Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

गोंदियातील बघोली शिवारात भटक्या कुत्र्यांनी हरणाच्या पाडसाला घेरले आणि त्याच्यावर हल्ला केला. रक्तबंबाळ झालेल्या पाडसाचा आक्रोश ऐकून शेताकडे जाणारे 2 चिमुकले थेट घटनास्थळी पोहोचले. काठ्या हातात घेऊन त्यांनी कुत्र्यांना हुसकावून लावले आणि पाडसाला सुरक्षित ठिकाणी आणले. त्यानंतर पाणी व प्राथमिक उपचार देत वनविभागाला माहिती दिली.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 30, 2026 | 04:43 PM
Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
Follow Us
Follow Us:
  • बघोली शिवारात भटक्या कुत्र्यांनी हरणाच्या पाडसावर हल्ला केल्यानंतर 2 चिमुकले मदतीला धावले.
  • कुणाल आणि नेहुल यांनी काठ्या घेऊन कुत्र्यांना हुसकावून लावत जखमी पाडसाचा जीव वाचवला.
  • पाडसाला पाणी आणि प्राथमिक उपचार देऊन वनविभागाला घटनेची तातडीने माहिती देण्यात आली.
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या बघोली गावाच्या शिवारात सोमवारी हृदयाचा ठोका चुकवणारी घटना घडली. भटक्या कुत्र्यांनी हरणाच्या पाडसावर अचानक हल्ला केला. या वेळी शेताकडे जाणाऱ्या कुणाल गोरेलाल अंबुले आणि नेहुल अजय अंबुले या 2 चिमुकल्यांनी प्रसंगावधान राखत कुत्र्यांना हुसकावून लावले आणि जखमी पाडसाचा जीव वाचवला.

शेताच्या बांधावर पाडसावर हल्ला
बघोली परिसरात मोठ्या प्रमाणात झाडी, शेतशिवार आणि नैसर्गिक अधिवास असल्याने वन्यप्राण्यांचा वावर दिसून येतो. सोमवारी दुपारी एक हरणाचे पाडस शेताच्या बांधावर चरत होते. त्याच वेळी 3 ते 4 भटक्या कुत्र्यांनी त्याचा पाठलाग सुरू केला. काही वेळातच कुत्र्यांनी पाडसाला घेरून त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात पाडसाला चावा लागल्याने ते गंभीर जखमी झाले आणि त्याच्या अंगावरून रक्त वाहू लागले.

Tiger News: सह्याद्रीच्या खोऱ्यात घुमणार ‘हिरकणी’ची डरकाळी; व्याघ्र संवर्धनाला नवे बळ

आक्रोश ऐकून चिमुकले धावले
याच दरम्यान कुणाल आणि नेहुल हे दोघे शेताकडे जात होते. त्यांना पाडसाचा आक्रोश ऐकू आला. परिस्थिती लक्षात येताच त्यांनी वेळ न दवडता घटनास्थळी धाव घेतली. दोघांनी काठ्या हातात घेत आरडाओरड करून कुत्र्यांना पाडसापासून दूर केले. त्यांच्या प्रतिकारामुळे अखेर भटक्या कुत्र्यांनी तेथून पळ काढला.

जखमी पाडसाला दिली मदत
कुत्र्यांचा धोका दूर झाल्यानंतर दोन्ही मुलांनी जखमी पाडसाला सुरक्षित ठिकाणी आणले. त्याला पाणी पाजून जखमेवर प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वनविभागाला घटनेची माहिती देण्यात आली. वेळीच मदत मिळाल्याने जखमी पाडसाची काळजी घेण्याची प्रक्रिया सुरू झाली.

Kolhapur News: आम्ही जगायचं की मरायचं? पन्हाळा तालुक्यात वन्य प्राण्यांची दहशत, शेतकऱ्यांचा आक्रोश

चिमुकल्यांच्या धाडसाचे कौतुक
या घटनेत कुणाल आणि नेहुल यांनी दाखवलेले धाडस आणि वन्यजीवांबद्दलची संवेदनशीलता विशेष चर्चेचा विषय ठरली आहे. स्वतःचा धोका न पत्करता परिस्थितीचा अंदाज घेत त्यांनी कुत्र्यांना दूर केले आणि पाडसाला मदत मिळवून दिली. त्यांच्या या कृतीचे बघोलीसह परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

Web Title: Gondiya deer fawn rescue stray dog attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 04:43 PM

Topics:  

  • gondiya
  • maharashtra

संबंधित बातम्या

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
1

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे
2

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

Municipal School: दरवर्षी ८ कोटींची निविदा, तरी विद्यार्थ्यांना साहित्याची प्रतीक्षा; शूज, बाटल्या अन् गणवेश वितरणावर प्रश्नचिन्ह
3

Municipal School: दरवर्षी ८ कोटींची निविदा, तरी विद्यार्थ्यांना साहित्याची प्रतीक्षा; शूज, बाटल्या अन् गणवेश वितरणावर प्रश्नचिन्ह

इंडियन नेव्हीची 1600 किमी बाईक मोहीम; टीव्हीएस रोनिनवरून करणार महाराष्ट्रातील किल्ल्यांची सफर!
4

इंडियन नेव्हीची 1600 किमी बाईक मोहीम; टीव्हीएस रोनिनवरून करणार महाराष्ट्रातील किल्ल्यांची सफर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.