काय नेमकं प्रकरण?
या प्रकरणातील नवरी मुलीचे नाव रक्षिता (२१) असे आहे. तर शिवन्ना, त्यांची पत्नी नागरत्ना (45) असे आहे. अवघ्या काही तासात रक्षितच्या डोक्यावर अक्षदा पडणार होते. लग्न अवघ्या २ दिवस आधी नववधू आणि तिच्या आई-वडिलांनी सामूहिक आत्महत्या केली. घरात सनई-चौघडे वाजण्यापूर्वीच संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली. या तिघांनी जेवणार विष कालवून आपली जिवन संपवले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून एक सुसाईड नोट जप्त केली आहे. या सुसाईड नोटमधून त्यांनी आत्महत्या कारण्यामागेचे कारण समोर आले आहे.
Beed Crime: भांडण सोडवायला गेला अन् जीव गमावला; मध्यस्थी करणाऱ्या हॉटेल चालकाचा चाकूने भोसकून खून
कारण काय?
उल्लास गौडा नावाचा युवक रक्षिताशी लग्न करण्यास इच्छुक होता. त्याचं तिच्या सोबत एकतर्फी प्रेम होतं. तिचं लग्न ठरलं आहे हे त्याला सहन होत नव्हतं. त्यातूनच त्याने रक्षिताच्या कुटुंबीयांना त्रास देण्यास सुरूवात केली. त्यातून हे संपूर्ण कुटुंब मानसिक तणावात होतं. तो ऐवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने रक्षिताच्या होणाऱ्या नवऱ्याला ही तिच्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या. काही फोटो आणि मेसेज ही पाठवले. या घटनेमुळे रक्षिताचे कुटुंब हादरून गेले होते. यामुळे आपली समाजात बदनामी होईल. शिवाय लग्न ही तुटेल अशी भिती त्यांना सतावत होती. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय आहे.
पोलीस तपास सुरु
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलिसांनी सुसाईड नोट जप्त केली आहे. त्यात थेट उल्लास गौडा याला या आत्महत्येसाठी जबाबदार धरण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपीचा शोध पोलीस करत आहे.
Ans: ही घटना कर्नाटकच्या म्हैसूर जिल्ह्यातील हालेकेम्पय्यन हुंडी गावात घडली.
Ans: रक्षिता (21), तिचे वडील शिवन्ना आणि आई नागरत्ना यांनी आत्महत्या केली.
Ans: रक्षितावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या युवकाकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.






