मेरठ (उत्तर प्रदेश): मेरठमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीने आपल्या सक्ख्या आईविरोधात अत्यंत गंभीर आरोप केला आहे. तिला जबरदस्तीने कोंडून ठेवून तिच्यावर अत्याचार करायला लावल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर आईने या अल्पवयीन मुलीचा तिच्याच सावत्र भावासोबत जबरदस्तीने लग्न लावून दिल्याचा आरोप देखील केला आहे. पीडित मुलगी आपल्या मोठ्या बहिणीकडे पळून गेली, त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आले आहे. तिची बहीण आणि पीडित मुलगी मेरठ एसएसपी कार्यालयात पोहोचल्या आणि या प्रकरणी तक्रार दाखल केली.
Baramati Crime: एसटीतील ‘त्या’ कोयताधारी युवकामुळे अत्यवस्थ असलेल्या महिलेचा दुर्दैवी अंत
नेमकं काय आहे प्रकरण ?
पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, तिची आई हापुड येथील आपल्या सावत्र पतीच्या ४५ वर्षीय मुलासोबत तिचा लग्न लावण्याचा प्रयत्न करत होती. जेव्हा मुलीने याचा विरोध केला, तेव्हा तिच्या आईने तिला तीन दिवस एका खोलीत कोंडून ठेवलं. त्या ४५ वर्षीय भावाला बोलून तिच्यावर तीन दिवसांपर्यंत अमानुष अत्याचार करण्यात आला. तिने सांगितले की, “तो व्यक्ती माझ्यावर दररोज जबरदस्ती करत राहिला आणि आई फक्त म्हणत राहिली, आता तरी निकाह कर,” असं सांगितलं. पीडित मुलगी आपल्या मोठ्या बहिणीकडे पळून गेली, त्यानंतर तिने ही सर्व आपबिती तिच्या बहिणीला सांगितली. त्यानंतर दोघी बहिणी मेरठ एसएसपी कार्यालयात पोहोचल्या आणि या फ्रकरणी तक्रार दाखल केली.
याआधी सात वेळा निकाह
पीडित मुलीने सांगितले की, तिच्या आईचे यापूर्वी सात वेळा निकाह झाले असून ती चुकीच्या मार्गावर गेली आहे. लहान बहिणीचं लग्नही तिने एका वयोवृद्ध पुरुषासोबत जवादस्तीने लावलं. तिच्या मोठ्या बहिणीने याच कारणामुळे कुटुंबापासून संबंध तोडले आहेत. पीडितेने आरोप केला आहे की २००६ मध्ये तिच्या आईनेच तिच्या वडिलांची हत्या केली होती. या प्रकरणात तिला जन्मठेपेची शिक्षा झाली होती, आणि ती सध्या हायकोर्टाच्या जामिनावर बाहेर आली आहे.
कठोर कारवाई करण्याचं आश्वासन
पीडित मुलगी आपल्या बहिणीच्या मदतीने एसएसपी कार्यालयात पोहोचली. सध्या एसपी (देहात) यांनी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.
आधी पार्टीत धिंगाणा घातला, पोलिस येताच मंत्री बावनकुळेंच्या नावाने दमदाटी केली; नंतर कारवाई झाली