नागपुरात अल्पवयीन मुलींवर अत्याचार; लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना लक्षणीय आहेत. असे असताना आता शहरात वेगवेगळे गुन्ह्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना उघड झाल्या आहेत. या घटना जरीपटका आणि यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असून, पोलिसांनी दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
पहिल्या घटनेत यशोधरानगर पोलीस ठाण्याअंतर्गत २० वर्षीय तरुण आवेश शेख याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीशी इन्स्टाग्रामवरून मैत्री केली व नंतर तिच्यावर बलात्कार केला. पीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपीला ती अल्पवयीन आहे हे माहित होते, तरीही तो तिला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन गेला आणि जबरदस्तीने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले. पीडितेने लग्नासाठी दबाव आणला असता आरोपीने निसटण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध बलात्कार आणि पॉक्सो कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या एका घटनेत जरीपटका पोलिसांनी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सुजल गणवीर याला अटक केली. पीडित आणि आरोपीचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते.
आरोपीने लग्नाचे आश्वासन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले, ज्यामुळे ती गर्भवती राहिली. पीडितेला तिच्या दोन महिन्यांच्या गर्भधारणेबद्दल कळताच आरोपी आणि त्याच्या कुटुंबाने गर्भपातासाठी ४०००० रुपये दिले आणि लेखी करार केला. पण, १० सप्टेंबर रोजी आरोपी आणि त्याची आई पीडितेच्या घरी गेले आणि तिला आणि तिच्या कुटुंबाला धमकावले.
पीडितेच्या भावाने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपीने त्यालाही मारहाण केली. पीडितेच्या आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. पोलिसांनी दोन्ही प्रकरणांमध्ये तपास सरू केला.
बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार
दुसरीकडे, बीड जिल्ह्यातील परळी शहरात एक धक्कदायक घटना समोर आली. एका १२ वर्षीय मुलीवर दोन तरुणांनी अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. यात आणखी दोन जणांनी या प्रकरणात मदत केल्याचं देखील समोर आलं आहे. आठ दिवसात ही दुसरी घटना आहे. आता पुन्हा अशीच घटना परळीच्या बरकत नगर परिसरात घडल्याने परळी शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.