Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Murder : दारु पिण्याच्या कारणावरुन वाद; मजुराचा डोक्यात दगड घालून खून

कोंढवा भागात दारू पिताना झालेल्या वादातून एकाने दुसऱ्याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 03, 2026 | 05:10 PM
दारु पिण्याच्या कारणावरुन वाद; मजुराचा डोक्यात दगड घालून खून

दारु पिण्याच्या कारणावरुन वाद; मजुराचा डोक्यात दगड घालून खून

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या असून, वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. कोंढवा भागात दारू पिताना झालेल्या वादातून एकाने दुसऱ्याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मनीषकुमार महादेव पासवान (वय २२, रा. पंचशीलनगर, कोंढवा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

 

याप्रकरणी महादेव अर्जुन कांबळे (वय ३५, रा. श्री स्वामी समर्थनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) याला अटक केली आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक शिवराज खराडे यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी कांब‍ळे हा केटरींग व्यवसायिकाकडे काम करतो तर पासवान हा मजुरीचे काम करतो. दोघांना दारु पिण्याचे व्यसन आहे. गुरुवारी (३० एप्रिल) सायंकाळी सातच्या सुमारास कांबळे आणि पासवान हे कोंढव्यातील आर. के. कॉलनी भागातील टेकडीजवळ असलेल्या झाडाखाली दारू पित बसले होते. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. यावरून कांबळेने पासवानच्या डोक्यात दगड घातला. पासवान गंभीर जखमी झाला. कांबळे तेथून पसार झाला. दरम्यान, घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पासवान याला रुग्णालयात दाखल केले असता, त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

पोलिस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहायक आयुक्त नम्रता देसाई, पोलिस निरीक्षक दीपक कारंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी पसार झालेल्या कांबळेला पकडले. पोलीस निरीक्षक कारंडे तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन काँग्रेस आक्रमक; ‘या’ तारखेला बुलढाणा जिल्ह्यात ‘अन्नदाता संघर्ष पदयात्रा’

3 वर्षांच्या मुलावर अत्याचार करून निर्घृण खून

पुणे जिल्ह्यातील औद्योगिक पट्टा असलेल्या चाकणमधील दक्षिण महाळुंगे परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी अत्यंत गंभीर घटना उघडकीस आली आहे. अवघ्या तीन वर्षांच्या निष्पाप बालकावर अज्ञात नराधमाने अनैसर्गिक अत्याचार करून त्याची गळा चिरून निर्घृण हत्या केली आहे. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह सुटकेसमध्ये ठेवून लपविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या अमानुष घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित बालक घरातून बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीय त्याचा शोध घेत होते. दरम्यान, दक्षिण महाळुंगे येथील एका निर्जन ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला बालकाचा मृतदेह आढळून आला. शरीरावरील जखमा आणि गळा चिरलेला असल्यामुळे ही हत्या अत्यंत क्रूरपणे केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच महाळुंगे व चाकण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनास्थळाची पाहणी केली.

Web Title: A shocking incident of murder has taken place in kondhwa area of pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 05:10 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?
1

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
2

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण
3

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
4

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.