Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघात; भरधाव दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू

भरधाव दुचाकीच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर भूमकर पूल परिसरात घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 12, 2026 | 12:36 PM
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघात; भरधाव दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघात; भरधाव दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज अपघातांमध्ये अनेक नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. अशातच आता आणखी एक अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव दुचाकीच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर भूमकर पूल परिसरात घडली आहे. या अपघातात दुचाकीस्वार तरुणासह तिघे जण जखमी झाले आहेत.

 

अमरजा गोपाळ हांडे (वय ३७, रा. गोकुळनगर, वारजे) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार साहिल सुनील कवडे (वय २२, रा. लिपाणे वस्ती, जांभुळवाडी, आंबेगाव) गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत अमरजा यांची मुलगी अस्मिता (वय १७) हिने नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्मिता, तिची आई अमरजा आणि भाऊ हे ९ एप्रिल रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरून निघाले होते. नऱ्हे परिसरातील भूमकर पुलाजवळ साहिल कवडे हा भरधाव वेगाने दुचाकी चालवत होता. त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने अस्मिताच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात अमरजा आणि त्यांचा मुलगा जखमी झाले, तर अमरजा आणि कवडे यांना गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान अमरजा यांचा मृत्यू झाला. अपघातात कवडे गंभीर जखमी झाला असून अस्मिता आणि तिच्या भावालाही दुखापत झाली आहे. भरधाव आणि निष्काळजीपणे दुचाकी चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी कवडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तूपसौंदर करत आहेत.

हे सुद्धा वाचा : चोरीचा माल घेणाऱ्या भंगार व्यवसायिकासह तिघांना ठोकल्या बेड्या; बारामती पोलिसांची मोठी कारवाई

दिवे घाटात भीषण अपघातात बाप-लेकीचा मृत्यू

गेल्या काही दिवसाखाली दिवे घाटात झालेल्या भीषण अपघातात बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एका भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे. सोमवारी मध्यरात्री हा अपघात झाला आहे. सुंदर कैलास गंगावणे (वय ३८, रा. उंड्री-पिसोळी) व अनन्या सुंदर गंगावणे (वय १२) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर, अपघातात सोहम सुंदर गंगावणे जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी ट्रक चालक हनुमंत बाबूराव मलकापुरे (वय ३२, रा. नागेवाडी, ता. शिरुर अनंतपाळ, जि. लातूर) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत अश्विनी उत्तम पवार (वय ३०, रा. कमलविहार सोसायटी, धनकवडी) यांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Web Title: A woman died after being hit by a speeding bike in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 12:36 PM

Topics:  

  • Accident Case
  • Accident Death
  • pune news

संबंधित बातम्या

महाराष्ट्रात खळबळ! उपजिल्हाधिकारी अन् १५ कर्मचाऱ्यांचे निलंबन; महसूलमंत्र्यांची घोषणा, प्रकरण काय?
1

महाराष्ट्रात खळबळ! उपजिल्हाधिकारी अन् १५ कर्मचाऱ्यांचे निलंबन; महसूलमंत्र्यांची घोषणा, प्रकरण काय?

Pune News: आषाढी वारीत वारकऱ्यांसाठी आधार हाऊसिंग फायनान्सचा अनोखा उपक्रम; 100 विश्रांती कक्षांची सुविधा
2

Pune News: आषाढी वारीत वारकऱ्यांसाठी आधार हाऊसिंग फायनान्सचा अनोखा उपक्रम; 100 विश्रांती कक्षांची सुविधा

पुणे शहराच्या काँक्रीटीकरणात गुदमरत आहेत झाडांची मुळे; तज्ज्ञांकडून ‘ट्री सेफ्टी ऑडिट’ची शिफारस
3

पुणे शहराच्या काँक्रीटीकरणात गुदमरत आहेत झाडांची मुळे; तज्ज्ञांकडून ‘ट्री सेफ्टी ऑडिट’ची शिफारस

पाऊले चालती पंढरीची वाट…! संत ज्ञानेश्वर आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे पुण्यात भक्तिभावात स्वागत
4

पाऊले चालती पंढरीची वाट…! संत ज्ञानेश्वर आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे पुण्यात भक्तिभावात स्वागत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.