Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मांडूळ साप घेऊन फिरणाऱ्या दोघांना अटक; शिरुर पोलिसांची मोठी कारवाई

शिरुर शहरामध्ये बेकायदेशीरपणे मांडूळ जातीचा साप घेऊन फिरणाऱ्या दोघांना शिरुर पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. मांडूळ साप जप्त करुन वनविभागाच्या ताब्यात दिला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 31, 2025 | 05:40 PM
मांढूळ साप घेऊन फिरणाऱ्या दोघांना अटक; शिरुर पोलिसांची मोठी कारवाई

मांढूळ साप घेऊन फिरणाऱ्या दोघांना अटक; शिरुर पोलिसांची मोठी कारवाई

Follow Us
Follow Us:

शिक्रापूर : शिरुर शहरामध्ये बेकायदेशीरपणे मांडूळ जातीचा साप घेऊन फिरणाऱ्या दोघांना शिरुर पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. मांडूळ साप जप्त करुन वनविभागाच्या ताब्यात दिला असून, देवदास ईमराज भोसले व धनेश्वर दुर्यभान भोसले असे पोलिसांनी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार विजय शिंदे, सचिन भोई, नितेश थोरात, अजय पाटील, निरज पिसाळ हे शहारामध्ये गस्त घालत असताना दोन युवक रामलींग रोडलगत पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कार मध्ये बेकायादेशीपणे मांढूळ प्रजातीचा साप घेऊन थांबले असल्याची माहिती मिळाली त्यांनतर पोलिसांनी सदर ठिकाणी जात संशयित असलेल्या स्विफ्ट कारची पाहणी केली असता त्या कारमध्ये दोन युवक मांडूळ साप घेऊन बसल्याचे दिसून आले.

दरम्यान पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्या जवळील मांढूळ साप जप्त केला, तर पोल्सिंनी देवदास ईमराज भोसले (वय ५१ वर्ष रा. मुखई ता. शिरूर जि. पुणे) व धनेश्वर दुर्यभान भोसले (वय ३५ वर्ष, रा. गणेगाव खालसा ता. शिरूर जि. पुणे) या दोघांवर वन्यजीव संरक्षण अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल करत याबाबतची माहिती शिरुर वनविभागाचे वनपरीमंडळ अधिकारी गणेश पवार यांना देत जप्त केलेला मांडूळ साप त्यांच्या ताब्यात देण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण हे करत आहेत.

हे सुद्धा वाचा : पुणे हादरलं! कोथरूडमध्ये भरदिवसा तरूणाचा खून; कारणही आलं समोर

मांडूळ साप चावतो का?

मांडूळ साप खूप गरीब प्राणी म्हणून ओळखला जातो त्याला दोन्ही बाजूने तोंडे असतात आणि सापाच्या प्रजातीमधील सगळ्यात गरीब प्राणी म्हणून ओळखलं जातं तो मांडूळ सहा महिने एका तोंडाच्या दिशेने चालतो तर दुसऱ्या तोंडाने परत सहा महिने चालत असतो असे फक्त ऐकून आहेत परंतु हे प्राणी शक्यतो जंगलामध्ये किंवा जमिनीच्या खाली राहतात कदाचित चुकून माणसाच्या आदळामध्ये आलात तर तो काही करत नाही तो त्याच्या वाटेने निघून जातो त्याला इतर सापासारखे जोरात पळता येत नाही त्यामुळे तो एकदम हळुवार चालत असतो परंतु आजपर्यंत मांडूळ साप कोणाला चावला कधी ऐकले नाही कदाचित तो माती खातो आणि त्याला दात असणार परंतु तो गरीब प्राणी असल्यामुळे त्याला आजपर्यंत कोणी मारले नाही आणि कोणाला चावल्याचे ऐकले नाही शेतकऱ्याचा मित्र म्हणून त्याची ओळख आहे

Web Title: A team of shirur police has arrested two people who were illegally carrying mandhul snakes nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2025 | 05:35 PM

Topics:  

  • Arrested
  • maharashtra
  • Police News
  • Pune Police
  • Shirur Police

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
1

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन
2

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन

Bhandara News: डेंग्यू-मलेरियाबाबत आरोग्य विभाग ‘अलर्ट’!  यंदा डेंग्यूचे ७, हिवतापाचे ५ रुग्ण; दोन्ही आजारात मृत्यू निरंक
3

Bhandara News: डेंग्यू-मलेरियाबाबत आरोग्य विभाग ‘अलर्ट’!  यंदा डेंग्यूचे ७, हिवतापाचे ५ रुग्ण; दोन्ही आजारात मृत्यू निरंक

Mira Bhayandar News: मंत्र्यांच्या प्रोटोकॉलचा भंग भोवला; अतिरिक्त आयुक्तांची उचलबांगडी, सचिन बांगर यांची नियुक्ती
4

Mira Bhayandar News: मंत्र्यांच्या प्रोटोकॉलचा भंग भोवला; अतिरिक्त आयुक्तांची उचलबांगडी, सचिन बांगर यांची नियुक्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.