Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे महापालिकेत भाजपाच्या नगरसेवकांची जोरदार घोषणाबाजी, काँग्रेस नगरसेवकांचेही प्रत्त्युत्तर; नेमकं काय घडलं?

नारी शक्ती विधेयकाचा विषय पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही गाजला. विधेयकास विरोध करणाऱ्या काँग्रेसचा धिक्कार असो” अशा घोषणा देत भाजपच्या नगरसेवकांनी सभेत जोरदार घोषणाबाजी केली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 21, 2026 | 01:03 PM
पुणे महापालिकेत भाजपाच्या नगरसेवकांची जोरदार घोषणाबाजी, काँग्रेस नगरसेवकांचेही प्रत्त्युत्तर; नेमकं काय घडलं?

पुणे महापालिकेत भाजपाच्या नगरसेवकांची जोरदार घोषणाबाजी, काँग्रेस नगरसेवकांचेही प्रत्त्युत्तर; नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:
  • पुणे महापालिकेत भाजपाच्या नगरसेवकांची जोरदार घोषणाबाजी
  • काँग्रेस नगरसेवकांचेही प्रत्त्युत्तर
  • नेमकं काय घडलं?
पुणे : नारी शक्ती विधेयकाचा विषय पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही गाजला. “नारी फुल नही चिंगारी है” तसेच “नारी शक्ती विधेयकास विरोध करणाऱ्या काँग्रेसचा धिक्कार असो” अशा घोषणा देत भाजपच्या नगरसेवकांनी सभेत जोरदार घोषणाबाजी केली. संसदेत मांडण्यात आलेल्या ‘नारी शक्ती सन्मान विधेयका’च्या नामंजुरीचे पडसाद सोमवारी पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. भाजप आणि काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये घोषणाबाजी आणि गोंधळ झाल्याने सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर महापौरांनी मध्यस्ती करत सर्व सभासदांना जागेवर बसण्याच्या सूचना दिल्या. आणि कामकाजाला सुमारे अर्धा तास विलंब झाला.

 

संसदेत मांडण्यात आलेल्या ‘नारी शक्ती सन्मान विधेयका’च्या नामंजुरीचे पडसाद सोमवारी पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. सभागृहात वंदे मातरम गीत झाल्यानंतर भाजपच्या सर्व नगरसेविका महापौर यांच्या समोर आल्या. नगरसेविका निवेदिता एकबोटे, वर्षा तापकीर, मानसी देशपांडे, स्वरदा बापट यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या महिला नगरसेविकांनी महापौर मंजुषा नागपुरे यांच्या आसनासमोर एकत्र येत काँग्रेसविरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. यामध्ये इतर सर्व नगरसेवकांनीही सहभाग घेतला. घोषणाबाजीने सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

भाजपच्या नगरसेवकांना विरोध करत काँग्रेसच्या नगरसेवकांनी देखील घोषणा देण्यास सुरुवात केली. यानंतर भाजपच्या नगरसेविकांचा मोर्चा काँग्रेस गटनेते चंदुशेठ कदम यांच्या आसनाकडे वळला. या घडामोडीनंतर काँग्रेसच्या नगरसेविका आणि नगरसेवकही आक्रमक होत भाजपविरोधात घोषणाबाजी करू लागले. दोन्ही पक्षांचे सदस्य समोरासमोर आल्याने सभागृहात गोंधळ वाढला.

हे सुद्धा वाचा : कधी व कुठे चर्चा करायची? मोदींनाही चर्चेला बोलवा; प्रणिती शिंदेंनी CM फडणवीसांचे आव्हान स्वीकारले

अर्धा तास विलंबाने कामकाज

भाजपच्या नगरसेविकांना समर्थन देण्यासाठी पक्षाचे इतर नगरसेवक आणि पदाधिकारी पुढे आले. त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसचे गटनेते कदम यांच्यासह अरविंद शिंदे, प्रशांत जगताप आदी नगरसेवकही आक्रमक झाले. परिणामी सभागृहातील वातावरण तणावपूर्ण बनले. या गोंधळामुळे सर्वसाधारण सभेचे कामकाज काही काळासाठी ठप्प झाले आणि सुमारे अर्धा तास विलंबाने पुन्हा सुरू करण्यात आले.

Web Title: Bjp corporators raised slogans in pune municipal corporation as india aghadi opposed the nari shakti bill

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 01:03 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
1

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
2

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
3

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद
4

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.