Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘देव तारी त्याला कोण मारी’, अपघातात 37 प्रवासी जखमी, मात्र 1 वर्षाचा चिमुकला थोडक्यात बचावला, आंबा घाट वळणावरील घटना

रत्नागिरी नागपूर महामार्गावर आंबा घाट परिसरात अंगावर काटा आणणारा भीषण अपघात झाला आहे. आंबा घाटात वळण घेत असताना चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि मोठी दुर्घटना झाली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 06, 2025 | 02:53 PM
‘देव तारी त्याला कोण मारी’, अपघातात 37 प्रवासी जखमी, मात्र 1 वर्षाचा चिमुकला थोडक्यात बचावला, आंबा घाट वळणावरील घटना
Follow Us
Close
Follow Us:
  • अपघातात 37 प्रवासी जखमी,
  • मात्र 1 वर्षाचा चिमुकला थोडक्यात बचावला,
  • आंबा घाट वळणावरील घटना
चिपळूण : रत्नागिरी नागपूर महामार्गावर आंबा घाट परिसरात अंगावर काटा आणणारा भीषण अपघात झाला आहे. आंबा घाटात वळण घेत असताना चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि मोठी दुर्घटना झाली. या अपघाताची तीव्रता इतकी होती की बसमधील 37 प्रवासी जखमी झाले तर 8 प्रवासी गंभीर जखमी झाले.
रत्नागिरी- नागपूर महामार्गावरील आंबा घाटात चक्रीवळणाजवळ शुक्रवारी पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास खाजगी प्रवाशी बस सुमारे 70 फूट दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात 37 प्रवाशी जखमी झाले असून 8 प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. मात्र या भीषण अपघातात 1 वर्षाचा चिमुकला थोडक्यात बचावला. त्यामुळे काळ आला पण या चिमुकल्याचं दैव बलवत्तर म्हणून वेळ आली नाही.

आंबा घाटतून ही बस रत्नागिरीच्या दिशेने येत असताना पहाटे 4.30 वाजण्याच्या दरम्यान गाडीवरील नियंत्रण सुटले व बस थेट संरक्षक कठडा तोडून सुमारे 70 फूट दरीत कोसळली. रात्रीच्या अंधारात ही बस अचानक दरीत कोसळल्यानंतर बसमधील प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी आटापीटा सुरु केला. याचवेळी शिवराज कलामंच कलाकारांची गाडी पाठून आली. बसचा झालेला अपघात त्यांच्या लक्षात आला. दत्तजयंती निमित्त नमनाचा कार्यक्रम आटोपून रत्नागिरीकडे परतत असताना त्यांना रस्त्याचा संरक्षक कठडा तोडून वाहन दरीत कोसळल्याचे दिसले.

Guhagar News: एसटी ‘रातराणी’ची प्रकाशवाट अंधुक; प्रवासात हेडलाईटचा प्रकाश कंदिलासारखा

माणुसकीच्या नात्याने या सर्व कलाकारांनी गाडीतून उतरत पोलीसांना अपघाताची माहिती दिली. तसेच अँम्ब्युलन्स बोलावली. यानंतर या सर्वांनी पोलीसांच्या मदतीने सर्व प्रवाशांना दरीतून सुखरूप वरती आणले. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यासाठी सर्वोतोपरी मदत केली.दरम्यान, या प्रवाशांमध्ये एक दांम्पत्य आपल्या 1वर्षाच्या मुलग्याला घेवून प्रवास करत होते. मात्र भीषण अपघातात हे दांम्पत्य बचावले असून त्यांचा चिमुकलादेखील बालंबाल बचावला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की संरक्षक कठडा तोडून ही बस दरीत कोसळली. या बसने दरीतील आंब्याच्या झाडाला धडक दिली. बसच्या धडकेने आंब्याचे झाड मध्येच तुटले आहे. या आंब्याच्या झाडाला धडक देत ही बस आणखी खाली जावून पलटी झाली. या भीषण अपघातातून दाम्पत्यासह त्यांचा अवघा 1वर्षाचा चिमुकला आश्चर्यकारकरित्या बचावला आहे. केवळ दैव बलवत्तर म्हणून आमचा मुलगा या अपघातातून बचावल्याची भावना या दाम्पत्याने बोलून दाखवली. त्यांनी देवाचे आभार मानले आहेत.

Karjat News : विकासकामाला गती; उल्हास नदीवरील दहिवली मालेगाव नव्या पुलबांधणीची स्थानिकांची मागणी

 

Web Title: 37 passengers injured in accident but 1 year old child narrowly escapes incident at amba ghat bend

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 02:53 PM

Topics:  

  • Accident
  • Marathi News
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

Raigad ZP Election :  जिल्हा परिषद निवडणूकीसाठी आमदार महेंद्र थोरवेंच्या हस्ते फुटला प्रचाराचा नारळ
1

Raigad ZP Election : जिल्हा परिषद निवडणूकीसाठी आमदार महेंद्र थोरवेंच्या हस्ते फुटला प्रचाराचा नारळ

Kolhapur News: वन्यप्राण्यांची दहशत आणि तरुणांचे स्थलांतर; शाहुवाडीच्या जखमांवर कोण घालणार फुंकर?
2

Kolhapur News: वन्यप्राण्यांची दहशत आणि तरुणांचे स्थलांतर; शाहुवाडीच्या जखमांवर कोण घालणार फुंकर?

ZP Election 2026 : करमाळ्यात माघारीनंतरच स्पष्ट होणार सत्तेचे गणित; जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक बहुपक्षीय 308 उमेदवार रिंगण
3

ZP Election 2026 : करमाळ्यात माघारीनंतरच स्पष्ट होणार सत्तेचे गणित; जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक बहुपक्षीय 308 उमेदवार रिंगण

Ahilyangar News: संगमनेरमध्ये कामगार रुग्णालयांना मंजुरी! आमदार अमोल खताळ यांचा पाठपुरावा
4

Ahilyangar News: संगमनेरमध्ये कामगार रुग्णालयांना मंजुरी! आमदार अमोल खताळ यांचा पाठपुरावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.