Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Alephata Crime News: आळेफाटा परिसरात खळबळ! २६ वर्षांच्या तरुणाकडे सापडला गावठी कट्टा अन् जिवंत काडतुसे!

Alephata Crime News: आळेफाट्यातील संतवाडी रोडवर एक तरुण संशयास्पदरीत्या फिरत होता... स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळताच त्यांनी सापळा रचला आणि झडती घेताच पोलिसांचे डोळे विस्फारले! तरुणाकडे आढळला गावठी कट्टा अन् दोन जिवंत काडतुसे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 30, 2026 | 03:23 PM
Alephata Crime News: आळेफाटा परिसरात खळबळ! २६ वर्षांच्या तरुणाकडे सापडला गावठी कट्टा अन् जिवंत काडतुसे!

Alephata Crime News: आळेफाटा परिसरात खळबळ! २६ वर्षांच्या तरुणाकडे सापडला गावठी कट्टा अन् जिवंत काडतुसे!

Follow Us
Follow Us:
  • आळेफाट्यातील संतवाडी रोडवर तरुणाला बेकायदेशीर कट्ट्यासह पकडले
  • ऋषीकेश गणेश पाडेकर याच्याकडे कट्टा व २ जिवंत काडतुसे सापडली
  • आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 
Alephata Crime News: जुन्नर तालुक्यातील आळेफाटा परिसरात बेकायदेशीररीत्या गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. संतवाडी रोडवर केलेल्या या धडक कारवाईत आरोपीकडून एक पिस्तूल (गावठी कट्टा) आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंगझडतीत सापडले घातक शस्त्र

अटक करण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव ऋषीकेश गणेश पाडेकर (वय २६, रा. संतवाडी, ता. जुन्नर) असे आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी जिल्ह्यातील अवैध शस्त्रास्त्रांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले आहेत. त्यानुसार LCB चे पथक जुन्नर विभागात गस्त घालत असताना, आळेफाटा-संतवाडी रस्त्यावर एका तरुणाकडे बेकायदेशीर गावठी कट्टा असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली. पोलिसांनी लागलीच सापळा रचून ऋषीकेश याला ताब्यात घेतले. त्याची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे आढळून आली.

हेही वाचा: Dr Shirish Hiremath Death: ४० हजारांहून अधिक अँजिओप्लास्टी करणारे प्रख्यात डॉ. शिरीष हिरेमठ काळाच्या पडद्याआड!

आळेफाटा पोलिसांत गुन्हा दाखल

स्थानिक गुन्हे शाखेने हे सर्व बेकायदेशीर शस्त्रसाठा तात्काळ जप्त केला असून, आरोपी ऋषीकेश पाडेकर याला पुढील तपासासाठी आळेफाटा पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक साबळे यांनी फिर्याद दिली असून आळेफाटा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही धडक कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, विश्वास जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक साबळे, पोलीस हवालदार संदीप वारे, राजू मोमीन, अमित माळुंजे, पंकज पारखे, विनोद गायकवाड, तसेच पोलीस शिपाई अक्षय नवले, अभिमन्यू मोटे आणि ओमकार खुणे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

हेही वाचा: Lonavala Station News: तिकीट विचारले म्हणून टीसीवर हल्ला; व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल!

💡

Frequently Asked Questions

  • Que: आळेफाट्यात कोणाला आणि का अटक करण्यात आली?

    Ans: ऋषीकेश गणेश पाडेकर (वय २६) या तरुणाला बेकायदेशीररीत्या गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली.

  • Que: ही कारवाई कोणी आणि कुठे केली?

    Ans: ही कारवाई पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) आळेफाटा परिसरातील संतवाडी रोडवर केली.

  • Que: आरोपीकडून काय काय जप्त करण्यात आले?

    Ans: आरोपीकडून एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Web Title: Alephata crime news lcb seizes gavthi katta arrests youth on santwadi road sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • crime news
  • junnar news

संबंधित बातम्या

आधी तरुणी बनून मैत्री, नंतर पोलिस बनून ब्लॅकमेलिंग; पुण्यातील आत्महत्या प्रकरणाचा उलगडा
1

आधी तरुणी बनून मैत्री, नंतर पोलिस बनून ब्लॅकमेलिंग; पुण्यातील आत्महत्या प्रकरणाचा उलगडा

Pune Police News: वरिष्ठ निरीक्षकासह तिघे निलंबित, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा दणका
2

Pune Police News: वरिष्ठ निरीक्षकासह तिघे निलंबित, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा दणका

Ganja Farming Case: छत्रपती संभाजीनगरमध्ये गांजाची शेती; 52 लाखांचा मुद्देमाल जप्त, शेतकरी अटकेत
3

Ganja Farming Case: छत्रपती संभाजीनगरमध्ये गांजाची शेती; 52 लाखांचा मुद्देमाल जप्त, शेतकरी अटकेत

Sambhajinagar Crime: ‘शॉर्टकटने नेतो’ म्हणाला अन् निर्जन स्थळी नेले; ३० वर्षीय महिलेवर रिक्षाचालकाचा अत्याचार
4

Sambhajinagar Crime: ‘शॉर्टकटने नेतो’ म्हणाला अन् निर्जन स्थळी नेले; ३० वर्षीय महिलेवर रिक्षाचालकाचा अत्याचार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.