
भीषण अपघातात ३ जागीच ठार
परभणी : परभणी-वसमत रस्त्यावर दोन कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना परभणी-वसमत रस्त्यावरील राहाटी परिसरातील विश्वशांती ज्ञानपीठ परिसरात घडली. जखमींवर परभणी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, याप्रकरणी अज्ञात चालकाविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सखाराम सटवाजी साखरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचा चुलत भाऊ बाबाराव दतराव साखरे हा स्विफ्ट डिझायर कार (एमएच ३८ एडी ३५४१) या वाहनातून आरळ येथून परभणीच्या दिशेने जात होता. त्याचवेळी समोरून येत असलेल्या क्रेटा कार (एमएच २२ बीसी ७८८८) च्या चालकाने निष्काळजीपणे आणि भरधाव वेगात कार चालवून त्यांच्या कारला समोरून जोरदार धडक दिली.
हेदेखील वाचा : ‘देव तारी त्याला कोण मारी’, अपघातात 37 प्रवासी जखमी, मात्र 1 वर्षाचा चिमुकला थोडक्यात बचावला, आंबा घाट वळणावरील घटना
या अपघातात कारमधील बाबाराव दतराव साखरे (रा. आरळ ता. वसमत जिल्हा हिंगोली), विमलबाई बालासाहेब जाधव (रा. पिंगळी ता. परभणी) आणि कांताबाई अंबादास कातोरे (रा. आरळ ता. वसमत जिल्हा परभणी) घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबतचे साईनाथ रामचंद्र काकडे (रा. आरळ ता. वसमत), हरी बालासाहेब जाधव (रा. पिंगळी ता. परभणी) हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांची तत्काळ धाव
या घटनेची माहिती मिळताच ताडकळस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी सखाराम साखरे यांच्या फिर्यादीवरून क्रेटा कारचालकावर ताडकळस पोलिसांत शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास ताडकळस पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.
आंबा घाटात भीषण अपघात
रत्नागिरी-नागपूर महामार्गावर आंबा घाट परिसरात अंगावर काटा आणणारा भीषण अपघात झाला आहे. आंबा घाटात वळण घेत असताना चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि मोठी दुर्घटना झाली. या अपघाताची तीव्रता इतकी होती की बसमधील 37 प्रवासी जखमी झाले तर 8 प्रवासी गंभीर जखमी झाले.
हेदेखील वाचा : Accident News: अति वेगाने कार आली अन्…; लोणावळ्यामध्ये भीषण अपघात; 2 ठार तर टेम्पो चालक…