Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बोअरच्या मोटरवरून झालेल्या वादातून कुटुंबावर हल्ला; लाकडी बांबू अन् लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

बोअरची मोटर काढून नेल्याच्या कारणावरून झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका कुटुंबाला लाकडी बांबू, लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 10, 2026 | 12:30 AM
बोअरच्या मोटरवरून झालेल्या वादातून कुटुंबावर हल्ला; लाकडी बांबू अन् लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

बोअरच्या मोटरवरून झालेल्या वादातून कुटुंबावर हल्ला; लाकडी बांबू अन् लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

Follow Us
Follow Us:

पिंपरी : राज्यात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून, अशातच आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. बोअरची मोटर काढून नेल्याच्या कारणावरून झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका कुटुंबाला लाकडी बांबू, लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली, तसेच लोखंडी हत्याराने वार करून आयफोन फोडण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (६ ऑगस्ट) रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास म्हाळुंगे येथील उत्तम स्वीट होम दुकानासमोर घडली आहे.

या प्रकरणात राजश्री कुंदन रावत (४२, म्हाळुंगे) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल बाळु पवार (वय २७), रमेश बाळु पवार (वय २५), अस्लम शेख आणि सम्राट शिंदे (सर्व रा. उत्तम स्वीट होम दुकान जवळ, म्हाळुंगे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी, त्यांचे पती आणि दोन मुलांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व बांबूने मारहाण केली. आरोपी राहुल पवार याने फिर्यादीचा मुलगा हर्ष याच्या डोक्यावर, गालावर व खांद्यावर लोखंडी हत्याराने मारून जखमी केले आणि त्याचा आयफोन फोडून नुकसान केले. भांडण सोडवायला आलेल्या नातेवाईकांनाही आरोपींनी मारहाण केली. बावधन पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा  : महिलांची बैठक लावण्यावरून वाद, कांदळीतील कलाकेंद्रात गाेळीबाराचा थरार; नेमकं काय घडलं?

पुण्यातील वाघोलीत व्यावसायिकावर गोळीबार

जमीन खरेदी विक्री करणाऱ्या व्यवसायिकावर दुचाकीवरून येऊन गोळीबार करत तिघांनी त्यांच्याकडील ११ लाख रुपये किंमतीचे २२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. व्यावसायिक त्यांच्या कारमध्ये होता तरीही चोरट्यांनी त्यांच्या खिडकीजवळ येऊन गोळी झाडली. गोळीबारात काच फुटून त्यांना लागली. गोळीबारात व्यवसायिक संतोष ज्ञानोबा गावडे (वय ५०, रा. गावडेवाडी, शिरसवाडी, ता. शिरुर) हे जखमी झाले आहेत. त्यांच्या तोंडाला गोळी लागली आहे. त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी संतोष यांचे चुलत बंधू दत्तात्रय गावडे (वय ५०) यांनी लोणीकंद पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिघा अनोळखी चोरट्यांविरुद्ध आर्म ॲक्टनुसार खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी (दि.5) रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास गावडेवाडी शिरसवाडी येथील पंडीत गावडे यांच्या बंगल्यासमोर घडली आहे.

Web Title: A shocking incident involving the assault of a family has occurred in pune district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • crime news
  • maharashtra

संबंधित बातम्या

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
1

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप
2

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप

IMD Weather : मान्सून पुन्हा सक्रिय? पावसाचा हायअलर्ट, गरज असेल तरच बाहेर पडण्याच्या सूचना
3

IMD Weather : मान्सून पुन्हा सक्रिय? पावसाचा हायअलर्ट, गरज असेल तरच बाहेर पडण्याच्या सूचना

Bhandara News: २५ किलो गांजासह दोघे ताब्यात! पालांदूर येथे गांजातस्करीचा पर्दाफाश; ओडिशातून आणल्याचा संशय
4

Bhandara News: २५ किलो गांजासह दोघे ताब्यात! पालांदूर येथे गांजातस्करीचा पर्दाफाश; ओडिशातून आणल्याचा संशय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.