Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवरून कोथरुडमधील अल्पवयीन मुलाचा खून; पार्टीसाठी बोलावले अन्…

व्हॉट्सअप स्टेट्स ठेवल्यावरून तसेच जुन्या वादातून एका अल्पवयीन मुलाचा विद्या महाविद्यालयाच्या टेकडीवर दोन अल्पवयीन मुलांनी लोखंडी हातोड्याने डोक्यात वार करून निघृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 20, 2026 | 02:00 PM
व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवरून कोथरुडमधील अल्पवयीन मुलाचा खून; पार्टीसाठी बोलावले अन्...

व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवरून कोथरुडमधील अल्पवयीन मुलाचा खून; पार्टीसाठी बोलावले अन्...

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. व्हॉट्सअप स्टेट्स ठेवल्यावरून तसेच जुन्या वादातून एका अल्पवयीन मुलाचा विद्या महाविद्यालयाच्या टेकडीवर दोन अल्पवयीन मुलांनी लोखंडी हातोड्याने डोक्यात वार करून निघृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नील नाईक (वय १४, रा. श्रावनाधारा, कोथरूड) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यरात्री ही घटना घडली असून, बुधवारी सकाळी मुलाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले.

पोलिसांच्या माहितीनुसार, नील आणि आरोपी ओळखीचे आहेत. त्यांच्यात जुने वाद झाले होते. नीलच्या चुलत भावाने यातील एका अल्पवयीन मुलाला मारहाण केली होती. तेव्हापासून त्यांच्यातील वाद टोकाला गेले होते. दरम्यान, नील हा व्हॉट्सअपला खुन्नस देणारे स्टेट्स ठेवत होता. तो सतत स्टेट्स ठेवत असल्याने आरोपींना त्याच्याबाबत राग होता. दरम्यान, नील याला आरोपींनी विदी महाविद्यालयाच्या टेकडीवर भेटण्यासाठी तसेच पार्टीसाठी म्हणून बोलावले. तो आला असता या दोन आरोपींनी त्याला त्याठिकाणी गाठून लोखंडी हातोडीने त्याच्या डोक्यात वार करून त्याचा निघृण खून केला.

हे सुद्धा वाचा : अल्पवयीन मुलीवर 4 जणांचा अत्याचार, पन्नास रुपयाचे आमिष दाखवले अन्…; हिंगोलीतील संतापजनक घटना

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला

व्यवसायासाठी एक लाख रुपये देण्यास नकार दिल्याच्या रागातून चुलतीच्या घरात घुसून तिच्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच, त्यांच्या कानातील सोन्याचे वेल जबरदस्तीने हिसकावून नेण्यात आले आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. जखमी महिलेचे नाव गुणवंती सुरेश सुराणा (वय ६६) असे आहे. त्यांनी खडक पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार त्यांचा पुतण्या दिनेश जुगराज सुराणा (वय ५८) आणि फर्मान मन्सूर पारकर (वय २८) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांनाही अटक करण्यात आली आहे. ही घटना १५ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास पुण्यातील एकबोटे कॉलनी परिसरात घडली आहे.

Web Title: A shocking incident involving the murder of a minor boy has occurred in kothrud

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, पोलिसांची धमकी दिली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार
1

डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, पोलिसांची धमकी दिली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
2

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

ठाकरे गटाला मोठा धक्का! उपनेता शरद कोळीवर MPDA अन्वये कारवाई; थेट येरवडा कारागृहात रवानगी
3

ठाकरे गटाला मोठा धक्का! उपनेता शरद कोळीवर MPDA अन्वये कारवाई; थेट येरवडा कारागृहात रवानगी

निवडणूक आयोगाच्या नावाने फसवणूक, ज्येष्ठाला घातला लाखोंचा गंडा; OTP घेतला अन्…
4

निवडणूक आयोगाच्या नावाने फसवणूक, ज्येष्ठाला घातला लाखोंचा गंडा; OTP घेतला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.