Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेयसीच्या फोनवरुन मेसेज आला, तरुण कोथरुडला भेटायला गेला अन्…; पुण्यातील धक्कादायक घटना

प्रेमप्रकरणाच्या रागातून एका तरुणाला प्रेयसीच्या नातेवाईकांनी घरी बोलावून बेदम मारहाण करुन त्याची हत्या केली आहे. कोथरूड भागात मेगा सिटी इमारतीत ही घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 15, 2026 | 04:46 PM
प्रेयसीच्या फोनवरुन मेसेज आला, तरुण कोथरुडला भेटायला गेला अन्...; पुण्यातील धक्कादायक घटना

प्रेयसीच्या फोनवरुन मेसेज आला, तरुण कोथरुडला भेटायला गेला अन्...; पुण्यातील धक्कादायक घटना

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. पुण्यातही दररोज गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत आहेत. अशातच आता पुण्यातील कोथरुडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमप्रकरणाच्या रागातून एका तरुणाला प्रेयसीच्या नातेवाईकांनी घरी बोलावून बेदम मारहाण करुन त्याची हत्या केली आहे. कोथरूड भागात मेगा सिटी इमारतीत ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

नागेश संजय जाधव (वय २३, रा. जुनी वडारवाडी, मंजाळकर चौक, शिवाजीनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याची आई सुरेखा संजय जाधव (वय ४५, रा. जुनी वडारवाडी) यांनी कोथरुड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. यानुसार पोलिसांनी वृषाली अनिल शिंदे, सुनिता सुनिल शिंदे, जयश्री लक्ष्मण शिंदे, तुळशी योगेश शिंदे, गंगा संजय पवार, माणिक संजय पवार, सुनिल शिंदे, पोपट शिंदे, योगेश शिंदे, अनिल शिंदे (सर्व रा. मेगासिटी, एसएनडीटीजवळ, कोथरुड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, नागेश जाधव हा शिवाजीनगर येथील एका खासगी कार्यालयात ‘ऑफिस बॉय’ म्हणून काम करत होता. पौड फाटा चौक परिसरातील मेगा सिटी इमारतीत राहणाऱ्या एका तरुणीशी त्याचे प्रेमसबंध होते. प्रेमसंबधाला तरुणीच्या नातेवाईकांनी विरोध केला होता. शनिवारी (१४ मार्च) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास नागेशच्या मोबाइलवर संपर्क साधून तरुणीच्या नातेवाईकांनी त्याला पौड फाटा चौक परिसरात असलेल्या मेगा सिटी इमारतीत बोलावून घेतले. त्याला तीच बोलवत असल्याचे वाटल्याने नागेश दुचाकीवरुन तेथे गेला. नंतर रात्री आठच्या सुमारास आरोपींनी नागेशच्या आईच्या मोबाइलवर संपर्क साधला.

’तुमच्या मुलाला आम्ही मारले आहे. दहा मिनिटात मुलाला घेऊन जा. अन्यथा त्याला आम्ही इमारतीतून फेकून देऊ”, अशी धमकी आरोपींनी नागेशच्या आईला दिली. नंतर आरोपींनी मोबाइल बंद केला. नागेशची आई घाबरली. त्या कर्वे रस्त्यावरील मेगा सिटी इमारतीच्या आवारात आल्या. त्यांनी रहिवाशांकडे विचारणा केली. तेव्हा नागेशला मेगा सिटी इमारतीच्या गच्चीवर आरोपी मारहाण करत असल्याचे आईने पाहिले. नागेश गंभीर जखमी झाला होता. त्याने आईला मारहणीबाबत माहिती दिली. नागेशला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी त्याला घेउन त्या रिक्षाने निघाल्या.

माझे एका मुलीशी प्रेमसंबंध होते, असे नागेशने आईला सांगितले. तिने त्याला मेगा सिटी परिसरात बोलावून घेतले. तिची आई, काकू, तसेच नातेवाईकांनी नागेशला दांडक्याने मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाल्याचे नागेशच्या आईने तक्रारीत म्हटले आहे. नागेशला खासगी रुग्णलायातून ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल माने अधिक तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले अन् होत्याचं नव्हतं झालं; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील धक्कादायक घटना

Web Title: A shocking incident of murder of a young man has taken place in kothrud pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 04:46 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार
1

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास
2

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
3

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
4

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.