Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात पतीकडून पत्नीचा निर्घृण खून; धक्कादायक कारणही आलं समोर

सिंहगड रोड परिसरातील नऱ्हे भागात चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 19, 2025 | 11:59 AM
पुण्यात पतीकडून पत्नीचा निर्घृण खून; धक्कादायक कारणही आलं समोर

पुण्यात पतीकडून पत्नीचा निर्घृण खून; धक्कादायक कारणही आलं समोर

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सिंहगड रोड परिसरातील नऱ्हे भागात चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी पतीला अटक केली आहे. रेश्मा भिकू खुडे (वय ३२, सध्या रा. कुटे मळा, मानाजीनगर, नऱ्हे, मूळ रा. वडूज, जि. सातारा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी कुमार कलगोंडा पाटील (वय ४२, मूळ रा. इचलकरंजी, कोल्हापूर) याला अटक केली.

पोलिसांच्या माहितीनुसार, रेश्मा यांचा पहिला विवाह झाला होता. पतीसोबत पटत नसल्याने त्यांनी आरोपी कुमारशी दुसरा विवाह केला. पहिल्या पतीपासून त्यांना दोन मुले होते. महिनाभरापूर्वी त्या कुमार याच्यासोबत नऱ्हे भागात राहायला आल्या होत्या. कुमार रेश्मा यांच्या चारित्र्याचा संशय घेत होता. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाले होते. शुक्रवारी सायंकाळी कुमार कामावरुन घरी आला. त्याने पुन्हा रेश्मा यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वादातून त्याने रेश्मा यांचा ओढणीने गळा आवळून खून केला. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी पती कुमारला अटक केली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक सागर पवार तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : इचलकरंजी हादरली! तरुणाचा ट्रॅक्टरच्या चाकाखाली ढकलून खून; नेमकं काय घडलं?

दगडाने ठेचून मुलाचा खून

दरम्यान गेल्या काही दिवसाखाली नगर रस्त्यावरील वाघोली भागात वाघेश्वरनगर येथे एका अल्पवयीन मुलाचा लोखंडी रॉड तसेच दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीला बोलत असल्याच्या रागातून हा खून झाल्याचे सांगण्यात आले आहे. प्रेमप्रकरणातून खून झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. गणेश वाघू तांडे (१७) असे हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मण पेटकर (वय ६०), नितीन पेटकर (वय ३१) आणि सुधीर पेटकर (वय ३२) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास घडली आहे.

राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले

राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये जुन्या भांडणाच्या कारणातून 26 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. ही घटना सोमवारी (दि.2) सायंकाळी हसूल परिसरातील कारागृहाच्या बाजूच्या मैदानावर घडली. दिनेश उर्फ बबलू परमानंद मोरे (वय 26, रा. चेतनानगर, हसूल) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी अनिकेत गायकवाड व गणेश सोनवणे यांची नावे समोर आली असून, शोधासाठी चार पथके रवाना झाली. या हत्येप्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: A shocking incident of a husband brutally murdering his wife has come to light in pune nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2025 | 11:59 AM

Topics:  

  • maharashtra
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Weather Update: 2025 च्या मान्सूनने बदलली शहराची वेळ; निरोपाची तयारी सुरू असताना पुन्हा पुन्हा हजेरी
1

Weather Update: 2025 च्या मान्सूनने बदलली शहराची वेळ; निरोपाची तयारी सुरू असताना पुन्हा पुन्हा हजेरी

PMC Election 2026: अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून गुंड आंदेकरच्या कुटुंबातील दोघांना उमदेवारी; तुरुंगातून लढवणार निवडणूक
2

PMC Election 2026: अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून गुंड आंदेकरच्या कुटुंबातील दोघांना उमदेवारी; तुरुंगातून लढवणार निवडणूक

पिकअप- दूध टँकरची जोरदार धडक, 2 महिलांचा मृत्यू; जखमींचाही आकडा समोर
3

पिकअप- दूध टँकरची जोरदार धडक, 2 महिलांचा मृत्यू; जखमींचाही आकडा समोर

निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादीच्या नेत्यावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
4

निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादीच्या नेत्यावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.