अल्पवयीनांवर अत्याचार
नागपूर : शहरात एकाच दिवसात अत्याचाराच्या तीन वेगवेगळ्या घटना पुढे आल्या आहेत. यात अल्पवयीन मुलीवर अत्याचारासह विवाहित महिला आणि बालिकेच्या विनयभंगाचा समावेश आहे. पोलिसांनी तिन्ही प्रकरणात गुन्हा नोंदवून दोन आरोपींना अटक केली आहे. पहिली घटना कोराडी पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आली.
एका तरुणाने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिचे लैंगिक शोषण केले. यातून गर्भधारणा झाली असल्याने जबरीने तिचा गर्भपात करून घेतला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अनिकेत ताराम (वय २०) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. दुसरी घटना जरीपटका ठाण्यांतर्गत उघडकीस आली. १६ वर्षीय पीडितेच्या नातेवाईकाने विनयभंग केल्याचे समोर आले. पोलिसांनी ४२ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे.
हेदेखील वाचा : धक्कादायक ! 16 वर्षीय विद्यार्थिनीवर तब्बल सहा महिने अत्याचार; 46 वर्षीय व्यक्तीने ॲसिड हल्ल्याची धमकी दिली अन्…
दरम्यान, आरोपी हा महिलेचा नातेवाईक आहे. त्यांच्यात वडिलोपार्जित संपत्तीवरून वाद सुरू आहे. महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपी हा जवळपास अडीच महिन्यांपासून तिला त्रास देत आहे. आक्षेपार्ह बोलून अश्लील इशारे करायचा. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.
दरम्यान, या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी शहबाज शेख (वय १८) विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. शहबाज आणि पीडितेमध्ये दोन वर्षापासून मैत्री होती. ती तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती. तर आरोपी शहबाज शिविगाळ करून धमकावत होता. त्याने पीडितेच्या कुटुंबीयांनाही मारण्याची धमकी दिली. अखेर पीडितेने कंटाळून त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी विनयभंग आणि धमकीचा गुन्हा नोंदवून शहवाजाला अटक केली.
15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यातच आता लग्नाचे आमिष दाखवून 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. अतिप्रसंग करणाऱ्या आरोपीस येथील मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. पी. झपाटे यांनी दिलेल्या निकालात आजन्म कारावास व ८५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.