अन्...

पुण्यात सराफी दुकानातून लूट; पिस्तुलाचा धाक दाखवला अन्...

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुण्यातील बी टी कवडे रोडवरील सराफी दुकानात घुसून तिघांनी व्यावसायिकाच्या डोळ्यात स्प्रे मारून तसेच त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून सोने लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रविवारी रात्री साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली असून, चोरट्यांचा थांगपत्ता अद्याप लागलेला नाही. याप्रकरणी वालचंद आचलदासजी ओसवाल (वय ७८, रा. नाना पेठ) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना घोरपडी येथील बी टी कवडे रोडवरील बोराटे वस्तीमधील अरीहंत ज्वेलर्स या दुकानात घडली. दुकानात दिवसभराचा हिशोब लिहीत असताना दुकानात शिरलेल्या दोघा चोरट्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून सराफाच्या चेहर्‍यावर स्प्रे मारला. त्यानंतर त्यांनी दुकानातील अडीच लाख रुपयांचे दागिने घेऊन पळून गेले.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदारांचे अरीहंत ज्वेलर्स नावाने बी टी कवडे रोडवर सराफी दुकान आहे. रविवारी रात्री साडे नऊच्या सुमारास दुकानात बसून दिवसभराचा हिशोब लिहीत होते. तेव्हा दोन चोरटे दुकानात शिरले. एकाने दुकानाचे शटर अर्धवट ओढले. तर दुसऱ्याने पिस्तुल बाहेर काढत त्यांच्यावर रोखले आणि त्यांना धाक दाखविला. तक्रारदार घाबरले. तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावर स्प्रे मारला. डोळ्यात स्प्रे मारल्यानंतर चोरट्यांनी दागिने घेण्यास सुरूवात केली. तेव्हा अशा परिस्थितीत देखील तक्रारदारांनी त्यांना विरोध केला. त्यावर त्याने कंबरेचे लोखंडी हत्यार काढून ‘चुप बैठो’ असे म्हणत त्यांच्या डाव्या खांद्यावर मारले. ते दोघे हाताला लागतील ते दागिने घेऊन पळून गेले.

चोरट्यांनी सोन्याचे चमकी पान, सोन्याचे गलसन, सोन्याचे डोरले वाटी असा २ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पळून गेले. नंतर त्यांनी आरडाओरडा केला. तेव्हा परिसरात दुकान लुटल्याचे समजले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संदिपसिंह गिल, गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. पोलीस उपनिरीक्षक भिमराव मांजरे तपास करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : पुण्यात मोठा अपघात, महिला पोलिसाला कारने उडवले अन्…

रात्री वाहन तोडफोडीची घटना…

मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सराफी दुकान लुटल्याचा प्रकार घडला असताना मध्यरात्री सोसायटीत घुसलेल्या एका टोळक्याने पार्क केलेल्या तीन गाड्यांची तोडफोड केल्याची देखील घटना घडली आहे. गृरूकृपा सोसायटी ही घटना घडली असून, याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान एकाच रात्रीत दोन घटना घडल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. तर दुसरीकडे शहरातील कायदा सुव्यवस्था देखील बिघडल्याचे बोलले जाऊ लागले आहे.

Web Title: A shocking case has come to light that three men stole gold by threatening a businessman with a pistol nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2024 | 12:41 PM

Topics:  

  • crime news
  • maharashtra
  • Pune Crime

संबंधित बातम्या

कार घेऊन चोरटे आले, घर फोडलं अन् लाखोंचा ऐवज केला लंपास; कॅमेऱ्यात सगळं झालं कैद
1

कार घेऊन चोरटे आले, घर फोडलं अन् लाखोंचा ऐवज केला लंपास; कॅमेऱ्यात सगळं झालं कैद

तडीपार गुंडाचा पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न; हातात चाकू घेतला अन्…
2

तडीपार गुंडाचा पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न; हातात चाकू घेतला अन्…

Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये
3

Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Pune News: मध्यरात्री अचानक गायब, फोनही बंद अन्…,Sinhagad Fort वर ‘त्या’ व्यक्तीचा मृतदेह आढळला; काय घडलं नेमकं?
4

Pune News: मध्यरात्री अचानक गायब, फोनही बंद अन्…,Sinhagad Fort वर ‘त्या’ व्यक्तीचा मृतदेह आढळला; काय घडलं नेमकं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.