Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यातील गुंडागिरी संपेना! तरुणाच्या गळ्याला कोयता लावला अन्…

सिंहगड रोड भागात तरुणाला ‘गाडी हळू का चालवतोय, म्हणत त्याची गाडी अडवून दोघांनी त्याच्या गळ्याला कोयता लावत 50 हजारांची रोकड लुटून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 15, 2024 | 04:23 PM
पुण्यातील गुंडागिरी संपेना! तरुणाच्या गळ्याला कोयता लावला अन्...

पुण्यातील गुंडागिरी संपेना! तरुणाच्या गळ्याला कोयता लावला अन्...

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : सिंहगड रोड भागात तरुणाला ‘गाडी हळू का चालवतोय, म्हणत त्याची गाडी अडवून दोघांनी त्याच्या गळ्याला कोयता लावत 50 हजारांची रोकड लुटून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कॅनॉल रोड परिसरात ही घटना घडली असून, ऐन गर्दीच्या वेळीच हा प्रकार घडल्याने नागरिक व येथून जाणाऱ्या वाहन चालकामध्ये भितीचे वातावरण आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका २५ वर्षीय तरूणाने तक्रार दिली आहे. शुक्रवारी (दि.१३) रात्री पावणेदहाच्या सुमारास विठ्ठलवाडी ते वडगाव दरम्यान असलेल्या कॅनॉल रस्त्यावरील संतोष हॉलकडे जाणार्‍या रोडवर ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, तक्रारदार तरुण शुक्रवारी रात्री दुचाकीवरून घरी निघाला होता. त्यावेळी त्याच्या पाठीमागून दुसर्‍या दुचाकीवर दोघे आले. ती गाडी चालवणाऱ्याने ‘गाडी हळू का चालवतोय, असे म्हणून तरुणाला दम दिला. शिवीगाळ केली. त्यामुळे या तरुणाने गाडी थांबविली. आरोपींनी त्यांची दुचाकी आडवी लावली. त्यानंतर गाडीवरून खाली उतरून यातील एकाने शिवीगाळ करीत गळ्याला कोयता लावला. तसेच धमकावत खिशात असलेली ५० हजारांची रोकड जबरदस्तीने काढून दोघांनी पळ काढल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर पुढील तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : शेतकऱ्याच्या घरी भरदिवसा चोरी; दागिन्यांसह साडेतीन लाखांचा ऐवज चोरला

राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले

राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये जुन्या भांडणाच्या कारणातून 26 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. ही घटना सोमवारी (दि.2) सायंकाळी हसूल परिसरातील कारागृहाच्या बाजूच्या मैदानावर घडली. दिनेश उर्फ बबलू परमानंद मोरे (वय 26, रा. चेतनानगर, हसूल) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी अनिकेत गायकवाड व गणेश सोनवणे यांची नावे समोर आली असून, शोधासाठी चार पथके रवाना झाली. या हत्येप्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दोन तरुणांवर कोयत्याने वार

गेल्या काही दिवसाखाली भरदुपारी कर्वे रस्त्यावरील प्रसिद्ध महाविद्यालय परिसरात फिल्मीस्टाईल टोळक्याने हातात कोयते घेऊन पाठलाग करत दोन तरुणांवर कोयत्याने वार केले. यात एका तरुणाची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर, दुसऱ्याला डोक्यात वार करून जखमी केले आहे. भरदुपारी घडलेल्या याघटनेमुळे महाविद्यालय परिसरात चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. धक्कादायक म्हणजे, मैत्रिणीबद्दल अफवा पसरवतोय या संशयावरून टोळक्याने वार केले आहेत. घटनेची माहिती मिळताच परिमंडळ एकचे उपायुक्त संदिपसिंह गिल्ल व डेक्कन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी असलेल्या तरुणांकडे चौकशी केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, पसार झालेल्या तरुणांचा शोध घेतला जात आहे.

Web Title: A shocking incident has taken place where a young man was threatened with a coyote and robbed of cash nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2024 | 04:23 PM

Topics:  

  • crime news
  • maharashtra
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Mumbai Metro 3 मध्ये बुलेट ट्रेन स्टेशन आणि रेसकोर्सला जोडणारे दोन नवीन सबवे बांधले जाणार, जाणून घ्या संपूर्ण आराखडा
1

Mumbai Metro 3 मध्ये बुलेट ट्रेन स्टेशन आणि रेसकोर्सला जोडणारे दोन नवीन सबवे बांधले जाणार, जाणून घ्या संपूर्ण आराखडा

Anmol Bishnoi News: कुख्यात गँगस्टर अनमोल बिश्नोईला दणका; कोर्टाने सुनावली 11 दिवसांची कोठडी, आता NIA…
2

Anmol Bishnoi News: कुख्यात गँगस्टर अनमोल बिश्नोईला दणका; कोर्टाने सुनावली 11 दिवसांची कोठडी, आता NIA…

Crime News: नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या बाईकर्सवर गुन्हा; नेरूळ पोलिसांची कारवाई
3

Crime News: नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या बाईकर्सवर गुन्हा; नेरूळ पोलिसांची कारवाई

प्रवासी महिलांचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद; तब्बल ‘इतक्या’ लाखांचा मुद्देमाल जप्त
4

प्रवासी महिलांचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद; तब्बल ‘इतक्या’ लाखांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.