Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

​ओतूरमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी घटना! ट्रकच्या चाकाखाली चिरडून तरुणीचा मृत्यू

जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील मोनिका चौकात शुक्रवारी सकाळी ट्रक आणि स्कुटी यांच्यात झालेल्या भीषण धडकेत एका २८ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी अंत झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 03, 2026 | 05:35 PM
​ओतूरमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी घटना! ट्रकच्या चाकाखाली चिरडून तरुणीचा मृत्यू

​ओतूरमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी घटना! ट्रकच्या चाकाखाली चिरडून तरुणीचा मृत्यू

Follow Us
Follow Us:

​ओतूर/मनोहर हिंगणे : जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील मोनिका चौकात शुक्रवारी सकाळी ट्रक आणि स्कुटी यांच्यात झालेल्या भीषण धडकेत एका २८ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी अंत झाला आहे. स्नेहल रवींद्र अहिनवे (रा. अहिनेवाडी, ता. जुन्नर) असे मृत तरुणीचे नाव आहे. या अपघाताचा अंगावर काटा आणणारा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

 

​मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. ३) सकाळी ११: २० ते ११:३० च्या सुमारास स्नेहल अहिनवे या आपल्या सासऱ्यांसोबत स्कुटीने मोनिका चौकातून जात होत्या. यावेळी कल्याणकडून ओतूरकडे येणाऱ्या एका भरधाव ट्रकने स्कुटीला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, स्कुटीच्या मागील सीटवर बसलेल्या स्नेहल या रस्त्यावर फेकल्या गेल्या आणि दुर्दैवाने ट्रकचे पाठीमागील चाक त्यांच्या डोक्यावरून गेले. यात त्यांना गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला.

​अपघात घडताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत स्नेहल यांना जवळच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ​घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव, पोलीस हवालदार भारती भवारी, शामसुंदर जायभाये, किशोर बर्डे, धनंजय पालवे, विश्वास केदार आणि ट्रॅफिक वॉर्डन शुभम काशीद यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली असून, पंचनाम्याची कार्यवाही पूर्ण केली आहे.​ भरवस्तीत आणि वर्दळीच्या चौकात झालेल्या या भीषण अपघातामुळे ओतूर परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. स्नेहल यांच्या अकाली निधनाने अहिनवे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान या घटनेचा पुढील तपास ओतूर पोलीस करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनचा अपघात; चालकाचे नियत्रंण सुटले अन् थेट…

जालन्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

जालन्यात समृद्धी महामार्गावर बुधवारी झालेल्या भीषण अपघातामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. प्राथमिक माहितीनुसार, समृद्धी महामार्गावरील कडवंची गावाजवळ हा अपघात झाला. कडवंची गावाकडून जालना शहराकडे येणाऱ्या मजुरांच्या पिक अपला मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत आठ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सहा महिलांचा समावेश आहे. या महिला समृद्धी महामार्गावर सफाईचे काम करत होत्या. काम आटोपून या महिला पिकअप व्हॅनमध्ये बसल्या होत्या. त्यावेळी मुंबईच्या दिशेने निघालेल्या भरधाव ट्रकने पिकअप व्हॅनला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, आठ महिलांनी जागेवरच प्राण सोडला.

Web Title: A shocking incident has taken place in which a young woman died in a serious accident in otur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 05:35 PM

Topics:  

  • Accident Death
  • Accident News

संबंधित बातम्या

Accident News: कंटेनरच्या चाकात अडकली दुचाकी; ३ किमी फरफटत गेली, आईसह दोन चिमुकल्यांचा करुण अंत
1

Accident News: कंटेनरच्या चाकात अडकली दुचाकी; ३ किमी फरफटत गेली, आईसह दोन चिमुकल्यांचा करुण अंत

Accident News: अलंग शिपब्रेकिंग यार्डकडे कामावर जात असताना काळाचा घाला; सहा कर्मचाऱ्यांचा मृत्यू, एक गंभीर
2

Accident News: अलंग शिपब्रेकिंग यार्डकडे कामावर जात असताना काळाचा घाला; सहा कर्मचाऱ्यांचा मृत्यू, एक गंभीर

Accident News: रस्ता समजून पुढे गेले अन् थेट गटारीत कोसळले; ३७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
3

Accident News: रस्ता समजून पुढे गेले अन् थेट गटारीत कोसळले; ३७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Accident News: भरधाव कारला डंपरची भीषण धडक; मध्यरात्रीच्या अपघातात चौघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी
4

Accident News: भरधाव कारला डंपरची भीषण धडक; मध्यरात्रीच्या अपघातात चौघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.