
सीएनजी पंपावर रिक्षा रांगेत लावण्यावरुन वाद, रिक्षाचालकावर शस्त्राने वार; पुण्यातील घटनेनं खळबळ
सुयोग दादाजी जाधव (वय ४९, रा. माळवाडी वस्ती, लोहगाव) असे गंभीर जखमी झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. या प्रकरणी रिक्षाचालक सुहास मारुती पालवे (वय २६, रा. वैष्णवी पार्क, गाडे वस्ती, वाघोली) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत जाधव यांनी लोहगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक जाधव हे लोहगाव-वाघोली रस्त्यावरील सीएनजी पेट्रोल पंपावर गुरुवारी (१७ सप्टेंबर) सकाळी साडेनऊच्या सुमारास आले होते. सीएनजी भरण्यासाठी त्यांनी रिक्षा रांगेत लावली होती. त्यावेळी रिक्षा रांगेत लावण्यावरुन वाद झाला. रिक्षाचालक पालवे याने शिवीगाळ केली. रिक्षात ठेवलेल्या तीक्ष्ण शस्त्राने जाधव यांच्यावर त्याने वार केले. जाधव हे जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पसार झालेला रिक्षाचालक पालवे याला अटक करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक शिंदे तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : अहिल्यानगरमध्ये २ भयानक घटना! महिलेसह तरुणीवर अत्याचार; वॉशरुमचा दरवाजा ढकलला अन्…
जामखेड तालुक्यात भरदिवसा रक्तरंजित थरार!
खर्डा येथील जातेगाव फाट्याजवळ शुक्रवारी (दि. ११) सकाळी सव्वानऊच्या सुमारास दूध वाहतूक करणाऱ्या चालकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यात गंभीर जखमी झालेल्या चालकाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला आहे. भरदिवसा घडलेल्या खुनामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तानाजी भास्कर बोराटे (वय ४०, रा. माळेवाडी, ता. भूम) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. बोराटे हे माळेवाडी येथील कैलास धर्मा आल्हाट यांच्या पिकअपवर (एमएच १२ केपी ५६२६) चालक होते. ते रोज संकलित दूध घेऊन खर्डा येथे येत होते. शुक्रवारी ते नेहमीप्रमाणे दूध घेऊन आले होते. काही अनोळखी व्यक्तींनी त्यांना जातेगाव फाट्याजवळ बोलावून घेतल्याची माहिती आहे. जातेगाव फाट्याजवळ बोराटे आणि संशयितांत काही कारणावरून वाद झाल्याचे समोर आली आहे. बोराटे यांना मारहाण करताना एकाने त्यांच्या मानेवर कोयत्याने वार केल्याने बोराटे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले.