Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime News : व्यवहार पुर्ण न करता फ्लॅटचा ताबा घेतला; दाम्पत्यावर पुण्यात गुन्हा दाखल

कोंढवा परिसरात एका दाम्पत्याने फ्लॅट खरेदीचा व्यवहार करून ठरलेली रक्कम न देता परस्पर फ्लॅटचा ताबा घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 21, 2026 | 03:18 PM
तब्बल चार वर्षानंतर 'दृश्यम्' स्टाईल झाला खुनाचा उलगडा; आरोपीच्याच पत्नीने तक्रार दिली अन्...

तब्बल चार वर्षानंतर 'दृश्यम्' स्टाईल झाला खुनाचा उलगडा; आरोपीच्याच पत्नीने तक्रार दिली अन्...

Follow Us
Follow Us:

पुणे : कोंढवा परिसरात एका दाम्पत्याने फ्लॅट खरेदीचा व्यवहार करून ठरलेली रक्कम न देता परस्पर फ्लॅटचा ताबा घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी प्रवीण मंचलाल ओसवाल आणि भारती प्रवीण ओसवाल या दोघांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२९(३) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, हा गुन्हा पुढील तपासासाठी येवलेवाडी पोलिस स्टेशनकडे वर्ग करण्यात आला आहे. बांधकाम व्यावसायिक प्रकाश रामचंद्र जैन (५२, रा. गगन गॅलक्सी, बिबवेवाडी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, जैन यांची कोंढव्यात ‘मंडोत टॉवर्स’ नावाची इमारत आहे. प्रवीण ओसवाल आणि जैन यांची जुनी ओळख असून, ओसवाल यांच्या भावांनी यापूर्वी जैन यांच्याकडून दोन फ्लॅट खरेदी केले होते. त्यामुळे जैन यांचा ओसवाल यांच्यावर विश्वास होता. ओळखीचा फायदा घेत, प्रवीण ओसवाल यांनी स्वतःसाठी फ्लॅट खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. २७ एप्रिल २०२१ रोजी मंडोत टॉवर्समधील दहाव्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक १००३ (९५७ चौ.फू. आणि २२० चौ.फू. टेरेस) याचा ७० लाख रुपयांना व्यवहार ठरला. त्यावेळी साठेखत करून ओसवाल यांनी जैन यांना २० लाख १० हजार रुपये दिले आणि उर्वरित ४९ लाख ९० हजार रुपये ७ महिन्यांत देण्याचे ठरले.

मात्र, मुदत उलटून गेल्यानंतरही ओसवाल यांनी पैसे दिले नाहीत. वारंवार तगादा लावूनही त्यांनी खोटी कारणे सांगून वेळ मारून नेली. ऑगस्ट २०२५ मध्ये ओसवाल आणि त्यांच्या काही साथीदारांनी जैन यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना फ्लॅटचा ताबा देण्यासाठी आणि अतिरिक्त दोन लाख रुपये देण्यासाठी धमकावले. त्यानंतर जैन यांनी ३० ऑगस्ट २०२५ रोजी वकिलामार्फत करार रद्द केल्याची नोटीस पाठवली आणि घेतलेले पैसे (१८ लाख ९ हजार रुपये) धनादेशाद्वारे परत केले. मात्र, ओसवाल यांनी ते पैसे न घेता फ्लॅटचे सेल डीड करून देण्याची मागणी केली.

सदर फ्लॅटवर पुणे महानगरपालिकेचा कर थकीत असल्याने पालिकेने फ्लॅट सील केला होता. मात्र, नोव्हेंबर २०२५ मध्ये प्रवीण ओसवाल यांनी जैन यांच्या परवानगीशिवाय फ्लॅटचे कुलूप आणि पालिकेने लावलेले सील तोडून बेकायदेशीररीत्या फ्लॅटमध्ये प्रवेश केला आणि वीज बिलही स्वतःच्या नावावर करून घेतले. याप्रकरणी आता कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास येवलेवाडी पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा : ‘मुलीचं लग्न माझ्याशी लावा’ नाही तर…, गुन्हा दाखल; बीडमध्ये धक्कादायक प्रकार

Web Title: A couple has cheated a construction worker in the kondhwa area of pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 03:18 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार
1

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार

दणदणाट करणाऱ्या डीजेला पुणे पोलिसांचा दणका; तब्बल 14 लाखांचा ट्रक-साउंड सिस्टीम जप्त
2

दणदणाट करणाऱ्या डीजेला पुणे पोलिसांचा दणका; तब्बल 14 लाखांचा ट्रक-साउंड सिस्टीम जप्त

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न
3

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न

महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल
4

महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.