Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 14 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांच्या वाहनावर हल्ला, संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ; नेमकं काय घडलं?

पैठण येथील न्यायालयीन कामकाज आटोपून छत्रपती संभाजीनगरकडे परतणाऱ्या मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांच्या वाहनावर हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. यावेळी वाहन चालकाला कड्याने मारहाण करण्यात आली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 01, 2026 | 02:58 PM
Crime News: ‘पत्नीशी संबंध असल्याचा संशय’; तरुणाला शेतात नेले अन् फरशी-दगडाने ठेचून...

Crime News: ‘पत्नीशी संबंध असल्याचा संशय’; तरुणाला शेतात नेले अन् फरशी-दगडाने ठेचून...

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : पैठण येथील न्यायालयीन कामकाज आटोपून छत्रपती संभाजीनगरकडे परतणाऱ्या मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांच्या वाहनावर हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. यावेळी वाहन चालकाला कड्याने मारहाण करण्यात आली. तर वाहनावर हातोड्याने हल्ला करुन वाहनाच्या दरवाज्याचे नुकसान करण्यात आले आहे. ही घटना २९ सप्टेंबर रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास विट्स हॉटेल चौकात घडली आहे. या प्रकरणात मारहाण करुन कारचे नुकसान करणाऱ्या दोघां अज्ञातांविरोधात वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या प्रकरणात शेख एकबाल शेख इब्राहिम (वय ४६, रा. गल्ली क्रं.२२, बायजीपुरा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, फिर्यादी हे जिल्हा न्यायालयात शिपाई म्हणून कार्यरत आहेत. ते सध्या मुख्य न्याय दंडाधिकारी आर.एस. जांबोटकर यांच्या शासकीय वाहनावर चालक म्हणून कार्यरत आहेत. सोमवारी सकाळी नियमित ड्युटीवर आल्यानंतर त्यांनी जांबोटकर यांना त्यांच्या निवासस्थानावरून न्यायालयात आणले. त्यानंतर न्यायालयीन कामकाज व निरीक्षणासाठी जांबोटकर यांच्यासह वरिष्ठ लिपिक वैद्य आणि शिपाई साहेबराव पाटील यांना घेऊन ते शासकीय वाहनाने पैठण न्यायालयात गेले होते. पैठण येथील कामकाज आटोपल्यानंतर चौघेही शासकीय वाहनाने छत्रपती संभाजीनगरकडे परतत होते. सायंकाळी साडेचारच्या सुमारास रेल्वे स्टेशन रोडवरील विट्स हॉटेल चौकात वाहन आले असता अचानक एक दुचाकी वाहनासमोर आल्याने चालकाने गाडी थांबविली. त्यावेळी वाहनातील शिपाई साहेबराव पाटील यांनी दुचाकी बाजूला घेण्याचा हाताने इशारा केला.

चालकाला कड्याने तर कारवर होताड्याने हल्ला

याचा राग आल्याने दुचाकीस्वार खाली उतरला आणि शिवीगाळ करीत शासकीय वाहनाच्या काचेवर हाताने मारत काच उघडण्यास सांगू लागला. चालकाने काच न उघडल्याने त्याने गोंधळ घातला. त्याचवेळी त्याच्यासोबत असलेल्या अन्य दुचाकीवरील व्यक्तीने दुचाकीच्या हॅण्डलवर ठेवलेली हातोडी काढली आणि शासकीय वाहनाच्या चालकाच्या बाजूच्या दरवाजावर मारण्यास सुरुवात केली. दरम्यान, चालकाने काच खाली केली असता दुचाकीस्वाराने हातातील कडे काढून चालकाच्या तोंडावर जोरदार वार करुन जखमी केले. या प्रकारामुळे चौकात नागरिकांची गर्दी जमा झाली.

हे सुद्धा वाचा : शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेल्या ‘डीपी चोरां’ना ठोकल्या बेड्या; इर्टिगा कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

कारवरील नाव पाहताच पसार

वाहनावर मुख्य न्याय दंडाधिकारी, औरंगाबाद असे लिहिलेले असल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित व्यक्तींनी आपली वाहने बन्सीलालनगरच्या दिशेने नेत धूम ठोकली. घटनेनंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणात वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

Web Title: A shocking incident involving an attack on the chief judicial magistrates vehicle has occurred nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 02:56 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Sambhajinagar Crime

संबंधित बातम्या

सोसायटीत पोलिसांची गाडी येईल, तुम्हाला हातकड्या घालून तुरुंगात नेले जाईल; महिलेला सायबर चोरट्यांनी घातला गंडा
1

सोसायटीत पोलिसांची गाडी येईल, तुम्हाला हातकड्या घालून तुरुंगात नेले जाईल; महिलेला सायबर चोरट्यांनी घातला गंडा

दिवसाढवळ्या रक्तरंजित थरार, पाठलाग करत तरुणावर कोयत्याने वार; आळंदीतील घटनेनं खळबळ
2

दिवसाढवळ्या रक्तरंजित थरार, पाठलाग करत तरुणावर कोयत्याने वार; आळंदीतील घटनेनं खळबळ

पोलिसांकडूनच जीवाला धोका! तरुणाचा गंभीर आरोप; थेट आयुक्तांकडे केली तक्रार
3

पोलिसांकडूनच जीवाला धोका! तरुणाचा गंभीर आरोप; थेट आयुक्तांकडे केली तक्रार

ऐन दिवाळीत छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हेगारीचा कहर! आठ ठिकाणी चाकू, कोयते अन् लोखंडी रॉडने हल्ले
4

ऐन दिवाळीत छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हेगारीचा कहर! आठ ठिकाणी चाकू, कोयते अन् लोखंडी रॉडने हल्ले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.