Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू; हडपसरमधील जेएसपीएम कॉलेजजवळील घटना

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हडपसरमधील जेएसपीएम कॉलेज परिसरात भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत एका १९ वर्षीय दुचाकीस्वार तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 10, 2025 | 12:30 AM
नागपूर-जबलपूर महामार्गावर भीषण अपघात; कार-ट्रॅव्हल्सची जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू

नागपूर-जबलपूर महामार्गावर भीषण अपघात; कार-ट्रॅव्हल्सची जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात अपघाताच्या घटना वाढल्या आहे. दररोज वेगवेगळ्या भागात अपघातात अनेकांना जीव गमवावा लागत आहे. अशातच आता पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हडपसरमधील जेएसपीएम कॉलेज परिसरात भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत एका १९ वर्षीय दुचाकीस्वार तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अपघातानंतर डंपरचालक घटनास्थळी न थांबता तसेच त्याची माहिती न देता पसार झाला आहे. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

अभिजीत गणेश रेवले (वय १९, रा. फुरसुंगी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी काळेपडळ पोलिस ठाण्यात अज्ञात डंपरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत त्याचे भाऊजी कचन कराळे (वय ४२) यांनी तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, अभिजीत हा फुरसुंगी परिसरातील संकेत विहार गल्लीत राहण्यास आहे. दरम्यान, तो सोमवारी रात्री सातच्या सुमारास त्याच्या दुचाकीवरून जेएसपीएम कॉलेज जवळून निघाला होता. तो अहिल्यादे‌वी होळकर चौकात आला असता पाठिमागून आलेल्या भरधाव डंपरने त्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत तो खाली पडून गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, डंपरचालक पसार झाला असून, त्याचा शोध पोलिस घेत आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक गुरव हे करत आहेत.

नांदेडमध्ये भीषण अपघात

नांदेडमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. नांदेडच्या भोकर तालुक्यातील पाळज येथील प्रसिद्ध असलेल्या गणपतीचे दर्शन घेऊन परत जात होती तेव्हा हा अपघात घडला. भोकर तालुक्यातील नांदा म्है.प. येथील शाळेजवळ उभ्या असलेल्या ट्रकला कारने धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला आहे. या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत. मयत सर्व तेलंगणा राज्यातील निजामाबाद जिल्ह्यातील बोधन येथील रहिवासी आहे. ही घटना बुधवारी घडली आहे.

Web Title: A young man died after being hit by a speeding dumper in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2025 | 12:30 AM

Topics:  

  • Accident News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
1

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
2

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
3

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
4

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.