बीड जिल्हा कारागृहातील एक व्हिडीओ सध्या वायरल होत आहे. बीड जिल्हा कारागृहात कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांचे खाजगी वाहन एका कैद्याकडून धुतले जात असल्याचं समोर आला आहे. सचिन कृष्णार्थ कदम हा कैदी एका गंभीर गुन्ह्यात दहा वर्षांची जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत आहे. याच कैद्यांकडून कारागृह अधीक्षकांची खाजगी गाडी धुतली जात आहे. शिवाय हा कैदी कारागृहाच्या परिसरात मुक्त संचार देखील करत असल्याचं या व्हिडीओ मध्ये दिसत आहे.
नवी मुंबई पोलीस अॅक्शनमोडवर; ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल
या आधीपण सापडले वादात
आरटीओ विभागाकडून घेतलेल्या माहितीनुसार MH 27 BV 9517 ही गाडी कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्या मालकीची आहे. 2021 मध्येच या कारचा इन्शुरन्स संपलेला असताना देखील ही गाडी रस्त्यावर फिरते आहे. हीच खाजगी गाडी या कैद्याकडून धुवून घेतली जातेय. बूट पॉलिश, भांडे घासणे आणि कपडे धुऊन घेणे असे वैयक्तिक कामं कैद्याकडून कारागृह अधीक्षक करून घेत असल्याची माहिती कारागृहातील सूत्रांकडून मिळाली. दोन दिवसांपूर्वीच कारागृह परिसरातील मोठ मोठ्या झाडांची कत्तल केल्याने गायकवाड वादात सापडले आहे. या प्रकरणाचा विभागीय कारागृह उपमहानिरीक्षकांकडून आढावा घेण्यात आला. आता यानंतर खासगी गाडी धुवून घेण्याचा प्रकार समोर आला आहे.
नियम काय?
कारागृह अधीक्षक एखाद्या कैद्याकडून वैयक्तिक कामे करून घेत असेल, तर ते कायद्याचे उल्लंघन आहे. अशा प्रकरणात तुरुंग कायदा आणि तुरुंग नियमानुसार फौजदारी गुन्हा किंवा शिस्त भंगानुसार निलंबन, बडतर्फी किंवा इतर शिक्षा होऊ शकतात. हे नियम कैद्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि तुरुंग प्रशासनात पारदर्शकता राखण्यासाठी तयार करण्यात आले आहेत.
चिडविण्याच्या कारणावरून मेंढपाळाला दगडाने ठेचून संपवलं, नंतर
बीड जिह्यातील पाटोदा तालुक्यात एक धक्कदायक घटना समोर आली आहे. चार दिवसांपूर्वी दगडवाडी शिवारात दीपक बिल्ला (मूळ गाव मध्य प्रदेश) या मेंढपाळाचा मृतदेह आढळला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत या हत्येचं गूढं उलगडलं आहे.
का करण्यात आला खून?
पोलीस तपासात धक्कदायक माहिती समोर आली आहे. दीपक बिल्ला याची हत्या त्याच्यासोबत मेंढपाळीचं काम करणाऱ्या विलास मोरे या साथीदारानेच केली. सतत चिडवणं आणि बोलण्यातून झालेला राग यामुळे त्याने हा टोकाचा निर्णय घेतला आहे. संतापाच्या भरात विलास मोरे याने दगड उचलून दीपकच्या डोक्यावर वार करत त्याचा खून केला. यात दीपकचा जागीच मृत्यू झाला.