Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तरुणासह त्याच्या आई-वडिलांना बेदम मारहाण; धक्कादायक कारणही आलं समोर

घराच्या बांधकामासाठी साहित्य घेऊन आलेल्या तरुणाला घरासमोरून वाहन नेत असल्याच्या कारणावरून अडवून त्याच्यासह त्याच्या आई- वडिलांना मारहाण करुन जखमी केल्याची घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 30, 2026 | 04:46 PM
तरुणासह त्याच्या आई-वडिलांना बेदम मारहाण; धक्कादायक कारणही आलं समोर

तरुणासह त्याच्या आई-वडिलांना बेदम मारहाण; धक्कादायक कारणही आलं समोर

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : राज्यात गुन्हेगारी वाढली असून, अशातच आता घराच्या बांधकामासाठी साहित्य घेऊन आलेल्या तरुणाला घरासमोरून वाहन नेत असल्याच्या कारणावरून अडवून त्याच्यासह त्याच्या आई- वडिलांना मारहाण करुन जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना २८ जुलै राजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास बंबाटनगरात घडली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. छाया कदम, बालाजी कदम, अर्जुन कदम आणि अन्य एक अशी मारहाण करणाऱ्यांची नावे असून त्यांच्याविरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात कल्पेश राजू सूर्यवंशी (वय २६, रा. बंबाटनगर, बीड बायपास) यांनी फिर्याद दिली आहे.

 

फिर्यादीच्या घराचे बांधकाम सुरू आहे. मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ते छोटा हत्ती वाहनातून बांधकामाचे साहित्य घेऊन घरी जात होते. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या बालाजी कदम यांच्या घरासमोर उभी असलेल्या अल्टो कारजवळून वाहन नेत असताना छाया कदम यांनी वाहन थांबवून वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर शिवीगाळ करत इतरांना बोलावून घेतले. वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्यानंतर छाया कदम यांनी दगडाने कल्पेश सूर्यवंशी यांच्या डोक्यावर वार करून त्यांना जखमी केले.

वाद सोडविण्यासाठी आलेले त्यांचे वडील राजू सूर्यवंशी यांनाही दगडाने मारहाण करण्यात आली. तसेच बालाजी कदम, अर्जुन कदम आणि एका साथीदाराने कल्पेश, त्यांचे वडील व आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेनंतर जखमी पिता-पुत्रांनी उपचार घेतल्यानंतर पुंडलीकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून छाया कदम, बालाजी कदम, अर्जुन कदम आणि त्यांच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास हवालदार डोंगरे करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : रॅपिडो कंपनीच्या संचालकांवर संभाजीनगरात थेट गुन्हा दाखल! अनधिकृत प्रवासी वाहतूक प्रकरणी आरटीओचा मोठा दणका

सिल्लोडमध्ये अज्ञात व्यक्तीचा गळा चिरून निघृण खून

सिल्लोडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सिल्लोड शहरात बुधवारी (२९ जुलै) अज्ञात व्यक्तीचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत व्यक्ती अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयोगटातील अनोळखी आहे. त्याचा मृतदेह सिल्लोड-भोकरदन मार्गावरील एका पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस असलेल्या नगरपरिषदेच्या पाण्याच्या टाकीच्या संरक्षक भिंतीलगत आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. घटनास्थळावरून रक्ताने माखलेला कटर तसेच सुमारे ५०० ते ६०० ग्रॅम वजनाचा सिमेंटचा तुकडा जप्त केला आहे. या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस विविध मार्गानी तपास करत आहेत.

Web Title: A shocking incident has occurred in which a young man along with his mother and father was brutally beaten

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 04:46 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • CM Devedra Fadnavis
  • crime news

संबंधित बातम्या

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
1

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

वाहतूक दंडाची लिंक पाठवून एकाची फसवणूक; तब्बल पावणेतीन लाखांना घातला गंडा
2

वाहतूक दंडाची लिंक पाठवून एकाची फसवणूक; तब्बल पावणेतीन लाखांना घातला गंडा

एपीके फाईल अन् ८.५९ लाख झाले गायब; लिंकवर कार्डची माहिती भरताच पैसे काढून घेतले
3

एपीके फाईल अन् ८.५९ लाख झाले गायब; लिंकवर कार्डची माहिती भरताच पैसे काढून घेतले

वहिनी बघून हसल्याचा राग अनावर; दिराने डोक्यात लोखंडी सळई घालून केला खून
4

वहिनी बघून हसल्याचा राग अनावर; दिराने डोक्यात लोखंडी सळई घालून केला खून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.