काय घडलं नेमकं?
दत्तू अर्जुन जाधव (६५ वर्षीय) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. पाथर्डी-पिंपळगाव शिवरस्ता परिसरातील महालक्ष्मीनगर येथे ही घटना घडली. गेल्या काही वर्षांपासून मृत दत्तू जाधव आणि संशयित यांच्यात जमिनीच्या मालकीवरून वाद आहे. ते एकमेकांचे नातेवाईक असून त्यांचा जमिनीचा दावा न्यायालयात प्रलंबित आहे. शनिवारी आषाढी एकादशीनिमित्त पाथर्डी फाटा येथे फराळ वाटपाचा कार्यक्रम होता. तो कार्यक्रम आटोपून जाधव हे घरी जात होते. तेव्हा महालक्ष्मीनगर येथे दोन्ही गटांत पुन्हा वाद झाला. तेव्हा 5-6 जणांनी जाधव यांना मारहाण सुरू केली.
दत्तू जाधव यांना झालेल्या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. छातीवर झालेल्या दुखापतीमुळे त्यांची अचानक प्रकृती बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाला असा प्राथमिक अंदाज आहे. या वादाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. इंदिरानगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.
पतीने पत्नी आणि मुलाची केली निर्घृण हत्या; विष पिऊन आत्महत्येचाही प्रयत्न; कारण काय?
नाशिक येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकमधील वसंत विहार परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून एका पतीने स्वतःच्या पत्नी आणि लहान मुलाची निर्घृण हत्या केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या दुहेरी हत्येनंतर आरोपी पतीनेही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणामुळे नाशिक शहर हादरले असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Ans: दत्तू अर्जुन जाधव.
Ans: जमिनीचा जुना वाद.
Ans: चार संशयितांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.






