Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जुन्या वादातून दोन तरुणांवर गोळीबार, तीन राऊंड फायर; श्रीगोंदा तालुक्यातील घटनेनं खळबळ

शिरूर-श्रीगोंदे-पारनेर तालुक्यांच्या सीमेवर श्रीगोंदे तालुक्यातील गव्हाणवाडी परिसरात जुन्या वादातून दोन टोळक्यांमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. १४) दुपारी घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 15, 2026 | 11:59 AM
जुन्या वादातून दोन तरुणांवर गोळीबार, तीन राऊंड फायर; श्रीगोंदा तालुक्यातील घटनेनं खळबळ

जुन्या वादातून दोन तरुणांवर गोळीबार, तीन राऊंड फायर; श्रीगोंदा तालुक्यातील घटनेनं खळबळ

Follow Us
Follow Us:
  • जुन्या वादातून दोन तरुणांवर गोळीबार
  • तीन राऊंड फायर
  • श्रीगोंदा तालुक्यातील घटनेनं खळबळ
ढवळगाव : शिरूर-श्रीगोंदे-पारनेर तालुक्यांच्या सीमेवर श्रीगोंदे तालुक्यातील गव्हाणवाडी परिसरात जुन्या वादातून दोन टोळक्यांमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. १४) दुपारी घडली आहे. घोड नदीवरील १७ कमानी पुलाजवळ पेट्रोल पंपाच्या परिसरात झालेल्या या गोळीबारामुळे मोठी खळबळ उडाली आहे. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. याप्रकरणी प्रशांत संदिप वाबळे यांनी फिर्याद दिली आहे.

 

प्राथमिक माहितीनुसार पारनेर तालुक्यातील म्हसे खुर्द येथील प्रशांत संदीप वाबळे, हर्षल सुनील जाधव आणि मयुर अनिल मदगे हे दुचाकीवरून शिरूरच्या दिशेने जात होते. घोड नदीवरील १७ कमानी पुलाजवळ त्यांच्या वाहनातील पेट्रोल संपल्याने त्यांनी गाडी थांबवली. यावेळी त्यांच्यापैकी एक जण पेट्रोल आणण्यासाठी गेला असता, कारमधून आलेल्या काही व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप आहे. किशोर शिंदे, प्रशांत झरेकर आणि राहुल गव्हाणे (पूर्ण नाव उपलब्ध नाही, सर्व रा. म्हसे खुर्द, ता. पारनेर) फिर्यादींच्या म्हणण्यानुसार यांनी गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यावेळी दोन ते तीन राऊंड झाल्याचे सांगण्यात येत आहे. गोळीबारानंतर संबंधित व्यक्तींनी वाहनातून पळ काढल्याची माहिती आहे.

या घटनेनंतर बेलवंडी पोलिसात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरपर्यंता सुरू होती. या प्रकरणात दोन्ही बाजूंकडून यापूर्वी परस्परविरोधी गुन्हे दाखल होत असल्याचे सांगण्यात आले. गोळीबारानंतर शिरूर (जि. पुणे), बेलवंडी, पारनेर आणि सुपे (ता. पारनेर) पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अहिल्यानगरहून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि मोबाईल फॉरेन्सिक लॅबचे पथकही दाखल झाले.

घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमणे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहायक पोलिस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर, सोमनाथ दिवटे, पारनेर पोलिस उपनिरीक्षक विजयकुमार कौठावळे, बेलवंडीचे पोलिस भाऊसाहेब यमगर, दादासाहेब क्षीरसागर, विनोद पवार आदींनी भेट दिली. आरोपींना पकडण्यासाठी पथके रवाना केली आहेत.

यापूर्वीही हल्ल्याचे गुन्हे दाखल 

फिर्यादी आणि संशयित आरोपी यांच्यात पूर्वीपासूनच वाद असल्याचे समोर येत आहे. त्यातूनच हा प्रकार घडल्याचे बोलले जाते. या वादातून यापूर्वीही यवत आणि पारनेर पोलिस ठाणे हद्दीत जीवघेणे हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचे गुन्हे दाखल आहेत.

सीमेवरील प्रश्न पुन्हा ऐरणीवर 

या घटनेमागील नेमके कारण, गोळीबारात वापरलेले शस्त्र, आरोपींची संख्या आणि पूर्वीच्या वादाशी नेमका संबंध याबाबत पोलिसांच्या तपासानंतर माहिती समोर येण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे शिरूर, श्रीगोंदे, पारनेर सीमेवरील संवेदनशील भागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी संशयित आरोपींचा तातडीने शोध घेण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

हे सुद्धा वाचा : पोलिसांचा आंदोलनाला नकार; मनोज जरांगेंची तिरपी चाल, आता थेट हायकोर्टात जाण्याची तयारी!

रात्री उशीरापर्यंत प्रक्रिया सुरू 

घटनेमुळे गव्हाणवाडी आणि परिसरात भीतीचे वातावरण आहे. रात्री उशिरापर्यंत बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. गोळीबार करणाऱ्या संशयित आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Web Title: A shocking incident of firing has occurred in shrigonda taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 11:57 AM

Topics:  

  • crime news
  • firing
  • Shirur News

संबंधित बातम्या

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर हल्ला, डोक्यात मारला दगडी खलबत्ता; पत्नी गंभीर जखमी
1

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर हल्ला, डोक्यात मारला दगडी खलबत्ता; पत्नी गंभीर जखमी

पणदरे येथील गर्भवती महिलेवर अत्याचार करून खून, पोलिसांची अवघ्या दोन तासांत कारवाई; २६ वर्षीय संशयित आरोपी अटकेत
2

पणदरे येथील गर्भवती महिलेवर अत्याचार करून खून, पोलिसांची अवघ्या दोन तासांत कारवाई; २६ वर्षीय संशयित आरोपी अटकेत

अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
3

अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

जुन्या गाडीच्या वादातून तरुणावर हल्ला, चाकूने सपासप वार; नांदेडमधील घटनेनं खळबळ
4

जुन्या गाडीच्या वादातून तरुणावर हल्ला, चाकूने सपासप वार; नांदेडमधील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.