Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: आषाढी वारीत वारकऱ्यांसाठी आधार हाऊसिंग फायनान्सचा अनोखा उपक्रम; 100 विश्रांती कक्षांची सुविधा

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आधार हाऊसिंग फायनान्सने वारकऱ्यांसाठी सामाजिक बांधिलकी जपत एक विशेष उपक्रम सुरू केला आहे. प्रवासादरम्यान भाविकांना विश्रांतीची सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच, घरमालकीबाबत जनजागृती करण्यासाठी कंपनी पथनाट्य आणि विविध सामुदायिक कार्यक्रमही राबवत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 10, 2026 | 10:23 AM
Pune News: आषाढी वारीत वारकऱ्यांसाठी आधार हाऊसिंग फायनान्सचा अनोखा उपक्रम; 100 विश्रांती कक्षांची सुविधा

Pune News: आषाढी वारीत वारकऱ्यांसाठी आधार हाऊसिंग फायनान्सचा अनोखा उपक्रम; 100 विश्रांती कक्षांची सुविधा

Follow Us
Follow Us:
  • आधार हाऊसिंग फायनान्सने पंढरपूर वारीतील वारकऱ्यांसाठी 100 विश्रांती कक्ष उभारून प्रवास अधिक आरामदायी करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
  • घरमालकीबाबत जनजागृती करण्यासाठी कंपनीकडून पथनाट्य आणि सामाजिक जागरूकता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
  • पुणे, लोणंद आणि पंढरपूर येथे पथनाट्याचे प्रयोग होणार असून, या उपक्रमाचे कव्हरेज भडिपा (BhaDiPa) करणार आहे.
पुणे: सामाजिक कल्याण आणि सकारात्मक सामाजिक प्रभावासाठी आपली कटिबद्धता अधिक दृढ करत आधार हाऊसिंग फायनान्स पंढरपूर वारीमध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांना त्यांच्या प्रवासातील अडचणी दूर करण्याकरिता आवश्यक सुविधा पुरवून मदत करत आहे, तसेच घरमालकीबद्दल शिक्षित करून त्यांच्यामध्ये जनजागृती देखील निर्माण करत आहे. महाराष्ट्रभर ८५ हून शाखांच्या प्रबळ उपस्थितीसह आधार हाऊसिंग फायनान्स राज्यातील १०,००० पेक्षा जास्त ग्राहकांना अभिमानाने सेवा देत आहे, ज्यामुळे व्यक्ती आणि कुटुंबांना त्यांचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न साकारण्यास मदत होत आहे.

पाऊले चालती पंढरीची वाट…! संत ज्ञानेश्वर आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे पुण्यात भक्तिभावात स्वागत

दरवर्षी, लाखो वारकरी कडक ऊन आणि मुसळधार पावसाची पर्वा न करता विठ्ठलाच्या दर्शनासाठी अत्यंत कठीण प्रवास करतात, ज्‍यामधून त्‍यांचा दृढ विश्वास, स्थिरता आणि भक्तीचे दर्शन होते. या यात्रेतील शारीरिक श्रमाची जाणीव ठेवून आधार हाऊसिंग फायनान्सने वारकऱ्यांसाठी १०० विश्रांती कक्ष उपलब्ध करून दिले आहेत, जे यात्रेदरम्यान भाविकांना विश्रांतीची सुविधा देतात, ज्‍यामुळे ते आपली आध्यात्मिक यात्रा पुढे सुरू ठेवण्यापूर्वी काही वेळ आरामात विश्रांती घेऊ शकतील.

सायंकाळी वारकरी विश्रांती घेत असतात, तेव्हा कंपनीने सर्जनशील पथनाट्याद्वारे शैक्षणिक जनजागृती उपक्रम देखील सुरू केला आहे. या उपक्रमासाठी खास लिहिलेले पथनाट्य एका कुटुंबाच्या प्रवासाभोवती फिरते, ज्यांचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न होते, पण पैशांच्या अभावामुळे त्यांना स्‍वप्न साकारताना काही अडचणींचा सामना करावा लागला. केवळ कठोर परिश्रम आणि योग्य आर्थिक मार्गदर्शनाच्या जोरावर ते कुटुंब आपले स्वप्न पूर्ण करण्यात कसे यशस्वी होते, हे या नाटकात दाखवले आहे. याव्यतिरिक्त, या पथनाट्याचे कव्हरेज प्रसिद्ध मराठी इन्फ्लुएन्सर चॅनेल भडिपा (BhaDiPa) द्वारे केले जात आहे, जे वारकऱ्यांशी संवाद साधून, त्यांचा वारीचा अनुभव आणि त्यांच्या घरमालकीचा प्रवास समजून घेऊन हा उपक्रम अधिक लक्षवेधक बनवत आहे.

या पथनाट्याचे प्रयोग ९ जुलै रोजी नाना पेठ, पुणे, १५ जुलै रोजी लोणंद आणि २४ जुलै रोजी पंढरपूर येथे होणार आहेत. या उपक्रमाचा सांस्कृतिकदृष्ट्या संबंधित गोष्टीच्या माध्यमातून लोकांशी जोडले जाण्‍याचा आणि किफायतशीर हाऊसिंग फायनान्सबद्दल अधिक जागरूकता निर्माण करण्‍याचा मनसुबा आहे.

या प्रसंगी मत व्‍यक्त करत आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे एमडी आणि सीईओ रिषी आनंद म्हणाले, “आषाढी वारी चिकाटी आणि निष्ठेची उत्कट अभिव्यक्ती आहे, जिने अनेक पिढ्यांपासून विविध समुदायांना एकत्र आणले आहे. आधार हाऊसिंग फायनान्समध्ये आम्हाला वारकऱ्यांना त्यांच्या प्रवासादरम्यान विश्रांती घेता येईल आणि त्यांचा थकवा दूर करता येईल अशी जागा उपलब्ध करून देऊन मदत करण्याचे भाग्य लाभले आहे. विश्रांतीसाठी बांधण्‍यात आलेले तंबू आणि पथनाट्याच्या माध्यमातून आम्ही भाविकांना आराम व जवळीक या दोन्ही गोष्टी देण्याची आशा करतो. प्रबळ समुदाय निर्माण करण्यासाठी कटिबद्ध कंपनी म्‍हणून आमचा विश्वास आहे की, काळजीपोटी घेतलेले छोटेसे पाऊल देखील आम्ही सेवा देत असलेल्या व्‍यक्तींच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणू शकते.”

दुथडी भरलेली इंद्रायणी क्षणभर थांबली! वारकरी विठूनामात दंग; संत ज्ञानेश्वर माऊलींचे पंढरीकडे प्रस्थान

कंपनी दरवर्षी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांचा आराम, सुरक्षितता आणि कल्याण वाढवण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबवते. आवश्यक सुविधा पुरवणे असो, विश्रांतीसाठी जागा तयार करणे असो किंवा अर्थपूर्ण सामुदायिक उपक्रमांद्वारे वारकऱ्यांशी जोडले जाणे असो नेहमी उत्तम सुविधा देते.

Web Title: Aadhar housing finance launches rest shelters and awareness drive for pandharpur wari pilgrims

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 10:23 AM

Topics:  

  • Ashadhi Wari 2026
  • pandharpur wari
  • pune news

संबंधित बातम्या

Pune Cricket: स्पार्टन मान्सून लीग T-20: लेजंड्स स्पोर्ट्स क्लब अन् कल्याण क्लबची विजयी मालिका सुरूच
1

Pune Cricket: स्पार्टन मान्सून लीग T-20: लेजंड्स स्पोर्ट्स क्लब अन् कल्याण क्लबची विजयी मालिका सुरूच

Sports News: निर्णायक थरार! ‘सुप्रीम एसेस’ने राखले वर्चस्व; PYC Snooker League ची ट्रॉफी पुन्हा उंचावली
2

Sports News: निर्णायक थरार! ‘सुप्रीम एसेस’ने राखले वर्चस्व; PYC Snooker League ची ट्रॉफी पुन्हा उंचावली

Mhada Pune: स्वप्नातले घर आता सत्यात येणार! म्हाडाच्या लॉटरीचा बिगुल वाजला; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
3

Mhada Pune: स्वप्नातले घर आता सत्यात येणार! म्हाडाच्या लॉटरीचा बिगुल वाजला; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Pune Accident : सिंहगड रस्त्यावरील अपघातात तरुणीचा मृत्यू; पीएमपी बसमधून पडली अन् थेट…
4

Pune Accident : सिंहगड रस्त्यावरील अपघातात तरुणीचा मृत्यू; पीएमपी बसमधून पडली अन् थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.