crime (फोटो सौजन्य: social media )
समृद्धी महामार्ग: शहापूर तालुक्यातील कासेगाव परिसरात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. दोन ट्रकांमध्ये झालेल्या भीषण अपघातात ट्रक चालक आणि क्लिनर या दोघांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात नागपूरहून मुंबईच्या दिशेने जात असतांना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. घटनेची माहिती मिळतातच घटनास्थळी जीव रक्षक पथक घटनास्थळी दाखल होत मदत कार्य सुरु केले आहे. ट्रकमधील मयत चालक व क्लिनर यांचा मृतदेह जीवरक्षक पथकाच्या मदतीने बाहेर काढण्यात आले आहे. शवविच्छेदनासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
कसा झाला अपघात?
समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर रस्त्याच्या कडेला एक ट्रक बंद पडल्याने तो उभा होता. त्यादरम्यान मागून येणाऱ्या दुसऱ्या ट्रक चालकाला अचानक झोप लागली त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. दरम्यान धडक देणाऱ्या ट्रकमधील लोखंडी एंगल ट्रकच्या पुढील भागात शिरले, ज्यामुळे ट्रक मधील चालक व क्लीनर दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
अधिक तपास सुरु
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. रात्रीच्या प्रवासादरम्यान डुलकी लागल्याने हा अपघात घडला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केले आहे. घटनेनंतर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती, मात्र पोलिसांनी तातडीने ती सुरळीत केली. सध्या या घटनेचा तपास शहापूर पोलीस करीत आहेत.
वाशीम हादरलं! मानसिक आजार आणि व्यसनाधीनतेतून पतीकडून पत्नीची हत्या
वाशीम जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पत्नीला दवाखान्यात नेण्याच्या मामुली वादातून पतीने पत्नीवर धारदार शास्त्राने वार करून तिची हत्या केली. नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. ही घटना वाशीम जिल्ह्यंक्तही कोठारी गावात घडली आहे. या घटनेने वाशीम जिल्ह्या हादरून गेला आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, हिम्मत धोंगडे (वय अंदाजे 40),कल्पना धोंगडे (वय अंदाजे 35) असे मृतकाचे नाव आहे. हिम्मत हा व्यक्ती व्यसनाधीन असून त्याला मानसिक आजाराचा त्रासही होता. कल्पना ही तिच्या पाटील उपचारासाठी दवाखान्यात नेण्याचा आग्रह धरत होती. मात्र या किरकोळ वादातून संतापलेल्या हिम्मत याने घरातील धारदार विळ्या -कुऱ्हाडीने पत्नीवर वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या कल्पना ही घटनास्थळीच मृत्यू झाला. पत्नीची हत्या केल्यानंतर हिम्मत याने स्वतः देखील घर बंद करून आत गळफास घेत आत्महत्या केली आहे. त्यामुळे काही क्षणातच एकाच घरातील दोघांचा दुर्दैवी अंत झाला. या दुहेरी घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. एका क्षणात संपूर्ण घर उद्ध्वस्त झाल्याने कोठारी गावात हळहळ व्यक्त होत आहे.