कोलकाता - सैरंग एक्सप्रेसचा अपघात (फोटो सौजन्य - X.com)
KOLKATA-SAIRANG EXPRESS DERAILS IN ASSAM; LOCOMOTIVE AND 5 COACHES OFF TRACK, ALL PASSENGERS SAFE The Railway statement says the locomotive and five coaches of Train No. 13125 derailed at Digaru station around 6:54 am on November 11. The loco pilot reportedly could not control the train’s speed while it was being received to give precedence to another train. All passengers are safe, with no injuries reported. They are being shifted to an alternate train. Relief and rescue operations have begun, and the General Manager and other officials have proceeded to the site. — Subodh Kumar (@kumarsubodh_) November 11, 2026
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची भीती आहे. नॉर्थईस्ट फ्रंटियर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (CPRO), कपिंजल किशोर शर्मा यांनी सांगितले की, बुधवारी सकाळी सुमारे ६:५४ वाजता, आसाममधील दिगारू रेल्वे स्थानकावर दुसऱ्या ट्रेनला मार्ग देण्यासाठी ट्रेन क्रमांक १३१२५ कोलकाता-सैरंग एक्सप्रेस थांबवली जात असताना, लोको पायलटला ट्रेनचा वेग नियंत्रित करता आला नाही. यामुळे ट्रेन रुळावरून घसरली आणि इंजिन आणि पाच डबे वेगळे झाले.
त्यांनी पुढे सांगितले की, सर्व प्रवासी सुरक्षित असून कोणीही मृत झालेले नाही. त्यांनी पुढे सांगितले की, प्रवाशांना दुसऱ्या ट्रेनने त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवले जात आहे. मुख्य जनसंपर्क अधिकारी (CPRO) कपिंजल किशोर शर्मा यांनी सांगितले की, मदत आणि बचाव कार्य तात्काळ सुरू करण्यात आले असून, महाव्यवस्थापक (GM) इतर अधिकाऱ्यांसह घटनास्थळी रवाना झाले आहेत.
नॉर्दर्न फ्रंटियर रेल्वेच्या (NFR) माहितीनुसार, अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. रेल्वेने एक मदत ट्रेनही रवाना केली आहे. पोलीस, रेल्वे सुरक्षा दल आणि स्थानिक प्रशासनाची पथकेही घटनास्थळी उपस्थित आहेत. प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू आहे. मुख्य जनसंपर्क अधिकारी शर्मा यांनी सांगितले की, गाडी रुळावरून घसरल्यामुळे रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात येत आहेत. दरम्यान दिवाळीच्या सणाच्या वेळी ही घटना घडल्याने अनेकांना आपल्या कुटुंबापर्यंही पोहचता आलेले नाही.






