Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दोन हजारांच्या लाचेची मागणी भोवली; ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला एसीबीने सापळा रचून पकडले

तक्रार अर्जाची चौकशी करुन वरिष्ठांकडे अहवाल पाठविण्यासाठी दोन हजारांची लाच मागणाऱ्या शिरुर तालुक्यातील कान्हूरमेसाई ग्रामपंचायतीतील कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 03, 2026 | 12:30 AM
दोन हजारांच्या लाचेची मागणी भोवली; ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला एसीबीने सापळा रचून पकडले

दोन हजारांच्या लाचेची मागणी भोवली; ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला एसीबीने सापळा रचून पकडले

Follow Us
Follow Us:
  • दोन हजारांच्या लाचेची मागणी भोवली
  • ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला एसीबीने सापळा रचून पकडले
  • शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे : राज्यासह देशभरात कर्मचारी, अधिकारी यांनी लाच घेतल्याचे अनेक प्रकरण उघडकीस आले आहेत. लाच घेण्याचे प्रकार वाढत असल्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जोरदार कारवाई केली जात आहे. अशातच आता तक्रार अर्जाची चौकशी करुन वरिष्ठांकडे अहवाल पाठविण्यासाठी दोन हजारांची लाच मागणाऱ्या शिरुर तालुक्यातील कान्हूरमेसाई ग्रामपंचायतीतील कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे.

 

भरत पोपट गायकवाड (वय ४६, रा. कान्हूरमेसाई, ता. शिरुर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी गायकवाड याच्याविरुद्ध शिक्रापूर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रादार हे शिरुर तालुक्यातील कान्हूरमेसाई गावचे रहिवासी आहेत. तक्रारदाराच्या जागेत गावातील काही जणांनी अतिक्रमण केले होते. तेथे घर बांधण्यात आले होते, तसेच ग्रामसेवकाकडून ‘८ अ’ उतारा तयार करुन घेण्यात आला होता. ग्रामसेवकाने कोणतीही कागदपत्रे न पाहता उतारा तयार करुन दिला होता. याबाबत तक्रारदाराने गटविकास अधिकारी, पंचायत समिती, शिरुर यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता. गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित अर्ज कान्हूरमेसाई ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक घासले यांच्याकडे पाठविला होता. या अर्जाची चौकशी करुन गटविकास अधिकाऱ्यांकडे अहवाल पाठविण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी गायकवाड याने तक्रारदाराकडे सुरुवातीला दहा ते पंधरा हजार रुपये मागितले होते.

याबाबत तक्रारदाराने तक्रार दिली होती, तसेच तडजोडीत गायकवाड याला दोन हजार रुपये देण्याचे मान्य केले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर बुधवारी (१ एप्रिल) सापळा लावून गायकवाड याला पकडण्यात आले. रात्री उशीरा गायकवाडला अटक करण्यात आली. पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा : रुपाली चाकणकरांच्या बहिणीचे ‘भोंदूबाबा’ कनेक्शन उघड! पतसंस्थेतील खात्यातून ४० ते ५० कोटींचे संशयास्पद व्यवहार

चार लाखांची लाच घेताना वनक्षेत्र सर्व्हेक्षकाला रंगेहात पकडले

पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ‘वनक्षेत्र सर्व्हेक्षका’ला चार लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. सेनापती बापट रस्त्यावरील कार्यालयाच्या बाहेर सार्वजनिक रस्त्यावर या लाचखोरीच्या सापळा कारवाईचा थरार भरदुपारी घडला आहे. या कारवाईने पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे. जमिनीच्या सातबारावर लागलेले खासगी वनाचे शेरे काढून टाकण्यासाठी ही लाच घेण्यात आली आहे.

Web Title: Acb has taken action against a gram panchayat employee in shirur taluka for demanding a bribe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • Bribe Case
  • crime news

संबंधित बातम्या

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
1

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
2

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
3

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा
4

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.