Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आरटीई प्रवेशासाठी 40 हजारांची लाच, खाजगी व्यक्ती एसीबीच्या जाळ्यात; पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक प्रकार

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) आपल्या मुलीचा प्रवेश निश्चित करण्यासाठी गेलेल्या पित्याकडे ४० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या खाजगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 01, 2026 | 11:30 AM
आरटीई प्रवेशासाठी 40 हजारांची लाच, खाजगी व्यक्ती एसीबीच्या जाळ्यात; पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक प्रकार

आरटीई प्रवेशासाठी 40 हजारांची लाच, खाजगी व्यक्ती एसीबीच्या जाळ्यात; पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक प्रकार

Follow Us
Follow Us:

पिंपरी : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) आपल्या मुलीचा प्रवेश निश्चित करण्यासाठी गेलेल्या पित्याकडे ४० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या खाजगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. ज्ञानेश्वर उर्फ माउली गंगाराम जगताप (३७, रा. चिंचवड नगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई आकुर्डी येथील फकीर भाई पानसरे उर्दू प्राथमिक शाळेत करण्यात आली आहे.

 

या प्रकरणातील ३० वर्षीय तक्रारदाराने आपल्या मुलीच्या आरटीई प्रवेशासाठी १६ मार्च २०२६ रोजी ऑनलाईन अर्ज भरला होता. २७ एप्रिल रोजी ते अर्जाच्या पडताळणीसाठी आकुर्डी येथील पडताळणी केंद्रावर गेले होते. तिथे त्यांचा अर्ज रिजेक्ट झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. यावेळी त्यांची भेट आरोपी माउली जगताप याच्याशी झाली. त्याने तक्रारदाराच्या मुलीच्या अर्जाची पडताळणी करून प्रवेशाची पावती मिळवून देण्यासाठी ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदाराने २९ एप्रिल रोजी पुणे एसीबीकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीची शहनिशा केल्यानंतर, ३० एप्रिल रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास फकीर भाई पानसरे उर्दू प्राथमिक शाळेच्या पहिल्या मजल्यावर सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून ४० हजार रुपये स्वीकारताना माउली जगताप याला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले.

याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, आणि अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे, असावरी शेंडे आणि त्यांच्या पथकाने केली.

कोणत्याही शासकीय कामासाठी किंवा शासकीय अधिकाऱ्याच्या नावाने खाजगी व्यक्तीने लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केले आहे. त्यासाठी रहिवासी १०६४ या टोल फ्री क्रमांकावर किंवा विभागाच्या कार्यालयात संपर्क साधू शकतात.

हे सुद्धा वाचा : “मराठी बोलणार नाही, ही हिंमत येते कुठून?”; राज ठाकरेंचा परप्रांतीय रिक्षाचालकांसह सरकारवर प्रहार

Web Title: Acb has arrested a person who was demanding bribe for rte admission

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • Bribe News
  • crime news
  • maharashtra

संबंधित बातम्या

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
1

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
2

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
3

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
4

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.