Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चालकाचा ताबा सुटल्याने थेट दरीत कोसळला ट्रक; झाडाला अडकल्याने मोठा अनर्थ टळला

धारणी तालुक्यातील सुसर्दा-राणीगाव घाटातील घोडादेव बाबा मंदिराजवळ शनिवारी मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे. बोरवेल मशीन घेऊन जाणारा एक जड वाहनचालकाचा ताबा सुटल्याने वाहन खोल दरीत कोसळले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 26, 2026 | 02:10 PM
चालकाचा ताबा सुटल्याने थेट दरीत कोसळला ट्रक; झाडाला अडकल्याने मोठा अनर्थ टळला
Follow Us
Follow Us:

धारणी : धारणी तालुक्यातील सुसर्दा-राणीगाव घाटातील घोडादेव बाबा मंदिराजवळ शनिवारी मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे. बोरवेल मशीन घेऊन जाणारा एक जड वाहनचालकाचा ताबा सुटल्याने वाहन खोल दरीत कोसळले. मात्र, वाहन वाटेतच एका मोठ्या झाडाला अडकल्याने ते आणखी खाली न पडता थांबले आणि वाहनातील प्रवाशांचे प्राण वाचले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ व रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले. तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही.

 

अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिस त्याचा तपास करीत आहेत. स्थानिकांच्या माहितीनुसार, सुसर्दा-राणीगाव घाट हा अनेक वर्षांपासून अपघातप्रवण मार्ग ठरला आहे. घटनेची माहिती मिळताच धारणी पोलिस ठाण्याचे प्रभारी अवतारसिंग चौहान यांनी पोलिस पथकाला घटनास्थळी पाठवून पंचनामा व तपास करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणाचा पुढील तपास धारणी पोलिस करीत आहेत. दरम्यान, स्थानिक नागरिक व वाहनचालकांनी घाटरस्त्यावर मजबूत क्रॅश बॅरिअर्स, संरक्षण भिंती, धोक्याचे इशारा फलक तसेच धोकादायक वळणांवर अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तातडीने उभारण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

हे सुद्धा वाचा : आषाढीला फराळ वाटप करून घरी निघाले अन्…; जमिनीच्या वादातून 65 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

पिकअप वाहनही उलटले

काही दिवसांपूर्वी याच घाटात एक पिकअप वाहन खोल दरीत कोसळून अनेकांचा मृत्यू झाला होता. वारंवार अपघात होत असतानाही या मार्गावर प्रभावी सुरक्षा उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली.

नवविवाहितेवर काळाचा घाला

राजस्थानमधील अजमेर शरीफ येथे दर्शन घेऊन नाशिककडे परतणाऱ्या भाविकांच्या कारचा धुळे जिल्ह्यातील शिरपूर फाटा परिसरात भीषण अपघात होऊन दोन जणांचा मृत्यू, तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेच्या मार्गावर गेली आणि समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळल्याने हा भीषण अपघात झाला आहे. नाशिक येथील भाविक इनोव्हा कार (क्रमांक एमएच ०५ सीव्ही १००१) मधून अजमेर शरीफ येथे दर्शन घेऊन नाशिककडे परतत होते. धुळे जिल्ह्यातील शिरपूर फाटा परिसरात पहाटेच्या सुमारास चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर गेली आणि समोरून येणाऱ्या ट्रकवर जोरदार आदळली. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की कारच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. या भीषण अपघातात बबलू रफिक सय्यद (३०, रा. वडाळा गाव) आणि नवाज सादिक शेख (रा. सिडको) यांचा मृत्यू झाला. तसेच साबीर शेख (वय १६), साहिल शेख (वय २६), मोहसीन शेख (वय ३२), अईन शेख (वय २२) आणि कैफ शेख (वय २२) हे पाच जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांपैकी नवाज सादिक शेख हे सिडको परिसरातील फिरदोस कॉलनी येथील रहिवासी होते. विशेष म्हणजे, त्यांचा अवघ्या चार महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता.

Web Title: A truck plunged directly into a valley after the driver lost control

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 02:10 PM

Topics:  

  • Accident News
  • maharashtra
  • Truck Accident

संबंधित बातम्या

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी
1

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर
2

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर

ऐन गणेशोत्सवातही फुलांचे भाव कोमेजले; अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत
3

ऐन गणेशोत्सवातही फुलांचे भाव कोमेजले; अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड
4

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.