Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात चाललंय काय? व्हाट्सअ‍ॅपवर डीपी ठेवल्याने तरुणावर कोयत्याने सपासप वार

वॉट्सअ‍ॅपला डीपीवर "तु कुत्ता है", असा डीपी ठेवणार्‍या तरुणावर टोळक्याने हल्ला केला आहे. यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. हा प्रकार ४ डिसेंबरच्या मध्यरात्री सय्यदनगर येथे घडला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 06, 2024 | 06:11 PM
पुण्यात नेमकं चाललय काय? व्हाट्सअ‍ॅपवर डीपी ठेवल्याने तरुणावर कोयत्याने सपासप वार

पुण्यात नेमकं चाललय काय? व्हाट्सअ‍ॅपवर डीपी ठेवल्याने तरुणावर कोयत्याने सपासप वार

Follow Us
Follow Us:

पुणे : वॉट्सअ‍ॅपला डीपीवर “तु कुत्ता है”, असा डीपी ठेवणार्‍या तरुणावर टोळक्याने हल्ला केला आहे. यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. हा प्रकार ४ डिसेंबरच्या मध्यरात्री सय्यदनगर येथे घडला आहे. यावेळी टोळक्याने हातात कोयते घेऊन परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करून दुचाकीवरून निघून गेले.

याप्रकरणी आरीफ उर्फ तालीम आसमहंमद (वय २३), साहिल खान (वय २०), टप्पू खान (वय १९), आयान आरीफ शेख (वय १९), गुलाम गौसखान (वय २२, सर्व रा. सय्यदनगर, हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत समीर इक्बाल शेख (१९, रा. गल्ली नंबर 28, सय्यदनगर, महमंदवाडी रोड, हडपसर) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास समीर व मित्र आयान इरफान शेख, अस्लम, फरदिन असे गल्ली नंबर 28 येथे बोलत थांबले होते. तेव्हा मुख्य आरोपी तालीमसह त्याचे साथीदार टोळके तेथे आले. तालीमचे आणि तक्रारदार याच्या एका मित्राचे पूर्वीपासुनचे वाद होते. तसेच वॉट्सअ‍ॅपवर समीरने तु कुत्ता है असा डीपी ठेवल्याचा राग होता. त्यातून तालीम आणि त्याच्या साथीदारांनी कोयत्याने समीर शेखवर सपासप वार करत खुनाचा प्रयत्न केला. तसेच लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.

यावेळी लोखंडी कोयते हवेत फिरवून टोळके दुचाकीवर पसार झाले. गुन्हा दाखल झालेल्यांपैकी गुलाम गौस खान व आयान आरीफ शेख यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमित शेटे अधिक तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : पुण्यात जावयानेच लावली सासऱ्याच्या घराला आग; कारण वाचून बसेल धक्का

राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले

राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली भरदुपारी कर्वे रस्त्यावरील प्रसिद्ध महाविद्यालय परिसरात फिल्मीस्टाईल टोळक्याने हातात कोयते घेऊन पाठलाग करत दोन तरुणांवर कोयत्याने वार केले. यात एका तरुणाची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर, दुसऱ्याला डोक्यात वार करून जखमी केले आहे. भरदुपारी घडलेल्या याघटनेमुळे महाविद्यालय परिसरात चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. धक्कादायक म्हणजे, मैत्रिणीबद्दल अफवा पसरवतोय या संशयावरून टोळक्याने वार केले आहेत. घटनेची माहिती मिळताच परिमंडळ एकचे उपायुक्त संदिपसिंह गिल्ल व डेक्कन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी असलेल्या तरुणांकडे चौकशी केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, पसार झालेल्या तरुणांचा शोध घेतला जात आहे.

Web Title: A young man has been attacked by a coyote for keeping a dp on whatsapp nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2024 | 06:09 PM

Topics:  

  • crime news
  • maharashtra
  • Pune Crime

संबंधित बातम्या

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
1

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप
2

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप

IMD Weather : मान्सून पुन्हा सक्रिय? पावसाचा हायअलर्ट, गरज असेल तरच बाहेर पडण्याच्या सूचना
3

IMD Weather : मान्सून पुन्हा सक्रिय? पावसाचा हायअलर्ट, गरज असेल तरच बाहेर पडण्याच्या सूचना

Bhandara News: २५ किलो गांजासह दोघे ताब्यात! पालांदूर येथे गांजातस्करीचा पर्दाफाश; ओडिशातून आणल्याचा संशय
4

Bhandara News: २५ किलो गांजासह दोघे ताब्यात! पालांदूर येथे गांजातस्करीचा पर्दाफाश; ओडिशातून आणल्याचा संशय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.