Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाऊले चालती पंढरीची वाट…! संत ज्ञानेश्वर आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे पुण्यात भक्तिभावात स्वागत

महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या 'पुणे प्रथम-सेवावारी २०२६' उपक्रमांतर्गत दोन्ही पालखी सोहळ्यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करून पुष्पवृष्टी करीत स्वागत करण्यात आले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 09, 2026 | 09:57 PM
पाऊले चालती पंढरीची वाट…! संत ज्ञानेश्वर आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे पुण्यात भक्तिभावात स्वागत
Follow Us
Follow Us:
  • पुण्यनगरीत भक्तीसागर लोटला
  • पुणेकरांच्यावतीने महापौर मंजुषा नागपुरे यांनी केले स्वागत 
  • भक्तिमय वातावरणात पालखी सोहळा पुण्यात दाखल
पुणे: आषाढीवारीसाठी निघालेला संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखीसोहळा गुरुवारी सायंकाळी पुण्यात दाखल झाला. या दोन्ही पालखी सोहळ्यांचे पुणेकरांच्यावतीने महापौर मंजुषा नागपुरे यांनी स्वागत केले. गुरुवारी रात्री उशिरा हा पालखी सोहळा मुक्कामाच्या ठिकाणी विसावला.

टाळ-मृदुंगाचा अखंड निनाद, भगव्या पताका हाती घेऊन, डोक्यावर तुळस, लाखो कंठातून घुमणारा ‘ज्ञानोबा-तुकाराम’ चा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात पालखी सोहळा पुण्यात दाखल झाला. पुणे शहर विठ्ठलमय झाले असताना वारकरी संप्रदायाच्या भक्ती, समता आणि सेवाभावाच्या परंपरेचे पुणेकरांनी जल्लोषात स्वागत केले. पालखी मार्गावर विविध स्वंयसेवी संस्था, गणेश मंडळ आणि पुणेकरांनी वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी विविध गरजेच्या वस्तुंचे, त्याचप्रमाणे पाणी, चहा, खाद्यपदार्थांचे वाटप केले.

पारंपारिक पद्धतीने औक्षण

महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ‘पुणे प्रथम-सेवावारी २०२६’ उपक्रमांतर्गत दोन्ही पालखी सोहळ्यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करून पुष्पवृष्टी करीत स्वागत करण्यात आले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे महापौर नागपुरे यांनी औक्षण केले आणि पादुकांचे दर्शन घेतले.

दुथडी भरलेली इंद्रायणी क्षणभर थांबली! वारकरी विठूनामात दंग; संत ज्ञानेश्वर माऊलींचे पंढरीकडे प्रस्थान

जगदगुरु तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आकुर्डी येथील मुक्काम झाल्यानंतर गुरुवारी सकाळी पुण्याकडे निघाला. तर आळंदी येथून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पुण्याच्या दिशेने निघाला. पुणेकरांच्यावतीने महापौर नागपुरे यांनी अनुक्रमे बोपोडी आणि कळस येथे या पालखी सोहळ्यांचे स्वागत केले. यावेळी उपमहापौर परशुराम वाडेकर, विरोधी पक्षनेते ॲड. निलेश निकम, राष्ट्रवादी गटनेते सोपान सोपान चव्हाण, पक्षनेते नितीन गावडे, आयुक्त नवलकिशोर राम यांच्यासह स्थानिक नगरसेवक, पुणे महानगरपालिका अधिकारी तसेच स्थानिक नागरिक व वारकरी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालखीच्या स्वागतासाठी पुण्यातील मंदिरे सज्ज; मंडप, रोषणाईसह वारकऱ्यांच्या सुविधांची तयारी पूर्ण

पालखीच्या स्वागतासाठी पुण्यातील मंदिरे सज्ज
पालखी विठोबा मंदिर परिसरातही महापालिकेच्या सहकार्याने रस्त्यांची दुरुस्ती, स्वच्छता आणि रंगरंगोटीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. यंदाच्या वारीमध्ये ‘हरित वारी, स्वच्छ वारी’ हा संदेश देण्यात येणार असून स्वच्छतेवर विशेष भर दिला जाणार आहे. पालखी विठोबा मंदिरात दरवर्षी जागेअभावी भाविकांची मोठी गर्दी होत होती. त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी अन्यत्र हलविण्याची चर्चा सुरू होती. मात्र यंदा मंदिराशेजारील खासगी जागा शासनाच्या सहाय्याने मंदिर परिसरात समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा अधिक प्रशस्त मंडप उभारण्यात आला असून दर्शनासाठी सुटसुटीत व्यवस्था करण्यात आली आहे. ‘सर्व तयारी पूर्ण झाली असून आता केवळ पालखीच्या आगमनाची प्रतीक्षा आहे,’ असे विश्वस्त गोरखनाथ भिकुले यांनी सांगितले.

 

Web Title: Sant tukaram maharaj and sant dyaneshwar mauli palkhi reached pune city ashadhi wari 2026 pandharpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 09:44 PM

Topics:  

  • Ashadhi Wari 2026
  • pune news
  • Saint Tukaram Maharaj Palkhi
  • Sant Dnyaneshwar Maharaj

संबंधित बातम्या

दुध भेसळीच्या हॉटस्पॉटवर मुंढेंचा दुसरा सर्जिकल स्ट्राईक; १.३४ कोटींची संशयित पावडर जप्त, मंचरनंतर थेट अकलूजवर धाड
1

दुध भेसळीच्या हॉटस्पॉटवर मुंढेंचा दुसरा सर्जिकल स्ट्राईक; १.३४ कोटींची संशयित पावडर जप्त, मंचरनंतर थेट अकलूजवर धाड

Aadesh Bandekar : आदेश बांदेकरांचं कुटुंब वारीच्या वाटेवर! सासऱ्यांचा ‘तो’ प्रश्न ऐकून लाजली पूजा बिरारी, VIDEO व्हायरल
2

Aadesh Bandekar : आदेश बांदेकरांचं कुटुंब वारीच्या वाटेवर! सासऱ्यांचा ‘तो’ प्रश्न ऐकून लाजली पूजा बिरारी, VIDEO व्हायरल

Maharashtra Breaking News Updates Today: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकार टाकणार मोठा डाव?
3

Maharashtra Breaking News Updates Today: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकार टाकणार मोठा डाव?

‘लालपरी’ला पावसाचा फटका; पुणे एसटी प्रशासनाला दररोज भोगावे लागतेय तब्बल ‘इतक्या’ लाखोंचे नुकसान
4

‘लालपरी’ला पावसाचा फटका; पुणे एसटी प्रशासनाला दररोज भोगावे लागतेय तब्बल ‘इतक्या’ लाखोंचे नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.