Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PCMC News:  एमआयडीसी परिसरातील मूलभूत समस्यांवर तातडीने उपाययोजना : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

औद्योगिक भागातील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती, खड्डेमुक्त रस्ते, सुकर वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षित औद्योगिक वातावरण निर्मितीसाठी आवश्यक उपाययोजना तातडीने हाती घेण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

  • By anuradha sagar
Updated On: Apr 21, 2026 | 05:48 PM
PCMC MIDC News, Pimpri Chinchwad Infrastructure, Dr. Vijay Suryavanshi Commissioner,

PCMC MIDC News, Pimpri Chinchwad Infrastructure, Dr. Vijay Suryavanshi Commissioner,

Follow Us
Follow Us:

PCMC News:  एमआयडीसी परिसरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते दुरुस्ती, घातक कचरा व्यवस्थापन तसेच लघुउद्योगांशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. उद्योगधंद्यांना सक्षम, सुरक्षित आणि विकासपूरक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एमआयडीसी भागांचा सर्वांगीण विकास हा महापालिकेचा प्राधान्यक्रम असून, मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक सुधारणा आणि कामे टप्प्याटप्प्याने राबविण्यात येतील, असेही त्यांनी नमूद केले.

Railway News : पुणे रेल्वे स्थानकाला RPF जवानांचे सुरक्षा कवच; हरवलेल्या ४१२ मुलांना केले पालकांकडे सुपूर्त

पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात शहरातील लघुउद्योग संघटना तसेच एमआयडीसीमधील विविध उद्योग संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत विशेष बैठक पार पडली. या बैठकीला आयुक्त डॉ. सूर्यवंशी अध्यक्षस्थानी होते.

बैठकीत औद्योगिक क्षेत्रासमोरील मूलभूत सुविधा, स्वच्छता, पायाभूत विकास आणि प्रशासकीय समन्वय या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी परिसरातील पाणीटंचाई, कचरा संकलनातील अडचणी, झाडलोट, खराब रस्ते, वाहतूक कोंडी आणि घातक कचरा व्यवस्थापनासंदर्भातील समस्या मांडल्या.

यावेळी संदीप बेलसरे यांनी औद्योगिक क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न, पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि इतर मूलभूत सुविधांबाबतच्या मागण्या आयुक्तांसमोर सविस्तर मांडल्या. उद्योग क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाने ठोस, नियोजनबद्ध आणि तातडीच्या उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

Railway News : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; वाराणसीसाठी ‘अमृत भारत’ एक्सप्रेसला मंजूरी

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी, मनोज सेठिया, उपायुक्त सिताराम बहुरे, व्यंकटेश दुर्वास, सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांच्यासह लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष अभय भोर आदी उपस्थित होते.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी एमआयडीसी परिसरात नियोजनबद्ध आणि नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी संबंधित विभागांना तातडीच्या सूचना दिल्या. तसेच कचरा विलगीकरण, वेळेत कचरा संकलन आणि दैनंदिन स्वच्छता मोहिमेवर विशेष भर देत परिसर अधिक स्वच्छ व सुव्यवस्थित ठेवण्याचे निर्देश दिले. लवकरच संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत एमआयडीसी परिसराचा प्रत्यक्ष पाहणी दौरा करून समस्यांचा आढावा घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

औद्योगिक भागातील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती, खड्डेमुक्त रस्ते, सुकर वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षित औद्योगिक वातावरण निर्मितीसाठी आवश्यक उपाययोजना तातडीने हाती घेण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. घातक कचऱ्याच्या शास्त्रोक्त विल्हेवाटीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली.

उद्योग क्षेत्राच्या समस्या प्रलंबित राहू नयेत यासाठी दर महिन्याला नियमित आढावा बैठक घेण्यात येईल. ‘उद्योग सारथी’ या उपक्रमाच्या माध्यमातून उद्योग संघटना आणि प्रशासन यांच्यात सातत्यपूर्ण संवाद ठेवून स्थानिक पातळीवरील प्रश्नांना प्राधान्याने मार्गी लावण्यात येईल. शहरातील उद्योगवाढीस गती देण्यात येईल, असेही आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. याशिवाय पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता तसेच, महिलांसाठी सुरक्षित सार्वजनिक प्रवास सुविधा आणि स्वच्छतागृहांची उपलब्धता याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले.

 

Web Title: Pcmc commissioner dr vijay suryavanshi assures swift action on pending midc infrastructure issues

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 05:48 PM

Topics:  

  • PCMC News
  • PCMC Politics
  • pune news

संबंधित बातम्या

Sports: ४० लाख डॉलरचे घसघशीत बक्षीस! भारतात रंगणार आंतरराष्ट्रीय गोल्फपटूंचा थरार
1

Sports: ४० लाख डॉलरचे घसघशीत बक्षीस! भारतात रंगणार आंतरराष्ट्रीय गोल्फपटूंचा थरार

Mhada Pune ने दिला दिलासा! अर्जाची मुदत वाढली, ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अर्ज
2

Mhada Pune ने दिला दिलासा! अर्जाची मुदत वाढली, ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अर्ज

बावधनमध्ये महापालिकेचा बुलडोझर! पाच अनधिकृत आरएमसी प्लांटवर मोठी कारवाई
3

बावधनमध्ये महापालिकेचा बुलडोझर! पाच अनधिकृत आरएमसी प्लांटवर मोठी कारवाई

पुण्यात महाविकास आघाडीचा प्रचार मेळावा; दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा शरद पवारांना विश्वास
4

पुण्यात महाविकास आघाडीचा प्रचार मेळावा; दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा शरद पवारांना विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.