Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चिमुकलीचा खून, मुलाला जंगलात फेकले; ‘या’ कारणावरुन बापाने उचलले टोकाचे पाऊल

कौटुंबिक वाद, पत्नी घर सोडून गेल्याचे नैराश्य आणि घरातील सततच्या किरकिरीतून एका पित्याने स्वतःच्या लेकरांवरच जीवघेणा हल्ला केल्याची हृदयद्रावक घटना जुन्नर तालुक्यातील संतवाडी परिसरात उघडकीस आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 08, 2026 | 01:01 PM
चिमुकलीचा खून, मुलाला जंगलात फेकले; 'या' कारणावरुन बापाने उचलले टोकाचे पाऊल

चिमुकलीचा खून, मुलाला जंगलात फेकले; 'या' कारणावरुन बापाने उचलले टोकाचे पाऊल

Follow Us
Follow Us:
  • पत्नी घर सोडून गेल्याचे नैराश्य
  • बापाने केला चिमुकलीचा खून
  • मुलालाही मृत समजून जंगलात फेकले
आळेफाटा : कौटुंबिक वाद, पत्नी घर सोडून गेल्याचे नैराश्य आणि घरातील सततच्या किरकिरीतून एका पित्याने स्वतःच्या लेकरांवरच जीवघेणा हल्ला केल्याची हृदयद्रावक घटना जुन्नर तालुक्यातील संतवाडी परिसरात उघडकीस आली आहे. तीन वर्षांच्या चिमुकलीचा गळा दाबून खून करण्यात आला असून, पाच वर्षांच्या मुलालाही ठार मारल्याचा समज करून जंगलात टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

 

या प्रकरणामुळे संपूर्ण जुन्नर तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी सागर सदाशिव शिंदे (वय २९, रा. गायकवाड वस्ती, मोशी, ता. हवेली, जि. पुणे) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर शिंदे याची पत्नी सुमारे सहा महिन्यांपूर्वी त्याला आणि मुलांना सोडून गेली होती. त्यानंतर घरातील वाद आणि मानसिक तणाव वाढत होता. या नैराश्यातून आरोपीने ५ मे रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास संतवाडी (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत पुणे-नाशिक महामार्गालगतच्या जंगल परिसरात आपल्या मुलांवर हल्ला केला. यामध्ये मुलगा आर्यन सागर शिंदे (वय ५) याचा गळा दाबून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. तो मृत झाल्याचे समजून आरोपीने त्याला जंगलात सोडून दिले. तर मुलगी हर्षदा सागर शिंदे (वय ३.५) हिचा गळा दाबून खून करून तिचा मृतदेह झाडाझुडपांत फेकून दिल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पन्हाळकर पुढील तपास करीत आहे.

हे सुद्धा वाचा : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर कारचा भीषण अपघात, महिलेचा मृत्यू; जखमींचा आकडाही आला समोर

आळेफाटा पोलिसांकडून तपास

घटनेची माहिती समोर आल्यानंतर आळेफाटा पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल ओंकार अशोक खुणे यांनी फिर्याद दिली आहे. दिनांक ७ मे रोजी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीचा यापूर्वी कोणताही गुन्हेगारी इतिहास नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Web Title: A shocking incident has taken place in junnar taluka where a father murdered his daughter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 01:01 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
1

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
2

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
3

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
4

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.