Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंपरी-चिंचवडमध्ये टिप्परचा कहर, एकाच दिवशी तीन अपघात; एकाचा मृत्यू

पिंपरी-चिंचवड शहरातील बेफाम व अनियंत्रित टिप्पर वाहतुकीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, सोमवारी एकाच दिवशी घडलेल्या तीन भीषण अपघातांनी संतापाची लाट उसळली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 07, 2026 | 05:49 PM
पिंपरी-चिंचवडमध्ये टिप्परचा कहर, एकाच दिवशी तीन अपघात; एकाचा मृत्यू

पिंपरी-चिंचवडमध्ये टिप्परचा कहर, एकाच दिवशी तीन अपघात; एकाचा मृत्यू

Follow Us
Follow Us:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील बेफाम व अनियंत्रित टिप्पर वाहतुकीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, सोमवारी एकाच दिवशी घडलेल्या तीन भीषण अपघातांनी संतापाची लाट उसळली आहे. या अपघातांमध्ये एका निष्पाप नागरिकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. बर्ड व्हॅली चौक येथे झालेला अपघात सर्वाधिक धक्कादायक ठरला. भरधाव टिप्परने धडक दिल्याने एका नागरिकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

 

विशेष म्हणजे, या ठिकाणी शाळा असूनही वाहतूक नियंत्रणाच्या आवश्यक सुविधा अपुऱ्या असल्याचे समोर आले आहे. याच चौकात एकाच दिवशी सलग अपघात होणे ही प्रशासनाच्या दृष्टीने गंभीर बाब मानली जात आहे. या घटनांची दखल घेत आमदार अमित गोरखे यांनी तातडीने पोलीस आयुक्त व महापालिका प्रशासनाशी संपर्क साधून ठोस उपाययोजनांची मागणी केली आहे. “बर्ड व्हॅली चौकात कायम वाहतूक कोंडी असते. झेब्रा क्रॉसिंगची अवस्था बिकट आहे, तसेच सिग्नल व योग्य स्पीड ब्रेकरचा अभाव आहे. अशा परिस्थितीत अपघात टाळणे कठीण आहे,” असे त्यांनी सांगितले.

गोरखे यांनी शहरातील जड वाहनांवर निर्बंध आणण्याची गरज अधोरेखित केली. रहिवासी भाग व शाळांच्या परिसरात टिप्परच्या वेगावर नियंत्रण ठेवणे, सिग्नल, झेब्रा क्रॉसिंग व गतिरोधक बसविणे, तसेच गर्दीच्या वेळेत जड वाहनांच्या प्रवेशावर कडक नियम लागू करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. अपघातप्रवण ठिकाणी विशेष गस्त व वाहतूक रक्षक नेमण्याची मागणी करत, “केवळ सांत्वन न करता ठोस कृती करणे गरजेचे आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात,” असेही गोरखे यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा : गुंजवणीच्या पाण्यासाठी मी किडनी घालवली, पण…; विजय शिवतारेंनी रुग्णालयातून व्यक्त केल्या भावना

​ओतूरमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी घटना!

जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील मोनिका चौकात शुक्रवारी सकाळी ट्रक आणि स्कुटी यांच्यात झालेल्या भीषण धडकेत एका २८ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी अंत झाला आहे. स्नेहल रवींद्र अहिनवे (रा. अहिनेवाडी, ता. जुन्नर) असे मृत तरुणीचे नाव आहे. या अपघाताचा अंगावर काटा आणणारा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. शुक्रवारी (दि. ३) सकाळी ११: २० ते ११:३० च्या सुमारास स्नेहल अहिनवे या आपल्या सासऱ्यांसोबत स्कुटीने मोनिका चौकातून जात होत्या. यावेळी कल्याणकडून ओतूरकडे येणाऱ्या एका भरधाव ट्रकने स्कुटीला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, स्कुटीच्या मागील सीटवर बसलेल्या स्नेहल या रस्त्यावर फेकल्या गेल्या आणि दुर्दैवाने ट्रकचे पाठीमागील चाक त्यांच्या डोक्यावरून गेले. यात त्यांना गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला. ​अपघात घडताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत स्नेहल यांना जवळच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Web Title: A shocking incident has taken place in pimpri chinchwad where three accidents occurred on the same day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 05:49 PM

Topics:  

  • Accident Death
  • Accident News
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

Accident News: कंटेनरच्या चाकात अडकली दुचाकी; ३ किमी फरफटत गेली, आईसह दोन चिमुकल्यांचा करुण अंत
1

Accident News: कंटेनरच्या चाकात अडकली दुचाकी; ३ किमी फरफटत गेली, आईसह दोन चिमुकल्यांचा करुण अंत

Accident News: अलंग शिपब्रेकिंग यार्डकडे कामावर जात असताना काळाचा घाला; सहा कर्मचाऱ्यांचा मृत्यू, एक गंभीर
2

Accident News: अलंग शिपब्रेकिंग यार्डकडे कामावर जात असताना काळाचा घाला; सहा कर्मचाऱ्यांचा मृत्यू, एक गंभीर

Accident News: रस्ता समजून पुढे गेले अन् थेट गटारीत कोसळले; ३७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
3

Accident News: रस्ता समजून पुढे गेले अन् थेट गटारीत कोसळले; ३७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Accident News: भरधाव कारला डंपरची भीषण धडक; मध्यरात्रीच्या अपघातात चौघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी
4

Accident News: भरधाव कारला डंपरची भीषण धडक; मध्यरात्रीच्या अपघातात चौघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.