Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात खळबळ! स्टील व्यवसायिकाच्या दुकानावर गोळीबार; आरोपी दुचाकीवरून फरार

पुण्यातील फुरसुंगी येथील मंतरवाडी फाटा परिसरात एका स्टील व्यावसायिकाच्या दुकानाच्या गेटवर अज्ञातांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.22) रात्री साडे दहाच्या सुमारास घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 23, 2026 | 11:40 AM
पुण्यात खळबळ! स्टील व्यवसायिकाच्या दुकानावर गोळीबार; आरोपी दुचाकीवरून फरार

पुण्यात खळबळ! स्टील व्यवसायिकाच्या दुकानावर गोळीबार; आरोपी दुचाकीवरून फरार

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारीि वाढली असून, दररोज पुण्यातही गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील फुरसुंगी येथील मंतरवाडी फाटा परिसरात एका स्टील व्यावसायिकाच्या दुकानाच्या गेटवर अज्ञातांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.22) रात्री साडे दहाच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, गोळीबाराचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी संबंधित स्टील व्यावसायिकाच्या दुकानासमोर येत दुकानाच्या गेटवर तीन ते चार राऊंड फायर केले. त्यानंतर गोळीबार करणारे आरोपी दुचाकीवरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गोळीबारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. व्यावसायिकाला धमकी देण्याच्या उद्देशाने हा प्रकार घडवून आणण्यात आला की अन्य काही कारण आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन आरोपींचा माग काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा : लग्नाला अवघे 2 दिवस बाकी, पण घरातून नवरी मुलगी आणि आई-वडिलांची निघाली अंत्ययात्रा; कारण काय?

जुन्या भांडणाच्या कारणावरून टोळक्याचा तरुणावर हल्ला

जुन्या भांडणाच्या कारणावरून एका टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (२१ जून) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास, चिखली येथील भाजी मंडई रोड व साने चौक येथे घडली आहे. याबाबत विनायक उर्फ बाबू राजू ननावरे (वय२४, सुदर्शन नगर, साने चौक, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सिद्धार्थ धाईजे (२१, अंठाजनगर, निगडी), शिवशंकर श्रीमंगल (२०, मेंदळवाडी, चाकण) आणि त्यांच्या इतर दोन अनोळखी मित्रांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सिद्धार्थ आणि शिवशंकर या दोघांना अटक केली आहे. आरोपी आणि त्यांच्या दोन अनोळखी मित्रांनी फिर्यादीला जुन्या भांडणाच्या रागातून जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने डोक्यावर व हातावर वार करून गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादीचा मित्र ऋतीक कसाळकर याला कानाखाली मारली. आरोपींनी तिथून निघून जाताना कोयते हवेत उगारून लोकांना “समोर याल तर एकेकाला बघून घेईल” अशी धमकी देऊन परिसरात दहशत माजवली. चिखली पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: A shocking incident of a shooting at a steel merchants shop has occurred in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
1

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
2

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
3

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर
4

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.