Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! सिगारेटसाठी लायटर दिलं नाही म्हणून आला राग; लोखंडी पान्याने केली भावाची हत्या

चुलतभाऊ असलेले कृष्णकुमार यादव व संशयित रितीक यादव हे दोघेही कामाला होते. कृष्णकुमार आणि रितीकमध्ये सिगारेटच्या लायटरवरून वाद झाला. कृष्णकुमार चिरखाण येथून पुढे जात असताना रितीकने त्याच्या डोक्यात वार करून हत्या केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 18, 2025 | 08:05 AM
धक्कादायक ! सिगारेटसाठी लायटर दिलं नाही म्हणून आला राग; लोखंडी पान्याने केली भावाची हत्या

धक्कादायक ! सिगारेटसाठी लायटर दिलं नाही म्हणून आला राग; लोखंडी पान्याने केली भावाची हत्या

Follow Us
Close
Follow Us:

सिंधुदुर्ग : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच देवगड येथे तरुणाची हत्या करण्यात आली. सिगारेट पेटवण्यासाठी लायटर दिला नाही म्हणून एकाला प्रचंड राग आला. या रागातूनच एका परप्रांतीय कामगाराने आपल्या भावाच्या डोक्यात व्हील पाना मारून त्याचा खून केला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

कृष्णकुमार यादव (वय २०, रा. मध्यप्रदेश) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून, डोक्यात पाना मारल्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला होता. सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यातील वरेरी कुळये सडेवाडीनजीक ही घटना घडली. याप्रकरणी रितीक यादव (२०, रा. मध्यप्रदेश) याला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वरेरी कुळये सडेवाडीनजीक शिवराम शांताराम जाधव यांच्या जागेत उमेश गंगाराम गवाणकर यांची चिरेखाण आहे.

हेदेखील वाचा : मित्रानेच दगडाने ठेचून केली मित्राची हत्या; दोघांनी एकत्र मिळून दारू प्यायली अन्…

या चिरेखाणीवर सुमारे 8 ते 10 परप्रांतीय कामगार कामास आहेत. यात नात्याने चुलतभाऊ असलेले कृष्णकुमार यादव व संशयित रितीक यादव हे दोघेही कामाला होते. कृष्णकुमार आणि रितीकमध्ये सिगारेटच्या लायटरवरून वाद झाला. कृष्णकुमार चिरखाण येथून पुढे जात असताना रितीकने त्याच्या डोक्यात वार करून हत्या केली. घटनास्थळी तपासकार्यात पोलिस उपनिरिक्षक महेश देसाई, पोलिस हवालदार महेंद्र महाडिक, आशिष कदम, भाऊ नाटेकर, पो.कॉ.प्रसाद आचरेकर, दिपेश तांबे, रविंद्र महाले, राजेश पाटील यांनी काम पाहिले.

आरोपीला पोलिसांनी केली अटक

केवळ सिगारेटसाठी लायटर दिले नाही म्हणून तरुणाची हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. याप्रकरणाचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.

मित्रानेच केली मित्राची हत्या

गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे गुन्हे घडत आहेत. असे असताना दुसऱ्या एका घटनेत, कोल्हापुरातील हुक्केरी तालुक्यात एका धक्कादायक घटना समोर आली. कणंगला येथे जीवलग मित्राचाच दगडाने ठेचून मित्राने खून केला. या घटनेने एकच खळबळ उडाली.

Web Title: A youth murder his brother incident in sindhudurg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2025 | 08:05 AM

Topics:  

  • crime news
  • Sindhudurg News Update
  • Youth Murder

संबंधित बातम्या

आरपीआयच्या पदाधिकाऱ्याची चाकूने भोसकून हत्या, मोशीतील घटनेनं खळबळ; कार्यकर्ते संतापले
1

आरपीआयच्या पदाधिकाऱ्याची चाकूने भोसकून हत्या, मोशीतील घटनेनं खळबळ; कार्यकर्ते संतापले

धक्कादायक ! येरवडा कारागृहातून आणखी एक कैदी पळाला; कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
2

धक्कादायक ! येरवडा कारागृहातून आणखी एक कैदी पळाला; कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

सुनेला तोकडे कपडे अन् रिल बनवण्याचा नाद, कुटुंबात कलह; सासू सासऱ्यांनी विषारी पदार्थ खाऊन संपवले आयुष्य
3

सुनेला तोकडे कपडे अन् रिल बनवण्याचा नाद, कुटुंबात कलह; सासू सासऱ्यांनी विषारी पदार्थ खाऊन संपवले आयुष्य

Crime News: आयपीएल सट्टेबाजीवर पोलिसांचा छापा; सिडको परिसरातून दोघांना अटक, ‘गट्ट्या रोमियो’चा शोध सुरू
4

Crime News: आयपीएल सट्टेबाजीवर पोलिसांचा छापा; सिडको परिसरातून दोघांना अटक, ‘गट्ट्या रोमियो’चा शोध सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.