Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! पुण्यात डंपर पलटी होऊन 2 विद्यार्थिनींचा मृत्यू, शरीराचे तुकडे फावड्याने…

भरधाव जाणारा रेडिमिक्स डंपर वळण घेताना अचानक पलटी झाला. त्याचवेळी दुचाकीवरून चाललेल्या दोन विद्यार्थिनी डंपरखाली सापडल्या आणि चिरडल्या गेल्या.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 25, 2025 | 05:12 PM
धक्कादायक! पुण्यात डंपर पलटी होऊन 2 विद्यार्थिनींचा मृत्यू, शरीराचे तुकडे फावड्याने...

धक्कादायक! पुण्यात डंपर पलटी होऊन 2 विद्यार्थिनींचा मृत्यू, शरीराचे तुकडे फावड्याने...

Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : भीषण अपघातात दोन विद्यार्थिनींचा दुर्दैवी बळी गेला आहे. भरधाव जाणारा रेडिमिक्स डंपर वळण घेताना अचानक पलटी झाला. त्याचवेळी दुचाकीवरून चाललेल्या दोन विद्यार्थिनी डंपरखाली सापडल्या आणि चिरडल्या गेल्या. दोन्ही विद्यार्थिनींचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. ही घटना हिंजवडी – माण रस्त्यावरील वडजाईनगर कॉर्नरजवळ शुक्रवारी (दि. २४) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. डंपरचालकाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

प्रांजली महेश यादव (वय २२, रा. गोदरेज प्रॉपर्टीज, म्हाळूंगे, ता. मुळशी, मुळ – टेंभूर्णी, ता. माढा, जि. सोलापूर) आणि अश्लेषा नरेंद्र गावंडे (वय २२, रा. गोदरेज प्रॉपर्टीज, म्हाळूंगे, ता. मुळशी, मुळ – शेगाव, रहाटगाव रोड, अमरावती) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोन विद्यार्थिनींची नावे आहेत. सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र कुराडे यांनी याबाबत माहिती दिली.

प्रांजली आणि अश्लेषा या एमआयटी कॉलेजध्ये विज्ञान शाखेत शेवटच्या वर्षात शिकत होत्या. शुक्रवारी सायंकाळी त्या दुचाकीवरून चालल्या होत्या. हिंजवडी – माण रस्त्यावर वडजाईनगर कॉर्नरजवळ बेदरकारपणे वाहन चालवत भरधाव आलेल्या डंपर चालकाचे वळणावर नियंत्रण सुटले आणि डंपर पलटी झाला. याचवेळी तेथून चाललेल्या दुचाकीस्वार प्रांजली आणि अश्लेषा या डंपरखाली सापडल्या. या भीषण अपघातात दोन्ही तरूणींचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. अपघाताची माहिती मिळताच हिंजवडी पोलीस, वाहतूक पोलीस, आणि अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. तीन क्रेनच्या मदतीने डंपर बाजूला घेण्याचे काम करण्यात आले. या अपघातामुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली. त्यामुळे रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. दरम्यान, २२ वर्षीय डंपरचालकाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

डंपरमध्ये ३२ टन सिमेंट

पलटी झालेल्या डंपरमध्ये तब्बल ३२ टन सिमेंट भरलेले होते. भरधाव चाललेल्या डंपरचालकाचे वळणावर नियंत्रण सुटल्याने डंपर पलटी झाला आणि ३२ टनाच्या या बोजाखाली दबल्या गेल्याने दोन्ही तरूणींचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. छिन्नविछीन्न अवस्थेतील त्यांच्या मृतदेहाचे तुकडे फावड्याने गोळा करताना अग्निशमन दलाच्या जवानांनाही गहिवरून येत होते.

हे सुद्धा वाचा : पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; आता सायबर गुन्हेगारांना रोखण्यासाठी काढला तोडगा

वेळ आली होती पण काळ नाही

भरधाव डंपर दोन तरूणींच्या अंगावर पलटी झाला, त्याचवेळी तेथून एक तरूणही दुचाकीवरून चालला होता. मात्र, डंपर पलटी होत असल्याचे पाहताच त्याने दुचाकी सोडून पळ काढला आणि तो बालंबाल बचावला. एक फुट जर तो तरूण पुढे गेला असता तर तो सुद्धा डंपरखाली सापडला असता.

Web Title: A shocking incident has taken place in pune where a dumper overturned and 2 female students died nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2025 | 05:12 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pune Accident

संबंधित बातम्या

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली; सरकारचा मोठा निर्णय
1

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली; सरकारचा मोठा निर्णय

आरक्षण बचावसाठी आदिवासींचा विराट मोर्चा, धनगर आणि बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेशाला विरोध
2

आरक्षण बचावसाठी आदिवासींचा विराट मोर्चा, धनगर आणि बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेशाला विरोध

२०८ गावांमधील भात पीक नुकसानीचे पंचनामे सुरु, ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी कर्मचारी शेतीच्या बांधावर
3

२०८ गावांमधील भात पीक नुकसानीचे पंचनामे सुरु, ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी कर्मचारी शेतीच्या बांधावर

Cabinet Meeting: फडणवीस सरकारचा धडाका! मंत्रिमंडळ बैठकीत घेतले 5 महत्त्वाचे मोठे निर्णय
4

Cabinet Meeting: फडणवीस सरकारचा धडाका! मंत्रिमंडळ बैठकीत घेतले 5 महत्त्वाचे मोठे निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.