देशभरात दिवसेंदिवस गुन्हाच्या (Crime) घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. दिल्ली, मुंबईसारख्या शहरांमध्ये गेल्या काही दिवसात हत्या, अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या यादीत उत्तर प्रदेशही (Uttar Pradesh Crime) मागे नाही. उत्तर प्रदेशातील कानपूरमधील ग्वालटोली परिसरात आठवी इयत्तेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला वस्तीत राहणाऱ्या तरुणाने आधी प्रेमाच्या जाळ्यात अडकवले, त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नाही तर त्याने विद्यार्थिनीच्या छातीवर ब्लेडने त्याचे नाव लिहून तिला धमकावले. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
[read_also content=”उड्डाणपुलाखाली कुजलेल्या अवस्थेत आढळला परदेशी नागरिकाचा मृतदेह; परिसरात एकच खळबळ,घातपाताचा संशय https://www.navarashtra.com/crime/highly-decomposed-body-of-foreigner-found-in-delhis-geeta-colony-nrps-376895.html”]
उत्तर प्रदेशातील बरा येथे एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) करून तिच्या छातीवर ब्लेडने तिचे नाव गोंदवल्याची घटना काही दिवसांपुर्वी घडली होती घटनेतील सर्व आरोपींना अदयाप अटक झालेली नसतताना आता ग्वालटोली परिसरातही अशीच घटना समोर आली आहे. आधी परिसरातील मुलाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढुन तिच्यावर बलात्कार केला एवढेच नाही तर त्याने विद्यार्थिनीच्या छातीवर ब्लेडने त्याचे नाव लिहून तिला धमकावले. आरोपीने विद्यार्थिनीला घरून पैसे आणण्यास सांगितले नाहीतर ब्लेडने तिचा गळा चिरून टाकू. तसेच बलात्काराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणार असल्याचे सांगितले.
आरोपीच्या धमकीने विद्यार्थिनी इतकी घाबरली की तिने घरात ठेवलेले 10.5 लाख रुपये काढून हळूहळू महिन्याभरात आरोपीला दिले. हे पैसे विद्यार्थ्याच्या वडिलांनी मोठ्या मुलीच्या लग्नासाठी ठेवले होते. ब्रीफकेस रिकामी पाहून त्याला धक्काच बसला. याबाबत विद्यार्थ्याच्या वडिलांनी घरातील सर्वांना विचारले असता विद्यार्थ्याने सर्व प्रकार सांगितला.यानंतर विद्यार्थ्याच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. अमन नावाच्या मुलाने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर अत्याचार केल्याचे विद्यार्थिनीने सांगितले. त्यानंतर ब्लॅकमेलिंग करून आधी आईचे मंगळसूत्र मागवले. तिने आईचे मंगळसूत्र चोरून अमनला दिल्याचे पीडितेने सांगितले.
मुलीने पैसे दिल्यानंतरही तो पुन्हा तिच्याकडे पैशांची मागणी करू लागला. मागणी पूर्ण न केल्यास धमक्याही देण्यास सुरुवात केली. भीतीपोटी विद्यार्थिनीने घरात ठेवलेले 10.5 लाख रुपये हळूहळू आरोपीच्या दिले. या संपूर्ण प्रकरणात अमनचे मित्रही सहभागी असल्याचे विद्यार्थ्याने सांगितले. पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अमन आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या अमन फरार आहे. त्याला आणि त्याच्या साथीदारांना पकडण्यासाठी पोलिसांची अनेक पथके तयार करण्यात आली आहेत. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांंगितले.