Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेमात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीच्या वडिलांचीच केली हत्या; झोपेत असतानाच कुऱ्हाडीने सपासप वार केले अन्…

काही दिवसांतच ती पुन्हा रोहितकडे परत आली. सध्या ती गर्भवती आहे. यावेळीही मेहताबसिंग तिला पतीकडे परत पाठवण्याच्या भूमिकेवर ठाम होते. याच कारणावरून रोहितच्या मनात संताप निर्माण झाला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 05, 2026 | 08:31 AM
प्रेयसीच्या वडिलांची हत्या

प्रेयसीच्या वडिलांची हत्या

Follow Us
Follow Us:

नागपूर : मुलीला पुन्हा पतीकडे पाठवण्याचा आग्रह धरणाऱ्या वडिलांची झोपेतच कुऱ्हाडीने हत्या केली. ही घटना मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोधनी परिसरात घडली. मुलीच्या प्रियकराने मध्यरात्री घरात घुसून झोपेत असलेल्या बांधकाम मिस्त्रीच्या डोक्यावर सपासप वार केले. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून काही तासांत आरोपीला अटक केली.

मेहताबसिंग चौधरी (वय ४३, रा. जमील सोसायटी, गोधनी) असे मृताचे नाव आहे. पत्नी गीता चौधरी (वय ४०) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. रोहित गौतम (वय २५, रा. मानकापूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहताबसिंग हे बांधकाम मिस्त्री म्हणून काम करत होते. ते पत्नी आणि आईसोबत राहत होते. त्यांना दोन मुली आणि मुलगा आहे. तिघांचेही लग्न झाले आहे. धाकटी मुलगी विवाहानंतर मध्यप्रदेशात पतीसोबत राहत होती. मात्र, पतीकडून होणाऱ्या मारहाणीमुळे तिचे रोहितशी प्रेमसंबंध जुळले. रोहित आणि तिने लग्न करण्याचे ठरवले. ती पतीचे घर सोडून रोहितसोबत राहू लागली. मात्र, मेहताबसिंग यांनी तिची समजूत काढून पुन्हा पतीकडे पाठवले.

काही दिवसांतच ती पुन्हा रोहितकडे परत आली. सध्या ती गर्भवती आहे. यावेळीही मेहताबसिंग तिला पतीकडे परत पाठवण्याच्या भूमिकेवर ठाम होते. याच कारणावरून रोहितच्या मनात संताप निर्माण झाला. मेहताबसिंग हेच प्रेमसंबंधातील अडथळा असल्याचे समजून रोहितने त्यांची हत्या करण्याचा कट रचला. गुरुवारी मध्यरात्री सुमारे १ वाजता तो घरात शिरला.

झोपेत असतानाच कुऱ्हाडीने वार

झोपेत असलेल्या मेहताबसिंग यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. आरडाओरडा आणि आवाजाने पत्नी व आई जाग्या झाल्या. तोपर्यंत आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता. घरात सर्वत्र रक्त सांडलेले होते.

सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपी जेरबंद

घटनेची माहिती मिळताच मानकापूर पोलिसांसह गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनायक गोल्हे आणि पथकाने घटनास्थळी भेट दिली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासताना कॅमेऱ्यात आरोपी भिंतीवरून जाताना दिसला. त्यावरून त्याची ओळख पटवून पोलिसांनी घरातून ताब्यात घेतले. तपासात हत्येनंतर आरोपीने कपडे बदलल्याचे तसेच गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड नाल्यात फेकल्याचे समोर आले. पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी नेऊन गुन्ह्यातील साहित्य जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, पुढील तपास सुरू आहे.

Web Title: A youth murder man due to love affair incident in nagpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 08:27 AM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

बसस्थानकात महिलांचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या, मंचर पोलिसांची कारवाई; तब्बल…
1

बसस्थानकात महिलांचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या, मंचर पोलिसांची कारवाई; तब्बल…

Crime News: पत्नीला हत्येच्या गुन्ह्यात अडकवण्याचा डाव; तपासातच उलगडली ३ खुनांची थरारक कहाणी
2

Crime News: पत्नीला हत्येच्या गुन्ह्यात अडकवण्याचा डाव; तपासातच उलगडली ३ खुनांची थरारक कहाणी

घरातच थाटला तंबाखूचा कारखाना! अमूलच्या नावाने बनावट चीजही बनविले; पोलिसांनी केली मोठी कारवाई
3

घरातच थाटला तंबाखूचा कारखाना! अमूलच्या नावाने बनावट चीजही बनविले; पोलिसांनी केली मोठी कारवाई

हिमाचल प्रदेशमध्ये खून करून मुंबईच्या दिशेने पळाले, पण…; शनिपेठ पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या
4

हिमाचल प्रदेशमध्ये खून करून मुंबईच्या दिशेने पळाले, पण…; शनिपेठ पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.