Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मित्रानेच दगडाने ठेचून केली मित्राची हत्या; दोघांनी एकत्र मिळून दारू प्यायली अन्…

गवंडी कामाच्या निमित्ताने वीस वर्षांपूर्वी ते सेनापती कापशी येथे स्थायिक झाले. त्यांचा मुलगा आनंदा शाळा सोडून वडिलांसोबत गवंडी काम करत होता.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 17, 2025 | 08:50 AM
६० वर्षीय पत्नीचा संशयावरून खून

६० वर्षीय पत्नीचा संशयावरून खून

Follow Us
Follow Us:

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे गुन्हे घडत आहेत. असे असताना कोल्हापुरातील हुक्केरी तालुक्यात एका धक्कादायक घटना समोर आली. कणंगला येथे जीवलग मित्राचाच दगडाने ठेचून मित्राने खून केला. या घटनेने एकच खळबळ उडाली.

आनंदा ऊर्फ देमानी सुरेश डुकरे (वय २०, रा. सेनापती कापशी, ता. कागल) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. आनंदाचे वडील सुरेश डुकरे हे मूळचे कर्नाटकातील कारवार जिल्ह्यातील होमनाळी गावचे रहिवासी आहेत. गवंडी कामाच्या निमित्ताने वीस वर्षांपूर्वी ते सेनापती कापशी येथे स्थायिक झाले. त्यांचा मुलगा आनंदा शाळा सोडून वडिलांसोबत गवंडी काम करत होता. आनंदाची संशयित अल्पवयीनशी मैत्री झाली. वर्षभरापासून संशयित अल्पवयीन हा आनंदाच्याच घरी जेवण व राहण्यासाठी होता.

घरात कोणीही नसताना घरफोडी

गेले सहा-सात महिने तो कामानिमित्त बाहेर गेला होता. त्यानंतर पुन्हा अलीकडे काही दिवसांपासून हे दोघे कापशी परिसरात एकत्रच फिरत होते. दोघांची खास मैत्री असल्याने विविध ठिकाणी कामे घेऊन दोघे एकत्रच काम करत होते. रविवारी आनंदाचे आई-वडील पाहुण्यांच्या गावी गेले होते. ती संधी साधून आनंदा व संशयित अल्पवयीनाने घरातील तिजोरी फोडून किरकोळ दागिने व काही रोख रक्कम चोरून दोघेही कापशीहून निपाणीमार्गे कणंगला येथे गेले.

दोघांनी मिळून दारू प्यायली अन्…

मद्य प्राशन करून दोघेही सरकारी दवाखान्याच्या पाठीमागील शेतवडीत बोलत बसले होते. सेनापती कापशी गावाकडे परत येण्यावरून त्यांच्यात वाद झाला. यानंतर जोरदार झटापट झाली. त्यातच अल्पवयीन मित्राने रागाच्या भरात आनंदा याला दगडाने ठेचून मारल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मुरगूड पोलिसांत नोंद झाली आहे. त्यानुसार, अल्पवयीन मुलाला सेनापती कापशी येथे ताब्यात घेऊन संकेश्वर पोलिसांच्या हवाली केले आहे.

संशयिताला पोलिसांनी घेतले ताब्यात

आनंदाचा मृत्यू झाल्यानंतर संशयित रात्रभर कणंगला येथे थांबला होता. सकाळी तो सेनापती कापशी येथे आल्यानंतर मुरगूड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. याबाबत संकेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

Web Title: A youth murder his friend due to minor reason incident in kolhapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2025 | 08:50 AM

Topics:  

  • Crime in Kolhapur
  • crime news
  • Kolhapur Crime

संबंधित बातम्या

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?
1

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
2

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण
3

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
4

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.