Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विवाहाच्या आमिषाने महिलेवर अत्याचार; पुण्यातील धक्कादायक प्रकार उघडकीस

विवाहविषयक नोंदणी संकेतस्थळावरुन झालेल्या ओळखीतून एका उच्चशिक्षित महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 13, 2025 | 01:42 PM
विवाहाच्या आमिषाने महिलेवर अत्याचार; पुण्यातील धक्कादायक प्रकार उघडकीस
Follow Us
Follow Us:

पुणे : विवाहविषयक नोंदणी संकेतस्थळावरुन झालेल्या ओळखीतून एका उच्चशिक्षित महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीने उच्चपदस्थ अधिकारी असल्याची बतावणी करुन महिलेची ३८ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध अत्याचार तसेच फसवणूक केल्याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका ३७ वर्षीय महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात महिलेने विवाह नोंदणी संकेतस्थळावर नोंदणी केली होती. आरोपीने महिलेशी संपर्क साधून विवाह करण्यास इच्छूक असल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपीने महिलेची भेट घेतली. उच्चपदस्थ शासकीय अधिकारी असल्याची बतावणी त्याने महिलेकडे केली. त्यानंतर महिलेला जाळ्यात ओढून त्याने तिच्यावर अत्याचार केला. जमीन खरेदीत गुंतवणूक करायची असल्याचे सांगून त्याने महिलेकडून ३८ लाख रुपये घेतले. महिलेने त्याच्याकडे विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यनंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. सहायक पोलीस निरीक्षक कल्पना सुरवसे तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : संजय पाटलांना घरवापसीचे वेध? मुख्यमंत्र्यांशी भेटी-गाठी वाढल्या; समर्थकांकडून…

राज्यात अत्याचाराचे प्रमाण वाढले

गेल्या काही दिवसाखाली फेसबुकवर झालेली ओळख एका महिलेला चांगलीच महागात पडली. ओळखीचा फायदा घेऊन या विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तरूणाने अत्याचार केला. आरोपीने महिलेला घटस्फोट झाल्यानंतर ‘तुझ्यासोबत लग्न करेल’, असे आमिष दाखवून अत्याचार केला. याबाबत खामगाव शहर पोलिसांनी तरुणाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. खामगाव सनी पॅलेसस्थित आशिष गीते (वय 26) याने एका 24 वर्षीय विवाहितेचा फेसबुकवरील ओळखीचा फायदा घेत तिला बोलाविले व तिला मोटरसायकलवर बसवून शेगाव रोडने सनशाईन कॅफेवर नेले. त्या ठिकाणी तुझ्यासोबत फारकती झाल्यानंतर लग्न करेन, असे आश्वासन देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकारानंतर ‘तू माझ्यासोबत फोनवर बोलू नको’, असे म्हणून पीडित विवाहितेचा नंबर ब्लॉकमध्ये टाकला. अशा तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.

अल्पवयीन मुलीची छेड

गेल्या काही दिवसाखाली सोलापूर जिल्ह्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. बारामती ते इंदापूरमार्गे बार्शीकडे निघालेल्या बसमध्ये प्रवासादरम्यान अल्पवयीन मुलीला एका अनोळखी युवकाने त्याचे मोबाइलमधील पॉर्न व्हिडिओ दाखवून अश्लील चाळे करत विनयभंग केल्याची फिर्याद अल्पवयीन मुलीने बार्शी शहर पोलिसात दिली आहे. रमेश सुब्राव बनसोडे (रा. भीमनगर, धाराशिव) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: A shocking case of harassing a woman with the lure of marriage has come to light nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2025 | 01:42 PM

Topics:  

  • crime news
  • maharashtra
  • Pune Crime

संबंधित बातम्या

खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ परिसरात पोलिसांची मोठी कारवाई
1

खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ परिसरात पोलिसांची मोठी कारवाई

Crime News : Are You Ready to Die?’ चकीच्या मुखवट्यातून दहशत; फिलाडेल्फिया पोलिसांकडून शोधमोहीम
2

Crime News : Are You Ready to Die?’ चकीच्या मुखवट्यातून दहशत; फिलाडेल्फिया पोलिसांकडून शोधमोहीम

Gondiya News: विद्यार्थ्यांच्या तासिका ऐरणीवर; गोंदिया बस आगाराचे ढिसाळ नियोजन एसटीच्या विलंबाचा विद्यार्थ्यांना बसतोय फटका
3

Gondiya News: विद्यार्थ्यांच्या तासिका ऐरणीवर; गोंदिया बस आगाराचे ढिसाळ नियोजन एसटीच्या विलंबाचा विद्यार्थ्यांना बसतोय फटका

Matheran News: ‘माथेरानची सुपीक माती डोंगराखाली का सोडली?’ शाळकरी मुलाचा सवाल, ‘आपली लाल सुपीक माती वाचवणार कोण?’
4

Matheran News: ‘माथेरानची सुपीक माती डोंगराखाली का सोडली?’ शाळकरी मुलाचा सवाल, ‘आपली लाल सुपीक माती वाचवणार कोण?’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.