Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारामतीतील ज्येष्ठ महिलेची फसवणूक; अटकेची भीती दाखवत लाखो रुपयांना घातला गंडा

बारामती तालुक्यातील ७४ वर्षीय ज्येष्ठ महिलेला ‘डिजिटल अरेस्ट’ ची भीती दाखवत ४५ लाख ६० हजार रुपयांना गंडा घातल्याची धक्कादायक घटना बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथे घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 06, 2026 | 01:38 PM
बारामतीतील ज्येष्ठ महिलेची फसवणूक; अटकेची भीती दाखवत लाखो रुपयांना घातला गंडा

बारामतीतील ज्येष्ठ महिलेची फसवणूक; अटकेची भीती दाखवत लाखो रुपयांना घातला गंडा

Follow Us
Follow Us:
  • बारामतीतील ज्येष्ठ महिलेची फसवणूक
  • अटकेची भीती दाखवत घातला गंडा
  • अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
बारामती : बारामती तालुक्यातील ७४ वर्षीय ज्येष्ठ महिलेला ‘डिजिटल अरेस्ट’ ची भीती दाखवत ४५ लाख ६० हजार रुपयांना गंडा घातल्याची धक्कादायक घटना बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी ज्येष्ठ महिलेने बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शहर पोलीसांनी विविध कलमांसह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम अन्वये सायबर फसवणुकीचा अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

याबाबत बारामती शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी शकुंतला उद्धव खर्डे (वय ७४ वर्षे, रा. डोर्लेवाडी, ता. बारामती, जि. पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार खर्डे यांना १४ ते २७ फेब्रुवारच्या कालावधीत मोबाईल क्रमांकावरून एका अनोळखी व्यक्तीने व्हाॅटसअप द्वारे व्हिडिओ कॉल केला. संबंधिताने स्वतःला “संदीप पाटील” नावाचा पोलीस अधिकारी असल्याचे खोटे सांगून पोलीस गणवेशात व्हिडिओ कॉल करून विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादी यांच्याविरुद्ध अटक वॉरंट असल्याचे सांगून त्यांना “डिजिटल अरेस्ट” होईल अशी भीती दाखवण्यात आली.

तसेच भीती व मानसिक दबाव निर्माण करून फिर्यादी यांना त्यांच्या बँकेतील एफडी तोडण्यास भाग पाडले. तसेच वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे वर्ग करण्यास सांगितले. त्या अनुषंगाने फिर्यादी यांनी आरोपीच्या सांगण्यावरून ३४ लाख ६० हजार व नंतर ११ लाख असे मिळून एकूण पंचेचाळीस लाख साठ हजार रुपये इतकी रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यांवर वर्ग केली. नंतर आरोपीशी संपर्क होत नसल्याने त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी बारामती शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली.

कोणताही व्यक्ती स्वतःला पोलीस, सीबीआय, इडी, न्यायालय किंवा इतर सरकारी अधिकारी असल्याचे सांगून फोन/ व्हिडिओ कॉलवर “डिजिटल अरेस्ट” किंवा अटक होईल अशी भीती दाखवत असल्यास त्यावर विश्वास ठेवू नये. कोणत्याही परिस्थितीत फोन किंवा व्हिडिओ कॉलवरून पैसे ट्रान्सफर करू नयेत. अशा प्रकारे भीती दाखवून पैसे मागितल्यास त्वरित १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. शक्य तितक्या लवकर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये प्रत्यक्ष जाऊन तक्रार नोंदवावी. – श्रीशैल चिवडशेट्टी, पोलिस निरीक्षक.

Web Title: A shocking incident of cheating an elderly woman in baramati has taken place

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 01:38 PM

Topics:  

  • crime news
  • Froud News
  • maharashtra

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात
1

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार
3

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
4

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.