Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणावर खुनी हल्ला, डोक्यात सपासप वार; कारण…

व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेल्या मुलांना भेटण्यास नकार दिल्याच्या कारणातून, त्यांनी पोलिस भरतीची तयारी करणार्‍या एका तरुणावर धारधार शस्त्राने खूनी हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 13, 2025 | 05:48 PM
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणावर खुनी हल्ला, डोक्यात सपासप वार; कारण...

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणावर खुनी हल्ला, डोक्यात सपासप वार; कारण...

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, खुनाचा प्रयत्न, गोळीबार यासारख्या घटना उघडकीस येत आहेत. गुन्हेगांरामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. पोलिसही गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गस्त घालत आहेत. अशातच आता पुण्यातील उत्तमनगर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेल्या मुलांना भेटण्यास नकार दिल्याच्या कारणातून, त्यांनी पोलिस भरतीची तयारी करणार्‍या एका तरुणावर धारधार शस्त्राने खूनी हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे.

प्रथमेश चिंटू आढळ (वय. 19,रा. कोंढवे धावडे) असे जखमी तरुणाचे नाव असून, सद्या त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना गुरूवारी (दि. 11) रात्री आठ वाजताच्या सुमारास आर. आर. वाईन्स जवळ उत्तमनगर परिसरात घडली आहे. यावेळी टोळक्याने तीक्ष्ण शस्त्रे उगारून परिसरात दहशत माजविली. याप्रकरणी, उत्तमनगर पोलिसांनी करणसिंह सुरेंद्रसिंह गचंड (वय. 20,रा. आरती निवास, मनिषा थेटर जवळ उत्तमगर) याला अटक केली असून, त्याच्यासोबतच्या तिघा अल्पवयीन साथीदारांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण आढळ हा बारावी उत्तीर्ण असून, पोलिस भरतीची तयारी करतो. तो आरोपी करणसिंह आणि इतरांना ओळखतो. त्यातील काही पोरांना व्यसनाचा नाद असल्यामुळे आढळ त्यांना भेटण्याचे टाळत होता. आरोपीपैकी एकाने आढळ याला फोन करून तु आमच्यात येत नाहीस, आपल्यात काही गैरसमज झाले असून, ते आपआपसात मिटवून घेऊ असे म्हणून आर. आर. वाईन्स येथे भेटायला बोलावले होते. त्यानुसार आढळ हा आरोपींना भेटण्यासाठी गेला होता. त्यावेळी आरोपींनी आढळ याला तु आता मोठा झाला,आमच्यात बसत उठत नाही असे म्हणून लाथा-बुक्यांने मारहाण करून डोक्यात धारधार शस्त्राने वार केला. तसेच आढळ याच्या दोन्ही हातावर वार केले. आरोपींनी शस्त्र हवेत फिरवून आम्ही येथील भाई असून, आमच्या नादी कोणी लागले तर त्याला सोडणार नाही असे म्हणून परिसरात दहशत निर्माण केली.

टोळक्याच्या दहशतीमुळे दुकानदारांनी आपली दुकाने बंद केली होती. आढळ याला त्याच्या घरच्यांनी उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच उत्तमनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर गुन्हा दाखल होताच पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, त्याच्यासोबतच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक चेतन धनवडे करीत आहेत.

Web Title: A young man preparing for police recruitment was beaten up by a gang in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2025 | 05:48 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

दारुच्या नशेत दोन तरुणींचा भररस्त्यात राडा, एकमेकींना मारहाण; घटनेचा VIDEO व्हायरल
1

दारुच्या नशेत दोन तरुणींचा भररस्त्यात राडा, एकमेकींना मारहाण; घटनेचा VIDEO व्हायरल

नागपुरात अल्पवयीन मुलींवर अत्याचार; लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले अन् पीडिता गर्भवती राहताच…
2

नागपुरात अल्पवयीन मुलींवर अत्याचार; लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले अन् पीडिता गर्भवती राहताच…

कोल्हापुर हादरलं! धारदार शस्त्राने सपासप वार करुन तरुणाचा खून; कारण काय तर…
3

कोल्हापुर हादरलं! धारदार शस्त्राने सपासप वार करुन तरुणाचा खून; कारण काय तर…

ईडी कारवाईची भीती दाखवून महिलेची फसवणूक; तब्बल 32 लाखांना घातला गंडा
4

ईडी कारवाईची भीती दाखवून महिलेची फसवणूक; तब्बल 32 लाखांना घातला गंडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.