Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संगमनेर हादरलं! मुरुम वाहतुकीच्या वादातून गोळीबार; भाजप पदाधिकाऱ्याला ठार मारण्याचा प्रयत्न

संगमनेर तालुक्यातील मालुंजे गावचे माजी सरपंच संदीप घुगे घराजवळ शेतपावली करत असताना त्यांच्यावर दोघांनी गोळीबार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 03, 2026 | 05:30 PM
संगमनेर हादरलं! मुरुम वाहतुकीच्या वादातून गोळीबार; भाजप पदाधिकाऱ्याला ठार मारण्याचा प्रयत्न

संगमनेर हादरलं! मुरुम वाहतुकीच्या वादातून गोळीबार; भाजप पदाधिकाऱ्याला ठार मारण्याचा प्रयत्न

Follow Us
Follow Us:

संगमनेर : भाजपचे तालुका सरचिटणीस व संगमनेर तालुक्यातील मालुंजे गावचे माजी सरपंच संदीप घुगे घराजवळ शेतपावली करत असताना त्यांच्यावर दोघांनी दुचाकीवरुन येऊन गोळीबार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना १ जुलै रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने या गोळीबारात कुठलीही जीवितहानी झाली नाही. घुगे यांना ठार मारण्यासाठी त्यांच्या दिशेने झालेल्या गोळीबारातील गोळी घरातील दरवाजाला छेदून आत गेली. त्यानंतर चौघांनी आपल्या हातातील तलवारीने तोडफोड करून तुला आज जिवंत सोडणार नाही अशी जीवे मारण्याची धमकी दिली.

 

ही घटना पोलिसांना समजताच पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपींचा मागमूस घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर संगमनेर तालुका भाजपाचे सरचिटणीस संदिप घुगे यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून आरोपी विशाल हौशीराम खेमनर (रा. अंभोरे, ता. संगमनेर), प्रवीण ठकाजी पुणेकर (रा. डीग्रस, ता. संगमनेर), सुदर्शन शिवाजी श्रीराम व इतर तीन जणांनी हा जीवघेणा हल्ला केला. त्यांच्यावर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंभोरे गावचे माजी सरपंच संदीप घुगे यांची गावात गेली अनेक दिवसांपासून सत्ता आहे. गावातील अनेक लोक त्यांच्याकडे विविध विषय घेऊन समस्या सोडवण्यासाठी येत असतात. गावातील एकाच्या जमिनीतून आरोपी विशाल खेमनर हा अवैध मुरूम व माती वाहतूक करून त्रास देत असल्याची माहिती भाजपचे सरचिटणीस संदीप घुगे यांना सांगितली. घुगे यांनी अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुकीबद्दल आरोपी विशाल खेमनर याला जाब विचारला असता, त्याने फोन करून घुगे यांना तुला सोडणार नाही, तुला संपवणार, अशा धमक्या दिल्या. तसेच आरोपी खेमनर हा घुगे यांना फोनद्वारे व समाजमाध्यमांवर धमक्या देत राहिला.

दरम्यान, बुधवार, दि. १ जुलै रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घुगे हे कुटुंबासोबत जेवण करून घराजवळ शेत पावली करत होते. शेतपावली करून ते घराकडे जात असताना पाठीमागून काळ्या रंगाच्या दुचाकीवर तिघे तेथे आले. दुचाकी चालक सुदर्शन श्रीराम हा गाडी घराच्या दिशेने घेऊन आला. मागे बसलेले विशाल खेमनर व प्रवीण पुणेकर यांनी घुगे यांना ओळखत स्वतःच्या कंबरेला असलेल्या बंदुका काढून घुगे यांच्यावर ताणली. श्रीरामने दुचाकी बाजूला लावत हाती तलवार घेऊन घुगे यांच्या दिशेने धावला. हा प्रकार पाहताच घुगे यांनी घरात पळत जाऊन दरवाजा बंद केला. याच दरम्यान, त्यांच्या दिशेने बंदुकीतून दोन गोळ्या झाडण्यात आल्या. त्यापैकी एक गोळी दरवाजाची फळीत छेदून घरात गेली.

हे सुद्धा वाचा : शेवगावातील गुटखा कारवाईवर संशय; ५६ हजारांचा मुद्देमाल दाखवून लाखोंचा साठा लपवल्याची चर्चा

दरम्यान, घराचा दरवाजा उघडता येत नसल्याने मारेकऱ्यांनी हातातील तलवारीने घरच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या. तू आज वाचला असला, तरी तुला जिवंत सोडणार नाही, अशा धमक्या दिल्या. त्यानंतर हल्लेखोर शिवीगाळ करीत दुचाकीवरुन पसार झाले. या प्रकरणी घुगे यांच्या फिर्यादीवरुन आरोपी विशाल हौशीराम खेमनर (रा. अंभोरे, तासंगमनेर), प्रवीण ठकाजी पुणेकर (रा. डीग्रस, ता. संगमनेर), सुदर्शन शिवाजी श्रीराम व इतर तिघांनी हा जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घुगे व संबंधित शेतकऱ्याने याच आरोपींविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. मात्र, पोलिसांनी कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे आरोपींची हिंमत वाढली.

Web Title: A shocking incident involving an attempt to kill a bjp office bearer has occurred in sangamner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 05:30 PM

Topics:  

  • BJP
  • crime news
  • Sangamner

संबंधित बातम्या

Ulhasnagar News : शिवसेना भाजपातील संघर्ष विकोपाला, पप्पू कलानी गँगस्टर तर रवींद्र चव्हाण मंचेकर गँगचे ऑपरेटर, शिवसेनेचा आरोप
1

Ulhasnagar News : शिवसेना भाजपातील संघर्ष विकोपाला, पप्पू कलानी गँगस्टर तर रवींद्र चव्हाण मंचेकर गँगचे ऑपरेटर, शिवसेनेचा आरोप

‘अरे रोहित बाळा..,’ दुष्काळाच्या मुद्द्यावर भाजप आमदाराचा रोहित पवारांवर हल्लाबोल, ‘तुझ्या कर्जतमध्ये येऊन काय करतो ते बघ’
2

‘अरे रोहित बाळा..,’ दुष्काळाच्या मुद्द्यावर भाजप आमदाराचा रोहित पवारांवर हल्लाबोल, ‘तुझ्या कर्जतमध्ये येऊन काय करतो ते बघ’

MLC Election 2026 : महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक भाजपकडे, अमरावती शिवसेनेकडे, तर राष्ट्रवादीला संभाजीनगर!
3

MLC Election 2026 : महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक भाजपकडे, अमरावती शिवसेनेकडे, तर राष्ट्रवादीला संभाजीनगर!

जमीन डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटवरून आर्किटेक्टचे अपहरण; मारहाण करून सह्या घेतल्या अन्…
4

जमीन डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटवरून आर्किटेक्टचे अपहरण; मारहाण करून सह्या घेतल्या अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.