Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे पोलिस आयुक्तांचा सलग दुसऱ्या दिवशी दणका! आणखी चार पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन; दोन दिवसांत आठ जणांवर कारवाई

कामात हलगर्जीपणा तसेच मलिदा खाण्यासाठी केलेला खटाटोप अशा वेगवेगळ्या प्रकरणात पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सलग दुसऱ्या दिवशी दणका देत एका अधिकाऱ्यासह चौघांचे निलंबन केले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 30, 2026 | 05:13 PM
पुणे पोलिस आयुक्तांचा सलग दुसऱ्या दिवशी दणका! आणखी चार पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन; दोन दिवसांत आठ जणांवर कारवाई

पुणे पोलिस आयुक्तांचा सलग दुसऱ्या दिवशी दणका! आणखी चार पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन; दोन दिवसांत आठ जणांवर कारवाई

Follow Us
Follow Us:
  • दोन दिवसांत आठ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निलंबन
  • बंडगार्डनमधील दोन पोलिसांवर कारवाई
  • पुणे पोलिस आयुक्तांचा दणका
पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कामात हलगर्जीपणा तसेच मलिदा खाण्यासाठी केलेला खटाटोप अशा वेगवेगळ्या प्रकरणात पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सलग दुसऱ्या दिवशी दणका देत एका अधिकाऱ्यासह चौघांचे निलंबन केले आहे. दोन दिवसात आठ जणांचे विविध कारणांमुळे निलंबन झाल्याने पोलिस दलात मोठी खळबळ देखील उडाली आहे.

 

बंडगार्डन पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक अमोल धुमाळ तसेच पोलिस हवालदार तुषार आल्हाट यांना निलंबित करण्यात आले आहे. बंडगार्डन पोलिसांत एका हॉटेलविरोधात आप्रवास आणि परदेशी नागरिक अधिनियम, २०२५ गुन्हा नोंद आहे. यागुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक अमोल धुमाळ यांच्याकडे होता. तर, पोलिस हवालदार आल्हाट हे धुमाळ यांचे मदतनीस म्हणून कर्तव्य बजावतात. या गुन्ह्यात परकीय नागरिकांच्या वास्तव्याची माहिती देण्यासंदंर्भात या गुन्ह्यात स्टाफपासून जीएम (जनरल मॅनेजर) पर्यंत एकूण पाच आरोपी होते.

दरम्यान, गुन्ह्याच्या तपासादरम्यान हॉटेल मॅनेजर तेजस धुळबुळू हे चौकीत भेटण्यास आले होते. त्यावेळी या गुन्ह्यात पाच आरोपी असताना आरोपी संख्या कमी करण्यासाठी तसेच एकालाच कोणाला तरी अटक करण्यासाठी उपनिरीक्षक धुमाळ यांनी मॅनेजर तेजस धुळबूळ यांना काही एक न बोलता हातांची दोन बोटे दाखविली. नंतर मदतनीस आल्हाट हे तुमच्याशी बोलतील असे सांगितले. त्यानंतर आल्हाट यांनी दोन बोटे म्हणजे दोन लाख रुपये द्यावे लागतील असे समोर आले. यासंदंर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर दोघांचेही निलंबन करण्यात आले आहे.

५ हजारांची मागणी करणारा कर्मचारी निलंबित

पोलिस मुख्यालयात नेमणूक असताना देखील मुंबई-बेंगलोर महामार्गावर गणवेशात थांबून कंटेनर चालकाकडे ५ हजार रुपयांची मागणी करणाऱ्या पोलिस शिपाई बाबुराव पोपट ढोले याला निलंबित केले आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांत गुन्हा नोंद असून, याप्रकरणी बाबुराव ढोले याला अटक केली आहे. मुख्यालयाचे पोलिस उपायुक्त पी. आर. पाटील यांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत.

हे सुद्धा वाचा : प्रवाशांच्या सुविधांमध्ये पुणे विमानतळ देशात अव्वल; 5 पैकी 4.98 गुणांसह पटकावला पहिला क्रमांक

अल्पवयीन मुलीला मारहाणप्रकरणी निलंबित

मांजरी भागातील अल्पवयीन मुलाला मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणात गुन्हा नोंद झाल्यानंतर लक्ष्मीनगर पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार राहुल चौधरी याला निलंबित करण्यात आले आहे. परिमंडळ चारचे उपायुक्त चिलूमूला रजनिकांत यांनी निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुणे पोलिस दलात दोन दिवसांत किती कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले?

    Ans: पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कारवाईत दोन दिवसांत एकूण आठ पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे विविध कारणांमुळे निलंबन करण्यात आले.

  • Que: बंडगार्डन पोलिस ठाण्यातील कोणत्या कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली?

    Ans: पोलिस उपनिरीक्षक अमोल धुमाळ आणि पोलिस हवालदार तुषार आल्हाट यांना हॉटेलमधील गुन्ह्याच्या तपासादरम्यान दोन लाख रुपयांची मागणी केल्याच्या प्रकरणात निलंबित करण्यात आले.

  • Que: अन्य कोणत्या कारणांमुळे पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले?

    Ans: महामार्गावर कंटेनर चालकाकडे पाच हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी पोलिस शिपाई बाबुराव ढोले, तर अल्पवयीन मुलाला मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी पोलिस हवालदार राहुल चौधरी यांना निलंबित करण्यात आले.

Web Title: The pune police commissioner has taken action against several police personnel nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 05:13 PM

Topics:  

  • Amitesh Kumar
  • pune news
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

पुणे पोलिसांची मोठी कारवाई! एमडी आणि गांजा विक्रीच्या तयारीत असलेल्या चौघांना ठोकल्या बेड्या
1

पुणे पोलिसांची मोठी कारवाई! एमडी आणि गांजा विक्रीच्या तयारीत असलेल्या चौघांना ठोकल्या बेड्या

Table Tennis: टेबल टेनिसमध्ये युवा खेळाडूंचा जलवा! आरव, शरण्यासह पाच जणांची विजेतेपदाला गवसणी
2

Table Tennis: टेबल टेनिसमध्ये युवा खेळाडूंचा जलवा! आरव, शरण्यासह पाच जणांची विजेतेपदाला गवसणी

Pune City Water Quota: पुण्याच्या पाणी कोट्याचा फैसला ‘वर्षा’वरच!; पालिकेची १८ टीएमसीची मागणी अन् नियोजन १३ टीएमसीचे
3

Pune City Water Quota: पुण्याच्या पाणी कोट्याचा फैसला ‘वर्षा’वरच!; पालिकेची १८ टीएमसीची मागणी अन् नियोजन १३ टीएमसीचे

Dr Shirish Hiremath Death: ४० हजारांहून अधिक अँजिओप्लास्टी करणारे प्रख्यात डॉ. शिरीष हिरेमठ काळाच्या पडद्याआड!
4

Dr Shirish Hiremath Death: ४० हजारांहून अधिक अँजिओप्लास्टी करणारे प्रख्यात डॉ. शिरीष हिरेमठ काळाच्या पडद्याआड!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.